अधिपरिचारिका प्रतीक्षा यादीतील उमेदवार त्रस्त! ४१२३ पदांची भरती प्रक्रिया- Nurse Recruitment 2024
Nurse Recruitment 2024
वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयमार्फत (डीएमईआर) शासकीय वैद्यकिय, दंत, आयुर्वेद तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट-क अधिपरिचारिका (४१२३ पदे) या पदासाठी सरळसेवा भरती १० मे २०२३ रोजी आयोजित केली होती. सदर भरतीस एक वर्ष पूर्ण होऊनही अद्यापपर्यंत समांतर आरक्षणातील रिक्त जागांनुसार प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. विभागाचा संथ कारभार पाहता प्रतिक्षेतील उमेदवारांची कुंचबना होत आहे. पदभरतीची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
संथगतीच्या प्रकारामुळे वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयाचे काटेकोर पालन न झाल्याचे निदर्शनास आले आहे. अधिपरिचारिका या पदाकरीता खुला प्रवर्गाच्या समांतर आरक्षणामधील खेळाडूंच्या १८ रिक्त जागा भरताना शासन निर्णयानुसार प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांमधून भरले गेले पाहिजे होते. परंतु, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाने तसे न करता केवळ खुला प्रवर्गाच्या उमेदवारांनाच नियुक्ती आदेश वितरीत केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन राखीव प्रवर्गांवर अन्याय झाल्याचे दिसून आले आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
७ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन
राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांंच्या समस्यांची दखल राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने घेतली असून अन्यायाच्या विरोधात ०७ मे २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे प्रदेश महासचिव प्रेमराज बोबडे यांनी कळविले आहे.
संघटनेच्या आंदोलनातील मागण्या
समांतर आरक्षणाची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्व नियुक्ती आदेशांसह उमेदवारांची यादी प्रवर्गनिहाय रिवाईज करून संकेतस्थळावर तात्काळ प्रकाशित करावी. १८ अराखीव उमेदवारांना नियुक्ती देऊन १३६५ ते १४५२ चे आतील सर्व राखीव/मागास उमेदवारांना नियुक्तीपासून बेदखल केल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.
Nurse Recruitment 2024 -परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी; तसेच परिचारिका संवर्गातील सर्व स्तरांवरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील व प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. परिचारिका संवर्गाच्या विविध मागण्यांबाबत मंगळवारी (ता. पाच) मुंबईत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. मंत्री मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. मनीषा शिंदे, राज्य उपाध्यक्ष भीमराव चक्रे, राज्य सरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्य खजिनदार राम सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य आशा यादव, सेंट जॉर्ज शाखेच्या अध्यक्ष कामिनी सोनवणे व स्मिता म्हसकर आदी उपस्थित होत्या.
मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी, परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघराची सुविधा असावी आदी सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांत या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे गत महिन्यात आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांसोबत बैठक झाली व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी लवकरच बैठक बोलावून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मंत्री मुश्रिफ यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्याची खात्री दिली.
Comments are closed.