रोजगाराच्या नवीन संधी! ‘पॅक्स सिलिका’चा भारताच्या आघाडीत सहभागी होण्याचा ऐतिहासिक निर्णय – PAX Silica Alliance India

Latest Update for Indian Youth! India on Friday decided to join the US-led ‘PAX Silica‘ alliance – PAX Silica Alliance India. The aim is to strengthen the supply chain in rare earth minerals and artificial intelligence. The intention is to reduce over-dependence on any one country in the supply chain. The indirect aim of this alliance is to give a boost to China. India decided to formally join ‘PAX Silica’ at a ceremony held at the ‘AI Impact’ summit. Union Minister for Information and Technology Ashwini Vaishnav, US Deputy Secretary of Economic Affairs Jacob Helberg and Ambassador Sergio Gore were present on the occasion.

 

भारताने शुक्रवारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’ आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दुर्मीळ खनिजे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात पुरवठा साखळी मजबूत करण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. पुरवठा साखळीमध्ये कुठल्याही एका देशावरील जास्त अवलंबित्व कमी करण्याचा यामागे मानस आहे. या आघाडीमध्ये चीनला शह देण्याचे अप्रत्यक्ष उद्दिष्ट आहे. भारताने ‘एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेमध्ये झालेल्या समारंभात ‘पॅक्स सिलिका’मध्ये औपचारिकरीत्या सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव, अमेरिकेचे आर्थिक व्यवहार उपसचिव जॅकोब हेल्बर्ग आणि राजदूत सर्जिओ गोर या वेळी उपस्थित होते.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

हेल्बर्ग यांनी भारताचे या आघाडीमध्ये स्वागत केले. एकाच देशाकडे पुरवठासाखळीची असलेली मक्तेदारीचे आव्हान अधोरेखित करून त्यांनी त्यामुळे आर्थिक बळाचा वापर आणि ब्लॅकमेलिंगचे धोके असल्याचे सांगितले. हेल्बर्ग यांनी हे धोके सांगताना कुठल्याही एका देशाचे नाव घेतले नाही. पण, त्यांचा रोख चीनकडेच होता, हे उघड आहे. चीनची दुर्मीळ खनिज आणि त्या संदर्भातील उत्पादनांच्या निर्यातीवर मक्तेदारी आहे. या दुर्मीळ खनिजांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, एअरोस्पेस, संरक्षण क्षेत्रासह अनेक क्षेत्रात होतो. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनीही भारत ‘पॅक्स सिलिका’मध्ये सहभागी झाल्याचे स्वागत केले. भारताच्या सहभागामुळे युती अधिक मजबूत झाल्याचे ते म्हणाले. आपण केवळ शिखर परिषद घेत नसून, भविष्य घडवत आहोत. तरुणांसाठी नव्या संधी तयार करण्यात येत आहेत. आज भारतातील इंजिनीअर्स जगातील अत्याधुनिक दोन नॅनोमीटर चिप्सची रचना करतात. सेमीकंडक्टर क्षेत्राला कौशल्याधारित लक्षावधी कामगारांची गरज भासणार आहे. भारतासाठी ही मोठी संधी आहे.

पॅक्स सिलिका ही आघाडी डिसेंबर २०२५ मध्ये तयार झाली. १२ डिसेंबर रोजी सहभागी देशांनी जाहीरनामा घोषित केला. या आघाडीमध्ये ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इस्रायल, जपान, कतार, दक्षिण कोरिया, सिंगापूर, संयुक्त अरब आमिराती, ब्रिटन या देशांचा समावेश आहे. गेल्या महिन्यांत अमेरिकेतील उच्च अधिकारी सर्जिओ गोर यांनी भारताला आघाडीमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड