विद्यार्थ्यांना मिळणार महापालिकेची शिष्यवृत्ती! महिलांना रोजगारासाठी अर्थसहाय्य, अधिक माहिती वाचा । Nashik NMC Scholarship Application

Nashik NMC Scholarship Application

Nashik NMC Scholarship Application

Nashik NMC Scholarship Application: There are various schemes for divorced, widowed, retired women and their children. In the current financial year, 295 women have been given the benefit of this scheme. The first financial support scheme will now be implemented to start employment for women in the city. Financial provision has been made for this in the budget. The Social Welfare Department of the Municipal Corporation has decided to provide scholarships for the higher education of the backward class students under various welfare schemes for the weaker sections of Scheduled Castes, Tribes, Freed Castes and Nomadic Tribes. Financial provision has been made for this in the budget of the financial year 2024 and 25 and it has also been decided to implement skill development program for the backward classes. To get more updates about Nashik NMC Scholarship Application, Nashik Social Welfare Department Scholarship 2024 is given below:

महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती, जमाती तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याण योजनेअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (Scholarship) देण्याचा निर्णय झाला आहे. सन २०२४ व २५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली असून मागासवर्गीयांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

https://mahabharti.in/category/jobs-in-nashik/

Nashik NMC Divyang Yojana

महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून दिव्यांग तसेच महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. मागासवर्गीय कल्याणकारी योजना महिला व बालकल्याण दिव्यांग कल्याण तसेच क्रीडा धोरणासाठी अंदाजपत्रकात त्यासाठी एकूण अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

Nashik Social Welfare Department Scholarship 2024

त्यानुसार महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने मागासवर्गीय कल्याणकारी योजना अंतर्गत या वर्षापासून मागासवर्गीय युवक व युवतींसाठी उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांतील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे.

महापालिका हद्दीतील मागासवर्गीयांसाठी ही योजना आहे. मागासवर्गीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली.

महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना

घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या महिला व त्यांच्या मुलांसाठी विविध योजना आहेत. चालू आर्थिक वर्षात २९५ महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. शहरातील महिलांना रोजगार सुरू करण्यासाठी आता प्रथम अर्थसहाय्य योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी उद्यान उभारणार

शहरात राहणाऱ्या दिव्यांगांसाठी बारा कल्याणकारी योजना आहेत. २५६० दिव्यांगांना त्यांचा लाभ दिला आहे. बेरोजगार दिव्यांग अर्थसाह्य योजना व गतीमंद तसेच बहुविकलांग दिव्यांग अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत दरमहा अर्थसहाय्य बँक खात्यात जमा होते.

आगामी २०२४ व २५ या आर्थिक वर्षात दिव्यांगांसाठी त्याच धर्तीवर स्वतंत्र विशेष उद्यान उभारले जाणार आहे. यात दिव्यांगांना सहज हाताळता येईल, असे साहित्य उभारले जाणार आहे. गंगापूर रोडवरील कानिटकर उद्यानामध्ये अशा प्रकारच्या सोयी उभारण्याचे नियोजन आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड