खुशखबर, पवित्र पोर्टल जाहिरातीसाठी मिळाली अजून मुदतवाढ! – Pavitra Portal Bharti Extension
Pavitra Portal Bharti Extension
मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण दुसर्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याबाबत अनेक उमेदवार उत्सुकतेने वाट पाहत आहेत. परंतु, बर्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात पदे उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीच्या दुसर्या टप्प्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीसाठी 20 जानेवारीपासून पोर्टल व सर्व व्यवस्थापनांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आत्तापर्यंत राज्यातील 1 हजार 216 व्यवस्थापन आणि विविध माध्यमांसाठी एकूण 1 हजार 337 जाहिरातींची प्रक्रिया सुरू केली आहे. Pavitra Portal Shikshak Bharti Update.
शिक्षण विभागातर्फे 20 जानेवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत जाहिरातीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, बर्याच व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना शिक्षण विभागाने आवाहन केले आहे की, आपल्या अधीनस्त शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी आल्यास त्यांनी edupavitra2022 gmail. com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.