NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मिळाली मुदतवाढ! आता १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा, 22 डिसेंबरला परीक्षा! | NMMS Scholarship Exam 2024 | NMMS Scholarship Exam Date

NMMS Scholarship Exam 2024

NMMS Scholarship Exam 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता १५ नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहे.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

या शिष्यवृत्ती योजना परीक्षेची तारीख २२ डिसेंबर निश्चित केली असून, २०२४-२५ साठीच्या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाच ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत ४ नोव्हेंबर ही नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची पूर्वीची अंतिम तारीख होती, परंतु आता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यार्थ्यांना विलंब शुल्काशिवाय १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे. परिषदेने स्पष्ट केले आहे की, यानंतर विलंब किंवा अतिविलंब अर्ज सादर करण्यास परवानगी मिळणार नाही. राज्यभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा २२ डिसेंबर रोजी होणार आहे.


NMMS Scholarship Exam 2024

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना एनएमएमएस २०२४-२५ परीक्षेसाठी ऑनलाईन माध्यमातून प्रवेश अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. शाळांना येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या २२ डिसेंबरला परीक्षेचे आयोजन केले आहे. अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. राज्यातील शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थिनींना या परीक्षेस बसता येते. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थी सातवीमध्ये ५५ टक्के, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थी किमान ५० गुण घेत उत्तीर्ण झालेला असावा, विद्यार्थ्यांचे आई-वडील दोघे मिळून पालकांचे उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा असावे, तसेच नोकरी करणाऱ्या पालकांनी आस्थापना प्रमुखांचा तहसीलदार / तलाठ्चाचा सन २०२३- २४ च्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागणार आहे. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठी आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

विद्यार्थ्यांस वार्षिक बारा हजार शिष्यवृत्ती इयत्ता आठवीच्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यास उत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे, तसेच या विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पात्र विद्यार्थ्यांला बारावीपर्यंत वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. संकेतस्थळावरून करता येणार अर्ज शाळांना नियमित शुल्कासह येत्या ४ नोव्हेंबर, तसेच विलंब शुल्कासह ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत, राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावरून अर्ज भरता येतील.

 


NMMS Scholarship Exam 2023 : Maharashtra State Examination Council has changed the National Scholarship Scheme Exam Date for Economically Weaker Students. Accordingly, instead of December 10, this exam will be held on December 17.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १० डिसेंबरऐवजी ही परीक्षा आता १७ डिसेंबरला होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यात आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. परीक्षा परिषदेने ही परीक्षा १० डिसेंबरला घेण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या नियोजनात बदल करण्यात आला असून, आता ही परीक्षा १७ डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


NMMS Scholarship Exam 2023

NMMS Scholarship Exam 2023 – The National Scholarship Scheme Examination (NMMS) for economically weaker section students will be conducted on December 10 by the Maharashtra State Examination Council. For this, online applications can be submitted through regular fee till 23rd August. Scholarship eligible students in this examination will get a scholarship of Rs 1000 per month for class 9th to 12th. Commissioner of Examination Council Anuradha Oak gave this information. Students of class VIII from economically weaker sections whose parents have an annual income of less than three and a half lakhs are eligible for this examination. Also, minimum 55% marks in 7th standard, Scheduled Caste, Scheduled Tribe students must have minimum 50% marks.

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) १० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत नियमित शुल्काद्वारे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या परीक्षेतील शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीसाठी दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. आर्थिक दुर्बल घटकातील आठवीत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक साडेतीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे, ते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. तसेच सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण असणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

विना अनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरणार नाहीत. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२४ मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. अधिक माहिती आणि अर्ज https:// www.mscepune.in & https://nmmsmsce. in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम 2023-24 डाउनलोड करा.


 

NMMS Scholarship Exam 2023: The latest upate for NMMS Scholarship Application 2022. As per the latest news, Students applying for ‘National Economically Weaker Students’ Scholarship Scheme Examination’ (NMMS) have got an extension till November 5 to apply. Students apply through hhttps://www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in. The NMMS Exam will be held in the 18th of December 2022. Further details are as follows:-

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी ‘राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षे’साठी (NMMS) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पालकांच्या उत्पन्न मयदित यंदा वाढ करण्यात आली आहे. आता साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांनादेखील ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे. यंदा ही परीक्षा १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्याथ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. यापूर्वी दीड लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती परीक्षा देता येत होती. आता पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केली आहे. एनएमएमएस परीक्षेद्वारे शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना याआधी इयत्ता नववीपासून ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असे. आता शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज परिषदेच्या ‘https://www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in’ या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारे विद्यार्थी ही


Previous Update –

NMMS Scholarship 2022 – Exam Dates 

NMMS Scholarship Exam 2022 : Maharashtra State Examination Council Pune has announced the NMMS 2022 Exam dates. Admit cards are available from the 8th of June 2022. The NMMS Scholarship 8th class exam will be conducted on the 19th of June 2022 under Maharashtra State Examination Council Pune. The scholarship exam admits card can download on the www.mscepune.in & https://nmmsce.in. Further details are as follows:-

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत रविवारी (दि. १९) घेतली जात आहे. जिल्ह्यातील आठवीचे ४ हजार २९३ विद्यार्थी शहरातील १४ केंद्रांवर परीक्षा देणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.

१४ केंद्रांवरील १८३ ब्लॉकमध्ये परीक्षेची व्यवस्था केली आहे. जिल्ह्याची क्षमता ४ हजार ३९२ इतकी असून यावर्षी ४ हजार २७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. मराठी माध्यमाचे ४ हजार ७३, उर्दू माध्यमाचे ८७, इंग्रजी माध्यमाचे १११, तर हिंदी माध्यमाचे दोन विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना लॉगिनवर ८ जूनपासून उपलब्ध केले आहेत. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची आहे. अडचण आल्यास संबंधित परीक्षा केंद्र संचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

NMMS Scholarship Exam 2022


NMMS Scholarship Exam 2022 – Exam Dates 

NMMS Scholarship Exam 2022: The NMMS Scholarship 8th class exam will be conducted on the 19th of June 2022 under Maharashtra State Examination Council Pune. The scholarship exam admits card can download on the www.mscepune.in & https://nmmsce.in. Further dteails are as follows:-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीसाठी परीक्षा रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ४९९ केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण ९२३६ शाळा व एकूण १ लाख ३० हजार ९४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीषदेच्या www.mscepune. in व https://nmmsce.in या संकेतस्थळावर शाळांना लॉगिनवर ८ जूनपासून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

  • सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, पालक किंवा विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास संबंधित परीक्षा केंद्रसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
  • २००७-०८ शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली.
  • आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे असा योजनेचा हेतू आहे.
  • पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एक हजार असे वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

NMMS Scholarship Exam 2022


NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022: The National Economically Weak Students (NMMS) Scholarship Examination for Class VIII students has been extended. Now students can apply till Sunday (1st). Further details are as follows:-

NMMS Exam Extension Eighth

इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना रविवार (ता.१) पर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

  • राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.
  • ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे.
  • अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती गुणवत्तेच्या आधारे वितरित करण्यात येते.
  • विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी घेतल्यानंतर ही निवड घोषित करण्यात येते.
  • मराठी, हिंदी, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, उर्दू, सिंधी, कन्नड आणि तेलगू या माध्यमांतून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल.
  • परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बारावी पर्यंत एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.

NMMS Scholarship Exam Important Dates 

  • – ऑनलाइन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत : १ मे
  • – विलंबासहीत : ६ मे
  • – परीक्षा : १९ जून

NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022: The State Examination Council has announced the schedule of Scholarship Scheme for National Economically Weaker Students. The examination will be held on June 19 as per the schedule. From 2007-08 onwards, financial assistance is provided to the intelligent students at the end of class VIII with a view to get the best education. Further details are as follows:-

राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रकानुसार १९ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. २००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.

त्यासाठीअर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार ६ एप्रिलपासून सुरू झाली. २६ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. करोनामुळे एनएमएमएस विविध परीक्षांचे वेळापत्रक लांबले. इयत्ता आठवीसाठी २०२१-२२ एनएमएमएस परीक्षेचे वेळापत्रक कधी येते याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते.

  • राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे वेळापत्रक जाहीर केले.
  • वेळापत्रकानुसार १९ जून रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • २००७-०८पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते.
  • ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते.
  • त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • www.mscepune.in आणि https://nmmsmsce.in या वेबसाईटवर शाळांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
  • नियमित शुल्कासह २६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
  • विलंब शुल्कासह २७ एप्रिल ते १ मेपर्यंत तर अतिविलंब शुल्कानुसार २ ते ६ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

The parent of the student will have to submit the proof of income for the financial year 2020-21 to the headmaster of the school. The student should have passed with minimum 55% marks in 7th standard. Non-subsidized, Kendriya Vidyalaya, Jawahar Navodaya Vidyalaya, government hostel concessions, students availing educational facilities, students studying in military schools are ineligible for the examination. Students are selected on the basis of their marks in the written test and on the basis of reservation for backward classes fixed by the state. Eligible students are given a scholarship of Rs. 12,000 per annum.


NMMS Scholarship Exam 2022

NMMS Scholarship Exam 2022 : The dates for the National Economic Weakness Scholarship (NMMS) examination for the year 2021-22 have been announced. A student who has passed with a minimum of 55% marks in the 7th general category and a minimum of 50% marks in the reserved category is eligible for this examination. Further details are as follows:-

NMMS Scholarship Exam Time Table

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे २०२१-२२ या वर्षातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. चालू वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १० एप्रिलला होणार असून, १९ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोणत्याही शासकीय अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेत आठवीत शिकत असलेल्या व पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी पाहिजे, तसेच सातवीत सर्वसाधारण संवर्गासाठी किमान ५५ टक्के उत्तीर्ण व आरक्षित संवर्गासाठी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतो.

  • या परीक्षेसाठी १९ जानेवारीपासून https://www.mscepune.in किंवा https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.
  • परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत १९ जानेवारी ते १९ फेब्रुवारीपर्यंत असून, ऑनलाइन विलंब अर्ज दाखल करण्याची मुदत २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी या कालावधीत आहे.
  • या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
  • या परीक्षेसाठी बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी असे दोन पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड