NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत ‘रयत’च्या दक्षिण विभागातील विद्यार्थ्यांना मिळणार पावणेचार कोटींची शिष्यवृत्ती? NMMS Scholarship Exam Result
NMMS Scholarship Exam Result
NMMS Scholarship Result 2024
NMMS Scholarship Exam Result: शिक्षण क्षेत्राला गुणवत्तेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाने (सांगली) राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात ‘एनएमएमएस’ तसेच ‘सारथी’मध्ये लख्ख यश मिळवले. डिसेंबर-२०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘एनएमएमएस’ परीक्षेत ‘रयत’च्या दक्षिण विभागाने नेत्रदीपक यश मिळवून यंदाही वरचष्मा ठेवला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तब्बल ९६९ विद्यार्थी राष्ट्रीय, तसेच सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या ५५ विद्यार्थ्यांसाठी २६ लाख ४० हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ‘सारथी’साठी पात्र ठरलेल्या ९१४ विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांकरिता ३ कोटी ५० लाख ९७ हजार ६०० अशी एकूण ३ कोटी ७७ लाख ३७ हजार ६०० रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रेरणेतून व विद्यालयाच्या मार्गदर्शिका सरोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या दक्षिण विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,
ढवळी (ता. वाळवा) विद्यालयाने आठवीच्या ‘एनएमएमएस’ परीक्षेत भरारी घेतली असून विद्यालयाचे ७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ५४ विद्यार्थ्यांनी यश मिळाले. मयुरी पाटील, अनुष्का हाके यांच्यासह अन्य पाच विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत झळकले, तर ४१ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
रुकडी (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी विद्यालयाने ‘एनएमएमएस’ परीक्षेत विद्यार्थी अभिलाष संजय कांबळे याची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून त्याने १३८ गुण प्राप्त करून कोल्हापूर जिल्ह्याच्या यादीत (राखीव संवर्गातून) १२ व्या स्थानी भरारी घेतली आहे.
१६ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीधारक ठरले. नेहरू विद्यालय, हिंगणगाव (बु.) विद्यालयातील अनुष्का माने, प्रथमेश कदम यांच्यासह २२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या विद्यालयाची दीक्षिता मातोंडकर हिने सर्वसाधारण प्रवर्गातून तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावून बाजी मारली, तर मंथन परब हा विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला.
सडोली खालसा शाखेने चमकदार कामगिरी करत ८२.६५ टक्के निकाल प्राप्त करून यशाला गवसणी घातली. हुपरी शाखेची विद्यार्थिनी काव्या राहुल मुद्राळे हिची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. दुधगाव शाखेतून वेदांत गुरव याने इतर मागास प्रवर्गातून सांगली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
शिरोळची पूर्वा मुडशिंगे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली. आष्टा येथील निर्जरा सुदर्शन उपाध्ये हिने चमकदार कामगिरी करून जिल्हास्तरीय निवड यादीत स्थान मिळवले. सियात तांबोळी ग्रामीण भागातील खरसुंडी शाखेत शिकणारा विद्यार्थी जिल्ह्यात २० व्या स्थानी पोहेचला.
साखरपासारख्या दुर्गम भागातील ८५ शाखांतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विभागीय अधिकारी विनयकुमार हणशी, सहायक निरीक्षक ए. ए. डिसोझा, यू. बी. वाळवेकर, तसेच शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात आले.
संस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांची मेहनत, योग्य मार्गदर्शन, तसेच संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या ‘प्रूव्हन स्ट्रॅटेजी’मुळे स्पर्धा परीक्षेत ‘रयत’मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानावर असलेल्या पहिल्या तीन विद्यालयांना वात्सल्य फाउंडेशनतर्फे हजारोंची बक्षिसे जाहीर केली आहेत.
– डॉ. एम. बी. शेख, विभागीय अध्यक्ष, दक्षिण विभाग, सांगली
कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे चालवत संस्थेतील निष्ठावान शिक्षक विद्यार्थ्यांप्रती आपुलकीची भावना मनात ठेवून समतोल पद्धतीने विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत. ‘रयत’मध्ये बहुगुणी विद्यार्थी घडतात, अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे.
– विनयकुमार हणशी, विभागीय अधिकारी, दक्षिण विभाग, सांगली
NMMS Scholarship Exam Result Date
परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी नॅशनल मेरीट कम मिन्स स्कॉलरशीप (एनएमएमएस २०२३- २४) परीक्षेचा निकाल दि. ७ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला मात्र, त्यास दीड महिन्यांचा कालावधी होत आला असून, अद्याप शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची राज्य तसेच जिल्हा निवड यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि.२४ डिसेंबर २०२३ रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७३० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. राज्यभरातून २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख १०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, अडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती, तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदी मध्ये दुरुस्तीसाठी दि. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. आणि त्यानंतर शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट केले होते. मात्र निकालास दीड महिन्याचा कालावधी झाला असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी यादीची वाट पाहत आहेत.
NMMS Scholarship Exam Result : The scholarship exam was organized in December 2022 for students from economically weaker sections. The final answer list along with the list of marks obtained by the students was released on the website of the Maharashtra State Examination Council.
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे डिसेंबर २०२२ मध्ये आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या यादीसह अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, गुणांची यादी प्रसिद्ध करून दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला असून, अद्याप अंतिम निकाल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल केव्हा लागणार? अशी विचारणा विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे. राज्यातील ११ हजार ३५० शाळांमधील १ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
NMMS Scholarship Exam Result
NMMS Scholarship Exam Result – National Scholarship Exam Scheme Exam (NMMS) result has been published by msce Pune on official [email protected]. According to this, 75 thousand 841 students passed the examination. Scholarships are given on the basis of merit under the examination to students of class VIII whose parents have an annual income of less than three and a half lakh rupees and studying in aided schools. Appeared students can download NMMS Result 2022, NMMS MSCE Oune Result PDF from the official site also you can check NMMS Scholarship Exam Result at below :
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना परीक्षेचा (एनएमएमएस) निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार ७५ हजार ८४१ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.पालकांचे वार्षिक साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या आणि अनुदानित शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेअंतर्गत गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार या प्रमाणे बारावीपर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. यंदा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २१ डिसेंबरला एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती.
१ लाख ९७ हजार १७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ७५ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सविस्तर निकाल https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या यादीतील विद्यार्थ्यांच्या नाव किंवा जन्मतारीख, जात, आधारकार्ड आदींमध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी १७ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची यादी यथावकाश जाहीर करण्यात येईल, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
Check NMMS Pune Exam Result 2022-23
Table of Contents