नेट चा निकाल जाहीर

NTA Exam Results Declared

सहायक प्राध्यापकांसाठी 60 हजार 147 उमेदवार तर, कनिष्ठ संशोधक पदासाठी 5 हजार 92 उमेदवार पात्र

पुणे – वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट)चा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यात सहायक प्राध्यापकांसाठी 60 हजार 147 उमेदवार, तर कनिष्ठ संशोधक पदासाठी 5 हजार 92 उमेदवार पात्र ठरले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे युजीसी नेट परीक्षा देशभरात 2 ते 6 डिसेंबरदरम्यान 299 शहरांतील 700 केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 10 लाख 34 हजार 872 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यातील 7 लाख 93 हजार 813 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. या व्यावसायिक परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही आणि मोबाइल जॅमर यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. तसेच, ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती.

युजीसीच्या धोरणानुसार, दोन्ही विषयांच्या परीक्षा देऊन त्यात किमान सरासरी गुण मिळवलेल्या उमेदवारांना पात्र ठरवण्यात येते. त्यानुसार परीक्षा दिलेल्यांपैकी 6 टक्‍के उमेदवार पात्र ठरल आहेत. सविस्तर निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

click here for NTA Results?निकाल पहा


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप