JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नवी मुंबई पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ७५०० रु. पगारवाढ!! – NMMC Contract Employees Salary Increase

NMMC Contract Employees Salary Increase

नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल आठ हजार ९९ कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये साडेसात हजार रुपयांची घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पगारवाढीला ‘नागरी सेवा संचालन विशेष भत्ता’ असे नाव देण्यात आले आहे. महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या अशासकीय ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. समाजविकास, क्रीडा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना या पगारवाढीचा लाभ होणार आहे.

सभागृह नेते सागर नाईक यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला. महापालिकेतील मोठा कर्मचारीवर्ग कंत्राटी पद्धतीने कार्यरत असून शहराच्या दैनंदिन नागरी सेवा सुरळीत ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढत्या महागाईमुळे कंत्राटी कर्मचार्यांना अतिरिक्त आर्थिक आधार देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चर्चेअंती पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला.
मूळ वेतनात (बेसिक) वाढ केली असती, तर इतर कपात होऊन कर्मचाऱ्यांच्या हातात तुटपुंजा पगार आला असता. तसे होऊ नये म्हणून एका विशिष्ट भत्त्याच्या नावाखाली ही साडेसात हजार रुपयांची भरीव वाढ सरसकट कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले. ‘हा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात असून, पुढच्या महिन्याच्या पगारातच ही वाढ लागू होईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासह आशासेविकांसाठी नवीन धोरण आणून लवकरच दिलासा देण्यात येईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले.


Previous Posts:

NMMC BHARTI 2025 – नवी मुंबई महापालिकेने काढलेल्या ६०० पेक्षा अधिक जागांवरील भरती प्रक्रियेला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. पालिकेने काढलेल्या पदांवर आधीपासून ठोक मानधनावर शेकडो कर्मचारी गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. या कामगारांना कायम आस्थापनेवर सामावून घेण्यापेक्षा महापालिका भरती प्रक्रिया राबवून अन्याय करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र कर्मचारी युनियनने केला आहे. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिली. महापालिकेत सद्यःस्थितीत ठोक मानधनावर अनेक कर्मचारी लिपिक, शिक्षक, लेखा लिपिक, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, औषधनिर्माता, एनएम तापमान, वाहनचालक, स्थापत्य, अभियंता अशा विविध संवर्गात कार्यरत आहे. गेली दहा ते पंधरा वर्षे हे कर्मचारी प्रामाणिकपणे तुटपुंज्या वेतनावर आपली सेवा देत आहेत. प्रत्येक सहा महिन्यांनी विभागप्रमुख यांची सेवा समाधानकारक आहे.

NMMC BHARTI 2025

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

NMMC BHARTI 2025 – त्यांच्या सेवेची महापालिकेला आवश्यकता आहे, असे प्रमाणित करीत असतात. सेवेत १० वर्षे किंवा अधिक वर्षे झालेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचा दावा कामगार संघटनेने केला आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ समाधानकारक सेवा देणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना नियमित करावे, ही मागणी कर्मचारी युनियनने केली आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड