मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील विविध विभागात भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या मुळे नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे. यातच पाटबंधारे विभागाची भर पडणार आहे. या विभागात अनेक पदे रिक्त आहे, ज्यामूळे नवीन भरती लवकरच सुरु होणार असल्याचे समजते. तसेच, कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सिंचन क्षमता वाढविण्याची मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या पाटबंधारे विभागातच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विभागातील तब्बल २ हजार ९३३ पदे रिक्त असून त्यामुळे सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन, कालव्यांची देखभाल आणि शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याची यंत्रणाच कमकुवत झाल्याचे चित्र आहे. सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि कालव्यांद्वारे शेतीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यतची एकूण ४ हजार ८९८ पदे मंजूर आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नियमित नोकरभरतीच न झाल्याने विभागातील रिक्त पदांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरमहा अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असताना नवीन भरती होत नसल्याने सध्या केवळ १ हजार ९६५ अधिकारी व कर्मचारी आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

क्षेत्रीय कामे करणार कशी?
गट ‘क’ संवर्गातील उपअवेक्षक, १ प्रथम लिपिक, मुख्य दप्तर कारकून, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक, कृषी पर्यवेक्षक, आरेखक, अभिलेखापाल, सुरक्षा अधिकारी, भांडारपाल, ग्रंथपाल, सहायक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वीजतंत्री, सांख्यिकी सहायक व कृषी सहायक इ. पदे रिक्त आहेत.
स्थापत्य अभियांत्रिकी सहायकची ३११ पदे मंजूर असताना केवळ १३४ कर्मचारी कार्यरत आहेत, तर १७७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे कालवा निरीक्षक, मोजणीदार, संदेशक आणि वाहन चालक यांसारख्या प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाशी संबंधित पदांमध्ये भरती नाही. कालव्यांची देखभाल, पाणी वितरण आणि प्रकल्प व्यवस्थापनावर परिणाम होत असल्याची चर्चा विभागात आहे.
वर्ग-१ ची ३२ पदे रिक्त…
वर्ग-१ संवर्गातील कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य लेखाधिकारी, उपकार्यकारी अभियंता, वरिष्ठ लेखाधिकारी, सहायक भूवैज्ञानिक, वैद्यकीय अधिकारी आणि तहसीलदार आदी पदांची १४५ पदे मंजूर आहेत.त्यापैकी ११३ पदांवर अधिकारी कार्यरत असून ३२ पदे रिक्त आहेत. राजपत्रित ‘ब’ संवर्गात सहायक अभियंता, स्वीय सहायक, लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, विशेष अधीक्षक, विभागीय लेखापाल, कृषी अधिकारी आणि संशोधन अधिकारी आदी पदांचा समावेश आहे. या संवर्गातील ४९३ मंजूर पदांपैकी केवळ १९३ पदे भरलेली असून तब्बल ३०० पदे रिक्त आहेत.
: : Previous Updates : :
Patbandhare Vibhag Bharti : Konkan Irrigation Development Corporation, Thane has invited application for the posts of “Advocate”. There are total of various vacancies are available. The employment place for this recruitment is Raigad, Thane, Palghar, Ratnagiri, Sindhudurg, Nashik. Application is to be made through online (e-mail) mode. Last date to apply is 10th of March 2024. For more details about Konkan Irrigation Development Corporation Thane Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत “वकील” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
- पदाचे नाव – वकील
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/
How To Apply For Patbandhare Vibhag Recruitment
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For wrd.maharashtra.gov.in Bharti | |
| PDF जाहिरात | https://shorturl.at/clnOY |
| अधिकृत वेबसाईट | https://wrd.maharashtra.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















