JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नाशिक महापालिकेतील भरती प्रवेशपत्र जाहीर,Download Now २४, २५ ला लेखी परीक्षा! Nashik Mahanagarpalika Bharti Admit Card

Nashik Mahanagarpalika Bharti Admit Card Download & Exam Date Update

Nashik Mahanagarpalika Bharti Update– The highest number of applications have been received for technical cadre posts at 11 centers in the state. The written examination for this recruitment will be conducted at centers in ten to eleven cities across the state. The EXAM dates of February 24th and 25th, 2026 have been fixed for the written examination by the municipal corporation and TCS. Candidates will be provided with their admit cards online through their login IDs eight days before the examination. Information regarding this will be available on the website.

Nashik Mahanagarpalika Bharti Admit Card Download & Exam Date Update – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतर आता रखडलेल्या नोकरभरतीला वेग आला आहे. राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या ११४, तर अग्निशमन विभागातील वाहनचालक व फायरमनच्या १८६ अशा एकूण ३०० पदांच्या भरतीसाठी तब्बल १९ हजार ४०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एका जागेसाठी तब्बल ६५ उमेदवार इच्छुक आहेत. या अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या नोकरभरतीसाठी TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) तर्फे येत्या २४ व २५ फेब्रुवारीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.  नाशिक महापालिकेत सद्यस्थितीत एकूण अ ते ड संवर्गाची ७,७२५ पदे मंजूर आहेत. लोकसंख्येनुसार वर्गीय मनुष्यबळाची गरज लक्षात घेता २,०१७मध्ये महापालिकेचा १४,९४४ पदांचा आकृतिबंध शासनास सादर केला होता. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी शासनाने महापालिकेला पत्र पाठवत सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने सर्व विभागांचा आढावा घेऊन ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेने शासनास सादर केला. या आकृतिबंधास अद्याप मान्यता मिळू शकलेली नाही. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाचा तुटवडा आहे. सद्यस्थितीत ७,७२५ पदांपैकी सुमारे चार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. जवळपास ३,८०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सिंहस्थापूर्वी नोकरभरती करणे आवश्यक आहे.

Download Admit Card Link 

Nashik Mahanagarpalika Bharti Exam Date

नाशिक महापालिका भरती प्रवेशपत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नाशिक महानगरपालिका येथील अभियांत्रिकी तसेच आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील विविध पदे सरळसेवा पदभरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षा दिनांक २४/०२/२०२६ व २५/०२/२०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. सदर परीक्षा ही महाराष्ट्रातील नाशिक, सिन्नर, मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापुर, नागपुर, नांदेड या १३ शहरामध्ये होणार असून या शहरातील एकुण २९ परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे हॉल तिकीट (Admit Card) टी.सी.एस. (TCS) कंपनी मार्फत लवकरच उमेदवारांना Login ID वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ तसेच टी.सी.एस. (TCS) कंपनी मार्फत उमेदवारांना Login ID वेळोवेळी पाहावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Nashik Mahanagarpalika Bharti Admit Card Download Exam Date Update

राज्यातील ११ केंद्रावर परीक्षा तांत्रिक संवर्गातील पदांसाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या नोकर भरतीसाठी राज्यभरातील दहा ते अकरा शहरांमधील केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी Maha Palika व TCS मार्फत २४ व २५ फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना आठ दिवसां अगोदर प्रवेशपत्र (Admit Card) ऑनलाइन लॉगीन आयडीवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती संकेतस्थळावर उपलब्ध लवकरच होईल.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड