पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षणसेवक, शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी २० जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक संस्थाचालकांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यास अनुत्सुकता दाखविली, त्यामुळे नोंदणीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत रिक्त पदे असून, पोर्टलवर नोंदणी न करणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य रिक्त पदांसाठी जबाबदार राहतील, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी अल्पसंख्याक ठगळून सर्व व्यवस्थापनांना दिला आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला सुरुवात झालेली आहे. खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त पदांसाठी बिंदुनामावली प्रमाणित करून पवित्र पोर्टलवर नोंदणी करायची आहे. त्यानुसार २० जानेवारीपासून सुरुवात झाली होती. महिनाभर मुदत दिल्यानंतरही अनेक संस्थांनी नोंदणीच केली नसल्याचे उघडकीस आले आहे. संस्थेची बिंदुनामावली अद्ययावत नसल्यास शिक्षक नियुक्तीबाबतची कार्यवाही करता येणार नाही. त्यामुळे बिंदुनामावलीअभावी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्यातील शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास त्यास संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन जबाबदार राहणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्याकवगळून इतर खासगी व्यवस्थापनांनी तत्काळ पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मुकुंद यांनी केले आहे.
एवढ्या संख्येची नोंदणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १४ संस्थांनी नोंदणी केली आहे. या संस्थांमध्ये शिक्षकांच्या २७३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यात मराठवाड शिक्षण प्रसारक मंडळातील १६६, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील ३८ आगांचाही समावेश आहे. त्याशिवाय इतर चार जिल्ह्यांतही संस्थांमधील रिक्र जागांची आकडेवारी समोर येत आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















