Pavitra Portal Document Verification
Pavitra Portal Document Verification
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्याला ५१० नव्या शिक्षकांची भर पडली असून, त्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात मोठी गर्दी उसळली. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ अंतर्गत मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या ५१० उमेदवारांची स्वप्रमाणपत्राच्या आधारे ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होताच, विशेषतः परजिल्ह्यातील उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने जिल्हा परिषदेत अक्षरशः जत्रेचे स्वरूप पाहायला मिळाले.
कागदपत्रांच्या पडताळणीच्या प्रत्येक टप्प्यावर पात्रतेची कसोटी लागणार असल्याने ५१० शिक्षकपदासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रात नोंदविलेल्या माहितीच्या आधारे निवडीसाठी शिफारस करण्यात आली असली, तरी नियुक्तीपूर्वी मूळ कागदपत्रे व संबंधित प्रमाणपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत आहे. पडताळणीत पात्र ठरल्यानंतरच नियुक्तीची पुढील कार्यवाही होणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्सुकतेसोबतच काहीशी चिंता दिसून आली.
जिल्ह्यात शिक्षकांची ६ हजार १८८ पदे मंजूर असून, त्यापैकी ५ हजार ३११ शिक्षक कार्यरत आहेत. बिंदू नामावलीनुसार ८७७ पदे रिक्त दर्शविण्यात आली होती. यातील ७०१ रिक्त पदे भरण्यासाठी ‘पवित्र पोर्टल’वर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या या पदांपैकी ५१० शिक्षकांची जिल्ह्यासाठी शिफारस झाली आहे.
नियुक्तीपूर्वी कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करण्यासाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रकाश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी निता गावंडे, डॉ. शिल्पा पोलपेल्लीवर, विस्तार अधिकारी, अधीक्षक, लिपिक आदी कर्मचाऱ्यांनी पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली.
दरम्यान, नाशिक, पुणे, धुळे, रायगड आदी जिल्ह्यांतून उमेदवारांची निवड झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करूनही उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी हजेरी लावली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आवारात उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Pavitra Portal Selection List Result 2025 – 2026@ https://tait2025.mahateacherrecruitment.org.in
- महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
- सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत.
- मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत.
त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. - पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी २७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे. खालील लिंक वरून आपण यादी बघू शकता.
या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २७/०५/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,११,३०८ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले व त्यातील उमेदवारांनी स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले १,७०,१०८ आहेत. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील पवित्र पोर्टलवर दिनांक ०१/०५/२०२६ ते २०/०८/२०२६ या दरम्यान जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक ०६/०८/२०२६ ते १६/०८/२०२६ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज सायंकाळी ७.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.
Check Your List LINK
मुलाखतीशिवाय या प्रकारात व्यवस्थापननिहाय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- जिल्हा परिषद: मुलाखतीशिवाय पदसंख्या १३,२२५ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ८,४८१ आहे.
- नगर पालिका/परिषदा: मुलाखतीशिवाय पदसंख्या २८० असून, शिफारस होत असलेली पदसंख्या २२६ आहे.
- महानगरपालिका: मुलाखतीशिवाय पदसंख्या १,९५४ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,३०६ आहे.
- आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा: मुलाखतीशिवाय पदसंख्या २,४२१ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,६०१ आहे.
- शासकीय विद्यानिकेतन: मुलाखतीशिवाय पदसंख्या ५६ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ५४ आहे.
- खाजगी शैक्षणिक संस्था: मुलाखतीशिवाय पदसंख्या १,८१८ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,४५१ आहे.
- एकूण: मुलाखतीशिवाय एकूण पदसंख्या १९,७५४ असून, शिफारस होत असलेली एकूण पदसंख्या १३,११९ आहे.

पदनिहाय रिक्त व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
- इयत्ता १ ली ते ५ वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या १२,६७१ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ७,५४१ आहे.
- इयत्ता ६ वी ते ८ वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या ५,४२१ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या ४,२०७ आहे.
- इयत्ता ९ वी ते १० वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या १,२९८ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या १,११९ आहे.
- इयत्ता ११ वी ते १२ वी: मुलाखतीशिवाय पदसंख्या ३६४ असून, शिफारस होत असलेली पदसंख्या २५२ आहे.
- एकूण: मुलाखतीशिवाय एकूण पदसंख्या १९,७५४ असून, शिफारस होत असलेली एकूण पदसंख्या १३,११९ आहे.
समांतर आरक्षणातील माजी सैनिक (१५%) व अंशकालीन (१०%) याप्रमाणे जाहिरातीत पदे मंजूर आहेत. त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्याने अनुक्रमे २,७६० पदे व १,७६० पदे रिक्त राहिली आहेत, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील ८०२ व पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गाची १,४०८ पदे रिक्त राहिली आहेत. सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे Converted Round घेऊन भरण्यात येणार आहेत.
या कागदपत्रांची होणार पडताळणी
• सर्व प्रकारची मूळ प्रमाणपत्रे आणि साक्षांकित केलेली एक झेरॉक्स प्रत
• पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीची स्व प्रमाणपत्राची प्रत
• सध्याचे छायाचित्र
• शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र • रहिवासी दाखला
आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, चालक परवाना यापैकी एक स्वतःच्या ओळखीसाठी पुरावा
आवश्यक
• जात पडताळणी दाखला

शिक्षक पदभरतीच्या “मुलाखतीसह” या प्रकारातील सर्वसाधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरीदेखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास, अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committe) कडे [email protected] या ई-मेलवर सबळ पुराव्यांसह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ईमेल पाठवू नयेत. उमेदवारांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनीही या ईमेलवर पाठविल्यास असे ई-मेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच अन्य मार्गानी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















