खुशखबर! पशुसंवर्धन विभागात हजारो रिक्त पदे लवकर भरती सुरु होणार! – Pashusavardhan Vibhag Bharti 2026

Pashusavardhan Vibhag Bharti 2026

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या जिल्हा पशुसंवर्धन विभागातील हजारो पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. त्यातच सन २०२६-२७ साठीचे तब्बल १ कोटी १७ लाख अंदाजपत्रक निधीचे खर्चाचे नियोजन व विविध योजना राबविताना रिक्त पदामुळे कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील पशुधन वाढवण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबरोबरच रोगप्रतिबंधक लसीकरण आणि साथ रोग नियंत्रण अशी मोठी जबाबदारी हा विभाग पार पाडत लाख रुपये निधीचे अंदाजपत्रक मंजूर असून या निधीचे खर्चाचे नियोजन आणि पशुसंवर्धन विभागामार्फत नव्याने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम या विभागाकडून केले जाते, असे असताना या विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया महाराष्ट्र सरकार द्वारे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यातच समोर पावसाळा असल्याने पशुधनाला धोका असल्याचे चित्र समोर आहे, कारण या काळात पशूंना विविध रोगांचा सामना करावा लागतो, या मुले नवीन भरती लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे, सोबतच सरकारला सुद्धा याची जण असल्याने भरतीचा हालचाली सुरु असल्याचे समजते. तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुसंवर्धन क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाचा सखोल आढावा घेत रिक्त पदे तातडीने भरण्याचे आणि पशुवैद्यकीय सुविधा अधिक आधुनिक करण्याचे निर्देश दिले. बैठकीत पशुसंवर्धन क्षेत्राला नुकताच मिळालेल्या ‘कृषी क्षेत्राचा दर्जा’नंतरच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या निर्णयामळे पशपालकांना कषी क्षेत्राप्रमाणे विविध सवलती, कर्ज व योजनांचा लाभ मिळणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन क्षेत्राला त्यामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Pashusavardhan Vibhag Bharti 2026 Details Update

ग्रामीण भागातील पशवैद्यकीय दवाखाने, फिरते दवाखाने आणि जनावरांच्या आरोग्य सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत वेगाने पोहोचाव्यात, यासाठी यंत्रणेला अधिक तत्परतेने काम करण्याचे आदेशही देण्यात आले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

भरतीचे स्वरूप आणि महत्त्वाच्या तारखा – या ऐतिहासिक भरती प्रक्रियेद्वारे पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गातील २ हजार ७९५ जागा आणि सहाय्यक आयुक्त (गट-अ) संवर्गातील ३०८ जागा भरल्या जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रियास्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पार पडणार असून, ११ जून २०२६ रोजी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मुख्य केंद्रांवर संगणक आधारित चाळणी परीक्षा (सीबीटी) घेतली जाईल. परीक्षेची वेळ सायंकाळी ५:३० ते ७:०० अशी निश्चित करण्यात आली असून, या परीक्षेतील कामगिरीवरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

अर्थव्यवस्थेला मिळणार बळ – राज्यातील ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संकटात सापडली होती. आरोग्य पशुधनाचे लसीकरण, तपासणी आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना रिक्त पदांमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत होता. या मेगाभरतीमुळे विभागाला एकाच वेळी मोठ्या संख्येने अधिकारी मिळणार असल्याने पशुसंवर्धन यंत्रणा अधिक सक्षम आणि वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत करताना उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही भरती केवळ नोकरीची संधी नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.


 

Pashu

लोकसेवा आयोगाने २५ एप्रिल २०२५ रोजी ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली होती. त्यांनी पुढे सांगितले की, पशुसंवर्धन हा राज्याचा विषय आहे आणि म्हणूनच, संबंधित राज्ये राज्य-विशिष्ट घटकांवर आधारित आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करतात. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या ४०,६०३ मंजूर पदांपैकी १०,४७४ पदे रिक्त आहेत. शिवाय, केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने २०२१-२३ दरम्यान शेतकऱ्यांच्या दाराशी पशुवैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी ४,०१९ फिरते पशुवैद्यकीय युनिट्स प्रदान करून संबंधित राज्यांना मदत केली आहे. 

महाराष्ट्रत प्रथम श्रेणी एकचे दहा तर द्वितीय श्रेणी दोनचे १४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यापैकी प्रथम श्रेणीच्या चार दवाखान्यांचा कारभार अतिरिक्त पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे आहे. पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक व परिचर अशा एकूण ४१ पदे रिक्त आहेत. अतरिक्त पदांमुळे आजारी जनावरांच्या उपचारासाठी शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकदा जनावरे दगावण्याच्या घटनाही घडत असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करावी, अन्यथा जनावरांची होत असलेली हेळसांड थांबणार नाही, अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे. बागलाण तालुक्यातील मंजूर व रिक्त पदांचा तपशील.

पद मंजूर भरलेली रिक्त

  • पशुधन विकास अधिकारी ११ ०७ ०४
  • सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ०२ ०२ ००
  • पशुधन पर्यवेक्षक १४ ०६ ०५
  • वर्णोपचारक ०८ ०३ ०५
  • परिचर ३१ ०४ २७
  • अर्धवेळ सफाई कर्मचारी ०१ ०१ ००
  • एकूण ६४ २३ ४१

Pashusavardhan Vibhag Bharti 2026

रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच ही पदे भरण्यात येतील.
डॉ. कीर्ती फनसे, प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

पाळीव जनावरे आजारी पडल्यास खासगी डॉक्टरांना बोलवावे लागते. ते मनमानी शुल्क घेतात. वेळेवर उपचार न झाल्यास जनावरे दगावतात.
केवळ देवरे, शेतकरी, करंजाड


 

राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार सुमारे ३ हजार ७० इतकी पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यांपैकी २ हजार ८०७ पशुधन अधिकाऱ्यांच्या पद भरतीसाठी विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध केली असून, त्यासाठी २१०० अर्ज प्रात झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयातून मिळाली आहे. भरावयाच्या जागांच्या तुलनेत अर्ज कमी आल्याने भरतीसाठी स्पर्धा तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. उमेदवारांच्या प्रत्यक्ष लेखी परीक्षेनंतर उर्वरित प्रक्रिया पार पडताच नवीन पशुधन अधिकारी पुढील सहा महिन्यांत पशुसंवर्धन विभागात रुजू होणार आहेत. नवीन पदभरतीमळे रिक्त जागा भरल्या जाऊन पशुसंवर्धन विभाग खऱ्या अर्थाने गतिमान होऊन कात टाकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावपातळीवर जनावरांच्या आरोग्याच्या समस्या तत्काळ सोडवण्यासह त्याचा फायदा दुग्धोत्पादन वाढीस होईल. 

राज्यात पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार पशुधन विकास अधिकारी-गट अ या संवर्गातील विभाग व जिल्हानिहाय एकूण मंजूर पदसंख्या ४ हजार ६८५ इतकी आहे. सध्या कार्यरत पदसंख्या १ हजार ८७८ इतकी आहे. त्यामुळे पदे रिक्त असल्याने गावपातळीवरील जनावराच्या आजारपणाच्या काळात अडचणी निर्माण होतात. तसेच शेतकऱ्यांना खासगी डॉक्टरकडून महागड्या सेवा घेण्याची वेळ येते. मात्र, सध्याच्या भरती प्रकियेनुसार गावपातळीपर्यंत पशुधन अधिकाऱ्यांची उपलब्धता अधिक सुदृढ झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

 

पशुवैद्यकीय अधिकारी हे पदवीधारक तर पशुधन पर्यवेक्षक हा पदविका केलेला असतो. त्यामध्ये पदविकाधारकांची संख्या अधिक होती. मात्र, शासनाच्या निर्णयानुसार पदविकांऐवजी बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स हा पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारानाच संधी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकारी कार्यरत झाल्यास विभागाची क्षमता वाढेल. तसेच शेतकऱ्यांना भविष्यात दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळण्यास
मदत होईल.

 


 

Pashusavardhan Vibhag Bharti 2025 – Out of the 215 posts of officers and employees approved for the Animal Husbandry Department in the district, 103 posts are vacant. This includes 71 livestock officers, which is affecting farmers. All the category two veterinary hospitals in Sindhudurg district have now been classified as category one. The state and district council hospitals have been merged. So the New Bharti process of Pashusavardhan Vibhag Bharti 2025 is expected soon for large number of vacancies in Maharashtra.

There are 95 veterinary hospitals in the district. 7 mobile hospitals were approved. But they have also been closed. A total of 215 posts of officers and employees have been approved for the 95 veterinary hospitals. This includes the posts of Assistant Commissioner 20, Livestock Development Officer 91, Livestock Supervisor 96, and Livestock Development Officer Group B-8. But in reality, only 112 posts are filled in the district and 103 posts are vacant. Farmers are being harassed as there are no livestock officers in many hospitals. Since one livestock development officer has the additional charge of three-four livestock hospitals, the workload has increased in Pashusavardhan Vibhag Recruitment 2025.

 

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात, पशुसंवर्धन विभागातील ‘पशुधन पर्यवेक्षक वर्ग ३’ ची ३४०० रिक्त पदे तात्काळ भरण्याची आणि ‘एलएमडीपी’ डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांची शासनामार्फत नोंदणी करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेश सरचिटणीस राहुल महामुनी यांनी हे निवेदन सादर केले असून, यावर हजारो विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत. 

  • पशुसंवर्धन विभाग पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी गट व, सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक
  • एकूण रिक्त पदे: 5690 पदे.
  • नोकरी ठिकाण: पूर्ण महाराष्ट्र मधील सर्व जिल्हे.
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन ahd Maharashtra पोर्टल द्वारे अपेक्षित आहे
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.

 

या निवेदनात म्हटले आहे की, “मागील अनेक वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती झालेली नाही. मनुष्यबळ कमी असल्याने एका कर्मचाऱ्याला २०-२० गावे सांभाळावी लागत आहेत, ज्यामुळे लसीकरण वेळेवर होत नाही आणि लम्पीसारख्या आजारांमुळे जनावरे दगावत आहेत. विभागाचा भरतीसाठीचा आकृतीबंध तयार असून, केवळ आपल्या आदेशाची प्रतीक्षा आहे.”

“आमच्यासारखे हजारो विद्यार्थी गेल्या ७ वर्षांपासून या भरतीची तयारी करत असून, वयोमर्यादा वाढत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे. आपण मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून, जिल्हा परिषद भरतीमध्ये पशुधन पर्यवेक्षक पदांचा समावेश करावा आणि हा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा,” अशी कळकळीची विनंतीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

 

Maharashtra Pashusavardhan Vibhag Bharti 2026: Maharashtra State Pashusavardhan Vibhag (Animal Husbandry Department – AHD Maharashtra Bharti Updates 2026) will begin soon new Recruitment Advertisement PDF is expectd soon. This Bharti is to Fulfill the Vacancies For the posts “Livestock Development Officer, Livestock Development Officer Group B, Assistant Livestock Development Officer/Livestock Supervisor”. Eligible candidates are directed to submit their application online through https://ahd.maharashtra.gov.in/ this Website. Total 5690 Vacant Posts have been announced by Maharashtra Pashusavardhan Vibhag (AHD –Animal Husbandry Department Maharashtra) Recruitment Board, Maharashtra in the advertisement May 2025. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. Last date to Apply Online will updated soon. Large Number of candidates are waiting for this Bharti process.

Table of Contents

3 thoughts on “खुशखबर! पशुसंवर्धन विभागात हजारो रिक्त पदे लवकर भरती सुरु होणार! – Pashusavardhan Vibhag Bharti 2026”

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड