NEET UG Counselling 2020: दुसऱ्या फेरीला सुरुवात

Maharashtra NEET 2020 Counselling


Maharashtra NEET 2020 Counselling : MCC NEET UG Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने नीट यूजी काऊन्सेलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू केली आहे. ही दुसरी फेरी आधी १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. पण एमसीसीने ती दोन दिवस लांबणीवर टाकली होती.

ज्या उमेदवारांनी नीट काऊन्सेलिंग २०२० च्या दुसऱ्या फेरीत सामील व्हायचे आहे, त्यांना पुन्हा रजिस्टर करावे लागेल. ज्या उमेदवारांनी पहिल्या फेरीच्या काऊन्सेलिंगमध्ये सीट अलॉट केली होती, मात्र ते त्या राऊंडमध्ये सामिल झाले नव्हते, असे उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

तिसरी फेरी कधी?

तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.

NEET UG 2020: एमबीबीएस बीडीएस प्रवेशांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


Maharashtra NEET 2020 Counselling : NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने NEET UG Counselling 2020 ची दुसरी फेरी आजपासून सुरू होत आहे. MBBS, BDS अभ्यासक्रमांच्या १५ टक्के ऑल इंडिया कोट्याच्या जागांवरील प्रवेशांसाठी ही प्रक्रिया राबवली जाते.

काऊन्सेलिंगची दुसरी फेरी १८ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. नीट काऊन्सेलिंग शेड्युलनुसार, पसंतीक्रम भरणे, शुल्क भरणे, चॉइस लॉकिंग सुविधात आदी प्रक्रियांसाठी १९ ते २२ नोव्हेंबर अशी मुदत आहे.

MCC समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार आहे. अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रवेश निश्चित करायचे आहेत. पहिल्या फेरीचा निकाल ६ नोव्हेंबर रोजी जारी झाला होता. १६ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या फेरीचे प्रवेश निश्चित करायची मुदत होती.

तिसरी फेरी कधी?

तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तिसऱ्या फेरीचा निकाल १७ डिसेंबरला जाहीर होईल आणि त्यानुसार १८ ते २६ डिसेंबर या कालावधीत प्रवेश होतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र

या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने NEET 2020 काऊन्सेलिंगच्या पहिल्या फेरीतील कॉलेज रिपोर्टिंग प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी आता अलॉट झालेल्या कॉलेजांमध्ये १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत रिपोर्ट करू शकतात. यापूर्वी यासाठी १४ नोव्हेंबर पर्यंत मुदत होती.

विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र
या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


NEET 2020 Counselling : NEET Counselling 2020: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटी (MCC) ने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढवली आहे. आधी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती करायची होती. आता १४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

विद्यार्थी एमसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासंदर्भातील माहिती वाचू शकतील. सूचना डाऊनलोडदेखील करता येईल. एमसीसीने शनिवारी यासंदर्भातील सूचना जारी करत कॉलेजांमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी करण्यास १८ नोव्हेंबर २०२० पासून सुरूवात होणार आहे. १८ ते २२ नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी नोंदणी होईल. शुल्क, पसंतीक्रम भरण्यासाठी १९ ते २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे. जागा अलॉट होण्याची प्रक्रिया २३ ते २४ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. दुसऱ्या फेरीची यादी २५ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. विद्यार्थी त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत रिपोर्ट करू शकतील.

प्रवेश निश्चितीच्या वेळी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –

१) एनटीएने दिलेले परीक्षेचे अॅडमिट कार्ड
२) एनटीएने जारी केलेली निकालाची प्रत
३) जन्मतारखेचा दाखला
४) बारावीचे प्रमाणपत्र
५) बारावीची गुणपत्रिका
६) ८ पासपोर्ट आकाराची छायाचित्रे (जे छायाचित्र अर्जावर लावले असेल तेच हवे)
७) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर
८) ओळखपत्र

या व्यतिरिक्त एनआरआय आणि विशेष प्रवर्गातील विद्यार्थांनी त्यांच्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.


Maharashtra NEET 2020 Counselling: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नीट काऊन्सेलिंग २०२० ला सुरुवात केली आहे. MBBS, BDS आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही समुपदेश फेरी सुरू झाली आहे. विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नीट काऊन्सेलिंग २०२० साठी नोंदणी करू शकतात. नोंदणी आणि शुल्क भरण्याची अखेरची तारीख १२ नोव्हेंबर २०२० आहे.

एमबीबीएस, बीडीएस अशा वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले असून, इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने १२ नोव्हेंबरपर्यत नोदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे कॉलेजांचे पर्याय ६ ते १३ नोव्हेंबरच्या कालावधीत भरावे लागणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या, नीट प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट विद्यार्थी आणि पालक पाहत होते. अखेर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यत वेबसाइटवर नोदणी करायची आहे. त्यानंतर ६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत केवळ एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी कॉलेजांचे पर्याय भरता येणार आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता जाहीर करण्यात येईल. प्रवेशाची पहिली निवड यादी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. या निवड यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यत कॉलेजमध्ये जाउन प्रवेश घ्यावा लागणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वेळापत्रक काही दिवसांत

बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती, नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रक यासाठी www.mahacet.org या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२० पहिल्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

 • ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरणे – ५ ते १२ नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
 • प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी – १३ नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ८ वाजेपर्यंत)
 • पहिल्या फेरीचा निकाल – १५ नोव्हेंबर (सायंकाळी ५ नंतर)
 • कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत – २० नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२०: कशी कराल नोंदणी?… जाणून घ्या :-

 • – अधिकृत संकेतस्थळावर जा.
 • – होम पेजवरील उजवीकडील ‘NEET UG 2020 (CAP Portal)’ वर क्लिक करा.
 • – आता ‘New Registration and Payment’ वर क्लिक करा.
 • – रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
 • – अर्ज भरा. पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.
 • – यूजरनेम / मोबाइल क्रमांक, पासवर्ड टाकून लॉग इन करा.
 • – नोंदणी शुल्क भरा.

अर्ज भरण्यापूर्वी नीट यूजी २०२० माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. ही माहिती पुस्तिका संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. या वृत्ताच्या अखेरीस ही माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकही देण्यात येत आहे.


NEET PG 2021 Postponed: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षा (NEET PG 2021) स्थगित केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. त्यानुसार, नीट पीजी २०२१ परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी होणार होती. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

NEET PG 2021 का झाली स्थगित?

नीट पीजी २०२१ स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाद्वारे (NMC) कळवल्यानंतर आला आहे. एनएमसीने सांगितलं की नीट पीजी २०२१ च्या तुलनेत आयोगाच्या यूजी आणि पीजी बोर्ड द्वारा सीबीएसई विविध प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे.

NEET PG 2021 चे अर्ज नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत सूचनेसह जारी होण्याची शक्यता आहे. नीट पीजी २०२१ आधी १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाणार होती आणि नीट एमडीएस २०२१चे आयोजन १६ डिसेंबर २०२० रोजी होणार होते. नीट पीजी २०२१ च्या आयोजनाच्या नव्या तारखा अद्याप जारी केलेल्या नाहीत.

NEET PG 2021 परीक्षा देशातील १६२ शहरांमध्ये संगणक आधारित पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 च्या माध्यमातून १०,८२१ मास्टर्स ऑफ सर्जरी (MS) जागांवर प्रवेश, १९,५५३ जागांवर डॉक्टर आणि अन्य १,९७९ पीजी डिप्लोमा जागांवर प्रवेश होतील. देशातील तब्बल ६,१०२ सरकारी, खासगी, डिम्ड आणि केंद्रीय विद्यापीठे या भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड