PM प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत प्रशिक्षणाची संधी!! – Opportunity to Apply for PM Internship!!

PM Internship Yojna

भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील युवक-युवतींना नामांकित महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीमध्ये प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अकोला यांच्या वतीने २९ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

हा रोजगार मेळावा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, चाकण (पुणे) या नामांकित कंपनीमार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) अंतर्गत प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
देशातील या योजनेचा मुख्य उद्देश युवकांना भारतातील पहिल्या ५०० नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणे आणि त्यांचे कौशल्य विकसित करणे हा आहे. रोजगार मेळाव्यात कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेणार आहेत. योजनेसाठी अर्जदारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे निश्चित करण्यात आली असून, १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा कंपनीकडून १८ हजार ५५ रुपये विद्यावेतन मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन मुलाखत सत्राकरीता आपले बायोडाटा, शैक्षणीक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे, तसेच अधिक माहिती करिता कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड