महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टंकलेखन, लघुलेखन संस्था नूतनीकरणासाठी नवे सॉफ्टवेअर विकसित केले माहिती येथे वाचा | New Software for Typing, Shorthand Download

New Software for Typing, Shorthand Download

New Software for Typing, Shorthand Download

New Software for Typing, Shorthand Download: Maharashtra State Examination Council has developed the software for 3, 5 and 10 year renewal of all machine, computer typing and shorthand institutions in the state. It has been implemented from April 10 for the directors of the institution, said the Chairman of the Examination Council Dr. Given by Nandkumar Bedse. Through the software developed by the examination board, the institutes have been made available for application and uploading of documents. Also, after uploading the renewal information, it will be mandatory for the education authorities to inspect the institution and record their feedback within one month.

राज्यातील सर्व मशीन, संगणक टंकलेखन व लघुलेखन (शॉर्ट हॅन्ड) संस्थांना  ३, ५ व १० वर्षांच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सॉफ्टवेअर विकसित केले आहे. १० एप्रिलपासून संस्थाचालकांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली. परीक्षा परिषदेने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संस्थांना अर्ज करणे आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी टेंब उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच नूतनीकरणाची माहिती अपलोड केल्यानंतर एक महिन्याच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेची तपासणी करून त्यांचा अभिप्राय नोंदविणे बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Updated Software For Typing Test and Stenographer

एक महिन्यात अभिप्राय न नोंदविल्यास विभागीय उपसंचालक कार्यालयात तो पाठविण्यात येईल तेथेही एक महिन्यात अभिप्राय न नोंदविला गेल्यास थेट परीक्षा परिषदेतर्फे नूतनीकरण करण्यात येणार आहे. संस्थाचालकांनी वाढीव सेटअपसाठी मंजुरीसाठी विभागीय उपसंचालकांकडे पाठविलेले प्रस्ताव प्रलंबित होते. दरम्यान, २०१७ आणि २०१९ मधील १३९ प्रकरणांना तत्काळ मंजुरी दिली. तसेच वाढीव सेटअपसाठी ४८ तासांच्या आत परवानगी देण्यात येणार आहे

टंकलेखन संस्थाचालकांना २६ लाखांचा दंड
■ संगणक आणि मशीन टंकलेखन संस्थांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशित केल्याप्रकरणी परीक्षा परिषदेने राज्यातील ११० टंकलेखन संस्थाचालकांना २६ लाखांचा रूपये दंड ठोठावला असून, २५ लक्ष रूपये दंड वसूल केला आहे. तसेच नियम मोडूनही ज्या संस्थांनी दंडाची रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यांचा संस्था कोड ब्लॉक करण्यात आला आहे. ■ तसेच संस्थांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर संस्थांमध्ये वर्ग करणे, दंडाची रक्कम वाढविणे, संस्थेची मान्यता कायमस्वरूपी काढून घेणे, नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थी प्रवेशित केले म्हणून संबंधित संस्थाचालकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो, असे डॉ. बेडसे म्हणाले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड