नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती

Navi Mumbai Arogya Vibhag Bharti 2020

प्राप्त बातमी नुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. यानुसार साहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यासह कर्मचारी आणि परिचारिका यांची मिळून १८० पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पालिकेकडे १३ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या संदर्भातील जाहिरात महाभरती वर आम्ही ३ मे रोजी प्रकाशित केलेली आहे.

 

गेल्या वर्षीही महापालिकेच्या आरोग्य विभागात भरती करण्यात आली होती. मात्र या भरतीप्रक्रियेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे वारंवार जाहिराती देऊन पालिकेने रुग्णालयात डॉक्टरांच्या आणि परिचारिकांच्या भरतीसाठी आवाहन केले होते आणि त्यानुसार काही पदे भरण्यात आली होती. मात्र अद्यापही यातील काही पदे रिक्त आहेत. आत्ता आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे नव्याने भरती केली जात आहे.

 

या पदांची वेतनश्रेणी २५ हजारांपासून ते ६५ हजारांपर्यंत असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे निवडप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ८ ते १३ मे या दरम्यान नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात, प्रमाणपत्रासहित थेट हजर राहावे, असे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. तर ,परिचारिकांची १२वी उत्तीर्ण आणि गीएनएन डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. पूर्ण जाहिरात बघण्यासाठी लिंक दिलेली आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ketan gharat says

    Nokri sabhd

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड