NVS School Admit Card 2026
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी आणि ११ वी निवड चाचणी परीक्षा (एलईएसटी एक्झाम) २०२६ ही शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते १.३० या वेळात बुलढाणा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. या परीक्षांकरिता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्रावरीत नमूद परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ९ वी निवड चाचणी परीक्षा-२०२६ चे परीक्षा केंद्र – जे. व्ही. मेहता हायस्कूल खामगाव, नॅशनल हायस्कूल खामगाव, अंजुमन हायस्कूल खामगाव, तर जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता ११ वी निवड चाचणी परीक्षा-२०२६ चे परीक्षा केंद्र – पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय शेगाव, श्री. म. बि. बुरुंगले हायस्कूल शेगाव हे आहेत. संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र वर संकेत स्थळावरुन डाउनलोड करावे. तसेच शनिवार ७फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रवेश परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
Click here to download the admit card for class IX LEST 2026
NVS School Admit Card 2025
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठीची परीक्षा शनिवारी, १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ११ हजार ९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली.
२०२६ या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रवेश परीक्षेची सर्व तयारी जिल्हा परिषदेने पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील २६ परीक्षा केंद्रांवर २६ केंद्रसंचालक आणि नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून नियुक्त केलेले १६ निरीक्षक यांच्या देखरेखीखाली ४६३ खोल्यांत परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या सुरळीत पार पडण्यासाठी भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची संख्या व तालुक्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून केंद्रांची निवड करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू आणि गुजराती अशा सहा माध्यमांत घेण्यात येणार असल्याने विविध भाषिक विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी जिल्हास्तरीय अधिकारी केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देत आहेत.
ही परीक्षा जिल्हाधिकारी व नवोदय परीक्षा समितीचे अध्यक्ष अशोक काकडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोढे आणि जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य व सदस्य सचिव अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हास्तरावर संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
NVS School Admit Card 2025
नवोदय विद्यालयाच्या शैक्षणिक २०२६-२७ च्या सहावीच्या जागांसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली. दि. १३ डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार असून हॉल तिकीट वितरण सुरू झाले आहे. प्रवेशासाठी इच्छुक मुलांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील. प्रवेशासाठी परीक्षेचा पहिला टप्पा दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी प्रस्तावित आहे. परीक्षेचा दुसरा टप्पा दि. ११ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येईल.
How To Download JNV Class 6 Admit Card 2025
- www.navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- मुख्यपृष्ठावर, ‘JNVST प्रवेशपत्र 2026 वर्ग 6’ लिंकवर क्लिक करा.
- पुढे, विद्यार्थ्यांनी प्रदान केलेल्या जागेत नोंदणी क्रमांक आणि DOB प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
- लॉगिन विंडोवर दर्शविल्याप्रमाणे कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- लॉगिन बटणावर क्लिक करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी डॅशबोर्डवरील “NVS प्रवेशपत्र 2026 वर्ग 6” लिंकवर क्लिक करा.
- प्रिंटआउट घ्या आणि परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी सुरक्षित ठेवा
CLICK HERE TO DOWNLOAD ADMIT CARD FOR CLASS VI SELECTION TEST 2026.
NVS School Admit Card 2023
NVS School Admit Card 2023: Online application deadline for Jawahar Navodaya Vidyalaya Class VI entrance test is Tuesday (31st). The entrance examination will be held on 29 April 2023 at 33 examination centers of the district. For Navodaya Vidyalaya exam Candidates must be present at their examination center at 10:30 AM sharp. It is necessary to bring the admit card, your school ID card, Aadhaar card and mask. Download NVS School Admit Card 2023 from below Link:
नवोदय विद्यालयात २०२३.२४ या शैक्षणिक वर्षासाठी 6 वी वर्गात प्रवेश घेण्यासाठी होणारी परीक्षा दिनांक २९.एप्रिल ( शनिवार ) रोजी होणार आहे. परीक्षार्थिनी ठीक सकाळी १०:३० वाजता आपल्या परीक्षा केंद्रावर हजर असणे अनिवार्य आहे. परीक्षार्थिनी सोबत प्रवेश पत्र, आपल्या शाळेचे ओळखपत्र, आधार कार्ड व मास्क आणणे गरजेचे आहे. प्रवेश पत्रडाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How To Download JNV Class 6 Admit Card 2023
- www.navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- मुख्यपृष्ठावर, ‘JNVST प्रवेशपत्र 2023 वर्ग 6’ लिंकवर क्लिक करा.
- पुढे, विद्यार्थ्यांनी प्रदान केलेल्या जागेत नोंदणी क्रमांक आणि DOB प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
- लॉगिन विंडोवर दर्शविल्याप्रमाणे कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- लॉगिन बटणावर क्लिक करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी डॅशबोर्डवरील “NVS प्रवेशपत्र 2023 वर्ग 6” लिंकवर क्लिक करा.
- प्रिंटआउट घ्या आणि परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी सुरक्षित ठेवा
CLICK HERE TO DOWNLOAD ADMIT CARD FOR CLASS VI SELECTION TEST 2023.
JNV Admit Card 2023

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















