News About Aarakshan Updates – “जर एखाद्या विद्यार्थ्याचे आई-वडील दोघेही आयएएस अधिकारी असतील, तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभकशासाठी? अशा स्थितीतही जर पुढची पिढी आरक्षणाचा लाभ घेत राहिली, तर आपण या व्यवस्थेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि वंचित समूहांबाबत केवळ आर्थिक मागासलेपण असते, सामाजिक नाही. जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण नक्कीच मिळावे, परंतु एकदा आरक्षणाचा लाभ घेऊन पालकांनी समाजात चांगली पातळी गाठली असेल, तर मुलांना लाभ मिळणे योग्य नाही.
कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘सहायक अभियंता’ पदासाठी एकाची राखीव प्रवर्गातून निवड झाली. जिल्हा जात आणि उत्पन्न पडताळणी समितीने जात वैधता दाखला नाकारला. तपासणीत समोर आले की, त्याचे आई-वडील सरकारी कर्मचारी असून त्यांचे एकत्रित उत्पन्न हे ‘क्रिमी लेयर’ मर्यादेपेक्षा जास्त आहे. उमेदवार ‘कुरुबा’ समुदायातील होता. पालकांच्या उत्पन्नामुळे तो क्रिमी लेयरमध्ये येत असल्याने जात दाखला रद्द करण्यात आला.
राज्य शासनाने भरती प्रक्रियेत सुसूत्रीकरण आणि सुधारणा करण्यासाठी जारी केलेल्या नव्या शासन निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असले, तरी काही नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील पदे थेट मुलाखतींऐवजी विभागांतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे विभागीय भरतीतील आरक्षणाला धक्का बसणार असल्याची भीती कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे. पदोन्नतीतील आरक्षण सध्या लागू नसल्याने, विभागीय भरती किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत भरल्या जाणाऱ्या काही उच्च पदांवरील आरक्षित प्रवर्गाचा प्रतिनिधित्वाचा अधिकार कमी होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्य सरकारने ५ मे रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पात्रता निकष आणि अनुभवाच्या अटी लक्षात घेऊन सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. त्यानुसार नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही राजपत्रित पदे थेट मुलाखतीऐवजी विभागांतर्गत पदोन्नती किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने संबंधित संवर्गांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व विभागांनी १५ दिवसांच्या आत सुधारित नियम पुनर्प्रकाशित करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आरक्षणाच्या संधी कमी होतील?
यापूर्वी अनेक पदांपैकी ५० टक्के पदे सरळ सेवा भरतीद्वारे, तर उर्वरित ५० टक्के पदे पदोन्नतीने भरली जात होती. सरळ सेवा भरतीमध्ये आरक्षणाचा नियम लागू होत होता. मात्र नव्या नियमांनुसार सहसंचालक, संचालक अधीक्षक, कारागृह उद्योग, सहायक सरकारी अभियोक्ता, विद्युत शुल्क निरीक्षक, वन सांख्यिकी अधिकारी आणि विशेष कर्तव्य अधिकारी यांसारखी पदे पदोन्नतीद्वारे भरली जाणार आहेत. अशा पदांसाठी आरक्षण लागू नसल्याने या पदांवरील आरक्षित प्रवर्गाच्या संधी कमी होतील, असा आक्षेप शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कर्मचारी संघटनांनी केला आहे. “भरती प्रक्रियेतील सुसूत्रता आणि सुधारणा” या नावाखाली मागासवर्गीय उमेदवारांना उच्च पदांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही करण्यात येत आहे.
अराजपत्रित पदांवरील आरक्षणाचाही प्रश्न
यापूर्वी विभागीय पोलीस निरीक्षकांसह अनेक अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदांसाठी विभागीय परीक्षा आणि मुलाखती घेतल्या जात होत्या. या प्रक्रियेत आरक्षण लागू होते. मात्र आता ही पदे पदोन्नतीने भरली जाणार असल्यामुळे अराजपत्रित स्तरावरील आरक्षणाच्या संधीही कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आरक्षणाला धक्का लागणार
नवीन नियमामुळे आरक्षणाला धक्का लागणार आहे. त्यामुळे शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे ही सुरुवातीच्या नियमाने भरावी. त्यामध्ये सुसूत्रीकरण आणावे. – डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राइब संघटना.
आरक्षणाला कुठेही तडा जाणार नाही
आरक्षण हा संविधानिक नियम आहे. त्यामुळे त्याला कुठेही तडा जाणार नाही. मात्र वरिष्ठ पदे भरताना कुठल्या पद्धतीचे परीक्षा घ्यायच्या हा प्रश्न होता. सचिव दर्जाची अनेक पदे भरताना कुठलीही परीक्षा नसते. त्यामुळे वरिष्ठ पदे भरताना पदोन्नतीचा नियम लावला आहे. उलट विभागातील व्यक्तीला पदोन्नती दिल्याने ते त्याला न्याय देऊ शकतात. या नियमाने आरक्षण कुठेही धक्का न लागता उलट लवकर वरिष्ठ पदे भरली जातील. – व्ही. राधा, सचिव, सामान्य प्रशासन.
– गुणवत्तेवर आधारित हा बदल राज्यघटनेचे अनुच्छेद १४ (कायद्यासमोर समानता) आणि अनुच्छेद १६ (सार्वजनिक नोकरीत संधीची समानता) यांची गरज आहे.
– आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने कोणत्याही सवलतींचा (वय किंवा शुल्कात सवलत) लाभ न घेता खुल्या प्रवर्गातील उमेदवारापेक्षा चांगली कामगिरी केली असेल, तर अशा उमेदवाराला खुल्या प्रवर्गातील उमेदवार मानावे.
– यामुळे विशिष्ट आरक्षित प्रवर्गासाठी पुढील सर्वात गुणवान उमेदवारांसाठी राखीव जागा उपलब्ध असेल.
आता हा कायद्याचा स्थिरावलेला सिद्धांत आहे की, खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या पात्रता गुणमर्यादेपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या आरक्षित प्रवर्गातील (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय) उमेदवाराला खुल्या किंवा अनारक्षित जागेसाठी अर्हताप्राप्त मानले जावे. – सर्वोच्च न्यायालय
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















