परभणीत सैन्य मेळाव्याला सुरवात झाली !

Parbhani Army Rally 2020 Started

Parbhani Army Rally 2020

परभणी  येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरतीच्या पहिल्याच दिवशी ४ हजार ६५४ उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
परभणीसह ९ जिल्ह्यांसाठी ४ जानेवारीपासून सैन्य भरतीला प्रारंभ झाला आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरतीसाठी हजारो उमेदवार परभणी शहरात दाखल झाले आहेत.

शनिवारी पहाटे १ वाजेपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. आॅनलाईन प्रवेशप्राप्त झालेल्या ४ हजार ६५४ उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी सैन्य भरतीच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच उमेदवारांशीही संवाद साधला. शारीरिक चाचणीच्या टप्प्यानुसार या ठिकाणी कॅम्प तयार करण्यात आले असून जिल्हाधिाकरी पी. शिव शंकर यांनी प्रत्येक कॅम्पला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. तसेच झेंडी दाखवून जिल्हािधकाऱ्यांच्या हस्ते प्रत्यक्ष चाचणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सैन्यदलातील कर्नल तरुण जामवाल यांच्यासह सैन्यदलातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय सैन्य भरतीसाठी उमेदवार मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे परभणीकडे येणाºया रेल्वेगाड्यांना गर्दी वाढली आहे. शनिवारी दिवसभर रेल्वे स्थानकासह बसस्थानकावरही उमेदवारांची गर्दी पहावयास मिळाली. ही भरती प्रक्रिया शक्यतो रात्री सुरु होत असल्याने उमेदवारांनी मिळेल तेथे मुक्काम करुन भरती प्रक्रिया चाचण्यांना हजेरी लावली. १३ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. भरतीस्थळी इतरांना प्रवेश नाकारला आहे.

परभणी जिल्ह्यात ४ ते १३ जानेवारी दरम्यान सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात ही भरती प्रक्रिया होणार आहे. अर्ज भरण्यास २१ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून १९ डिसेंबरपर्यंत ते चालू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (२२ नोव्हेंबर) सैन्य भरती मेळाव्यानिमित्त पुर्वतयारी आढावा बैठक पार पडली. औरंगाबाद येथील सैन्य भरती कार्यालयामार्फत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रमाणात joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी करावी, असे आवाहन सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्यानिमित्त आयोजित पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह विद्यापीठ, आरोग्य, महापालिका, पोलिस, सैनिक कल्याण आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • पदाचे नाव – सैनिक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार ८ वी, १० वी आणि १२ वी उत्तीर्ण असावा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ नोव्हेंबर २०१९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१९
  • मेळाव्याचा पत्ता – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • मेळाव्याची तारीख – ४ जानेवारी २०२० ते १३ जानेवारी २०२०

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड