Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महापालिकेत नोकर भरती ‘TCS’ मार्फतच होणार, नवीन महत्वाचा अपडेट जाहीर! – Nashik Mahanagarpalika Bharti 2024

Nashik Mahanagarpalika Bharti 2024

Nashik Mahanagarpalika Bharti 2024

महापालिकेची ‘टीसीएस’मार्फत सुरू असलेली ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया रद्द झाली होती; परंतु ही प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात असल्याने शासनाने ‘TCS’ मार्फत भरती प्रक्रियेला मुभा दिली आहे. त्यामुळे मनपाला मोठा दिलासा मिळाला असला तरी ३१ डिसेंबर अगोदर ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याची डेडलाइन दिली आहे. राज्यातील पेपर फुटीमुळे ‘अ’, ‘ब’सोबत ‘क’वर्गीय पदांची नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘MPSC’ मार्फत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आस्थापना खर्चाची अट शिथिल करीत अत्यावशक पदे भरतीसाठी परवानगी दिली होती. त्यानसार महापालिकेने आरोग्य, वैद्यकीय तसेच अग्निशमन विभागातील अत्यावश्यक स्वरूपाच्या ७०६ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. ‘अ’ वर्गातील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून ६२४ उर्वरित पदे भरण्यासाठी ‘टीसीएस’ या कंपनीसमवेत महापालिकेने करार केला होता. २६ संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, परीक्षा पेपर आदी तयारी देखील पूर्ण झाली होती. ‘टीसीएस’ मार्फत भरतीस मुभा दिली असून येत्या ३१ डिसेंबर अगोदर ही प्रक्रिया पूर्ण करा, अशा स्पष्ट सचनाही दिल्या आहेत.


 

महापालिकेतर्फे दोन वर्षासाठी ९० वाहनचालक बाह्यस्त्रोताद्वारे (आऊटसोर्सिंग) वाहन चालकांचे भरले जाणार आहे. यासाठी ६ कोटी ३४ लाख रुपयांचा प्रस्ताव यांत्रिकी विभागाने महासभेकडे सादर केला आहे. महापालिकेत वाहनांची संख्या जवळपास दीडशे आहे.परंतु वाहनांवर चालक नाहीत. आकृतीबंधानुसार महापालिकेने यापूर्वी भरलेले चालक सेवानिवृत्त झाले आहे. रिक्त पदांची जागा भरण्यास शासनाकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने आऊटसोर्सिंगचा मार्ग अवलंबला आहे. वाहन चालकांची भरती आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केली जाणार आहे. 

 

२०१५ मध्ये वाहनचालक पदाचे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. आत्तापर्यंततीच प्रक्रिया सुरू आहे. सद्य:स्थितीमध्ये ७५ वाहन चालक कार्यरत असून ३१ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे वाहनचालक पदासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात ७५ ऐवजी ९० जडवाहन परवानाधारक वाहनचालकांची आवश्यकता यांत्रिकी विभागाने व्यक्त केली. त्या अनुषंगाने महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

 


 

पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने राज्यात अ, ब व क वर्ग महापालिकांची रिक्तपदे तसेच नव्याने भरती केली जाणारी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची घोषणा करण्यात आल्याने महापालिकेच्या ६२४ पदांची नोकर भरती संकटात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीला फक्त ‘ड’ वर्ग महापालिकांची पदे भरण्याचा अधिकार राहणार आहे. १९९२ ला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेला सुधारित आकृतिबंधानुसार ७ हजार ९२ पदे मंजूर करण्यात आले. त्या वेळी महापालिकेला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला. ७ हजार ९२ पदांपैकी जवळपास २८०० पदे रिक्त झाली आहे. यातील वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०६ पदे अत्यावश्यक बाब म्हणून कोविडकाळात भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. 

 

मात्र रिक्त पदांची भरती करताना आयबीपीएस किंवा टीसीएस या दोन कंपन्यांची नियुक्ती शासनानेच करून दिली होती. या दोनपैकी एका कंपनीमार्फत रिक्त पदांची भरती करण्याच्या सूचना होत्या. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेकडून टीसीएस अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची नियुक्ती केली. ‘अ’ वर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जातात. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून ६२४ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी व लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. मात्र आता रिक्त पदांची भरती अडचणीत सापडली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वर्गातील नोकरभरतीदेखील राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्याचे निर्देश दिल्याने आता सर्वच पदांसाठी स्पर्धा परीक्षाप्रमाणे अभ्यास करावा लागणार आहे.

अत्यावश्यक पदे सोडून इतर पदे भरतानादेखील तांत्रिक अडचण आहे. शासनाच्या नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे असेल तर पदे भरता येत नाही. नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च हा ४९ टक्क्यांच्या वर पोचला आहे. त्यामुळे ती भरतीदेखील करता येणार नाही.

“नाशिक महापालिकेचा वर्ग असताना त्या वेळी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी महत्त्वाच्या अग्निशामक व वैद्यकीय विभागातील पदांची भरती करण्यासाठी टीसीएस कंपनीमार्फत प्रक्रिया झाली होती. परंतु आता शासनाकडून नवीन सूचना आल्यास त्यानुसार रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जाईल.” – डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

 


 

३ वर्षापासून महापालिकेच्या आकृतीबंधामधील रिक्त असलेली अडीच हजार पदे तर सोडा मात्र अत्यावश्यक ७०६ पदांच्या नोकरभरतीसाठी नानाविध विघ्न पार करून सुरू असलेली प्रक्रिया पुन्हा एकदा रद्द करण्याची वेळ येणार आहे. विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेपरफुटीचे प्रकार लक्षात घेत, यापुढे ‘अ’, ‘ब’ सोबत ‘क’ वर्गाची नोकरभरती देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एमपीएससीमार्फत होणार आहे.

 

या मुळे यापूर्वी टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससोबत महापालिकेने केलेली प्रक्रिया रद्द करण्याची वेळ आली आहे. टीसीएस कंपनीला आता केवळ ‘ड’ वर्गाची पदे भरण्याचे अधिकार असणार आहे. एवढेच नव्हे तर, अत्यावश्यक बाब म्हणून छत्रपती संभाजीनगर मनपाला आस्थापना खर्चाची अट शिथिल झाली तरच भरती प्रक्रियेला संधी मिळू शकेल. पालिकेच्या सध्याच्या ७०६ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नियोजित आराखड्यात क वर्गाची पदे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आता पुन्हा एकदा फेर प्रक्रिया करावी लागणार आहे.


 

महापालिकेचा ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या प्रस्तावाच्या मंजुरी प्रक्रियेला गती मिळू शकणार आहे. सुधारित आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर जम्बो नोकरभरतीचा मार्गही मोकळा होणार आहे.

दि. ७ नोव्हेंबर १९८२ रोजी स्थापना झालेल्या नाशिक महापालिकेचा ७,०९२ पदांचा पहिला आकृतिबंध १९९६ मध्ये मंजूर झाला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचा समावेश राज्यातील ‘क’वर्गीय महापालिकांमध्ये होता. महापालिकेची क वर्गातून ब वर्गात पदोन्नती झाली. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती यांमुळे जुन्या आकृतिबंधातील रिक्त पदांची संख्या ३,४०० वर गेली. कर्मचारी संख्या रोडावल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. कोरोनानंतर शासनाने आरोग्य, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित ६२५ नवीन पदांना मंजुरी दिली होती. त्यामुळे आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदांची संख्या ७,७१७ वर पोहोचली. दरम्यान, २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी १४.४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. परंत शासनाने तो अव्यवहार्य ठरविला. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी महापालिकेने ९,०१६ पर्दाचा सुधारित आकृतिबंध तयार केला गेला. या आकृतिबंधास महासभेची मंजूरी घेतल्यानंतर हा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीपूर्वी शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. निवडणूक आचारसंहितेमुळे या प्रस्तावाची मंजूरी रखडली होती. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या प्रस्तावाच्या मंजुरी प्रक्रियेला चालना मिळू शकणार आहे. सुधारित आकृतिबंधात १९५३ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली असून, कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रह करण्यात आली आहेत.

प्रस्तावातील ठळक मुद्दे

• कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द
• सफाई कर्मचाऱ्यांची पदसंख्या १९९३ ‘जैसे थे’
• सफाई कर्मचाऱ्यांचे आउटसोर्सिंग करणार
• मुख्य अभियंत्यांसह अनेक पदांची नव्याने निर्मिती

आचारसंहितेनंतर नोकरभरती

सुधारित आकृतिबंधाला मंजुरीनंतर महापालिकेतील जम्बो नोकरभरतीचा मार्ग खुला होणार असला, तरी लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता आणि मवदिबाहेर गेलेला आस्थापना खर्च या नोकरभरतीसाठी अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतरच नोकरभरतीचा मार्ग खुला होऊ शकणार आहे.


Nashik Municipal Corporation Bharti 2024

सध्या नाशिक येथील अग्निशमन केंद्रे तर सोडाच शिकाऊ व मानधनावरील अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भरवशावर महापालिकेची अग्निशमन सेवा अवलंबून आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढत असताना पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेने १९९२ मध्ये अग्निशमन विभागाचे सक्षमीकरण सुरू केले. त्या वेळच्या लोकसंख्येचा विचार करता त्या वेळी सक्षम अशी अग्निशमन यंत्रणा होती. २०११ नंतर मात्र दुर्लक्ष होत गेले. २०११ च्या लोकसंख्येनुसार जी स्थिती अग्निशमन दलाची आहे. तीच स्थिती तेरा वर्षानंतरही कायम आहे. शहरात २५ मजल्याच्या वर इमारती बांधकाम सुरू झाले आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय व आरोग्य विभागाइतकीच अग्निशमन सेवा सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु अतिशय महत्त्वाच्या या सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यःस्थितीत ‘ड’वर्ग नगरपालिकाप्रमाणे अग्निशमन सुविधा आहे.

ही महत्त्वाची पदे आहेत रिक्त : फायरमन, लीडिंग फायरमन, चालक किंवा यंत्रचालक, वायरलेस ऑपरेटर, सब ऑफिसर्स, स्टेशन ऑफिसर, फायर ऑफिसर, डेप्युटी फायर ऑफिसर.

अग्निशमन सेवेतील त्रुटी

– एक लाख लोकसंख्या किंवा १० चौरस किलोमीटर मागे किमान एक अग्निशमन केंद्राचे प्रमाण आहे. सद्यःस्थितीत सहा अग्निशमन केंद्रे आहेत. प्रत्यक्षात लोकसंख्येचा विचार करता २२ केंद्रे हवीत.

– सहा केंद्रात २९९ इतके फायरमन मंजूर आहेत. परंतु सद्यःस्थितीत १८ फायरमन तर ६० लिडींग फायरमन कार्यरत आहे.

 


लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नुकताच मंजूर केलेला सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांना शासनाने मंजुरी दिल्यास डिसेंबरअखेर महापालिकेत मोठी भरती होण्याचे संकेत आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली आणावा लागणार आहे. ‘क’ वर्गात समावेश असलेल्या महापालिकेचा पहिला ७०९२ पदांचा आकृतिबंध १९९६ मध्ये मंजूर करण्यात आला. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या मात्र ३,३१४ वर गेली. महापालिकेची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली. मात्र कर्मचारी संख्या रोडावल्याने नागरीकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. कोरोनानंतर शासनाने आरोग्य, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित ६२५ नवीन पदांना मंजुरी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

त्यामुळे आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदांची संख्या ७७१७ वर पोचली. त्यापूर्वी २०१७ मध्ये १४,४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला. परंतु शासनाने आकृतिबंध अव्यवहार्य ठरविला. त्यानंतर सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी दिली. या सर्व विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे ९०१६ पदांचा एकत्रित प्रस्ताव प्रशासनाने तयार केला.

 

मागील आठवड्यात महासभेत मंजुरी देण्यात आली. पहिल्या आकृतिबंधात सफाई कर्मचाऱ्यांच्या १९९३ पदांना मंजुरी देण्यात आली होती. सुधारित आकृतिबंधात पदांची संख्या जैसे-थे ठेवण्यात आली. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने त्यापूर्वी प्रशासनाने मंजुरीसाठी आकृतिबंध सादर केला. शासन मान्यतेनंतर पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल.


नाशिक महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील एकूण पदांपैकी ४० टक्क्यांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तरी, राज्य शासनाने निर्धारित केलेल्या वेतनश्रेणीपेक्षा जादा देऊ केलेली वेतनश्रेणी, सातव्या वेतन आयोगाची सरसकट अंमलबजावणी, फरक वाटपाचे दायित्व, कंत्राटी कामगारांवरील वाढता खर्च आणि प्रशासकीय घडी बसविण्यात आलेले अपयश यामुळे महापालिकेचा आस्थापना खर्च तब्बल ४९ टक्क्यांवर गेला आहे. नोकरभरतीसाठी शासनाने ३५ टक्क्यांची मर्यादा घातल्याने महापालिकेतील रिक्त पदांच्या भरतीची दारे बंद झाली आहेत. आस्थापना खर्च नियंत्रणात आणण्यासाठी आता महापालिकेचे उत्पन्न वाढवावे लागणार आहे.

सन १९८२ मध्ये नाशिक महापालिकेची स्थापना झाल्यानंतर ‘क’ वर्गीय महापालिकांमध्ये नाशिकचा समावेश झाला. १९९५ मध्ये महापालिकेच्या ७०९२ पदांच्या आस्थापना परिशिष्टाला मंजुरी दिली गेली. गेल्या २४ वर्षांत महापालिकेत कुठलीही नोकरभरती झालेली नाही. दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील कर्मचारी संख्या ४ हजारांच्या घरात आली आहे. सुमारे तीन हजारांहून अधिक पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात शैथिल्य आले आहे. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरवितानादेखील अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील ५८७ पदांच्या नोकरभरतीला शासनाने मान्यता दिली होती. यासाठी आस्थापना खर्चाची अटही शिथिल करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ पर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणे अपेक्षित होते. परंतु या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी (दि.१६) सादर झाले. या अंदाजपत्रकातील जमा व खर्च बाजूच्या आकडेवारीनुसार महापालिकेचा आस्थापना खर्च ४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. नोकरभरतीसाठी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या आत ठेवण्याची शासनाची अट असल्यामुळे महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया आता राबविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रस्तावित नोकरभरतीकरिता आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी महापालिकेने पुन्हा शासनाकडे धाव घेतली आहे. शासनाच्या भूमिकेकडे महापालिकेचे लक्ष लागले आहे.

 

महापालिकेचा आस्थापना खर्च ४१ टक्क्यांवर पोचला असून पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत हा खर्च ५० टक्क्यांपर्यंत पोचणार आहे. अशात शासनाने आस्थापना खर्चाची शिथिल केलेली अट डिसेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आल्याने महापालिकेची दुसऱ्या टप्प्यातील नोकर भरती अडचणीत आली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर नाशिकमध्येही आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी शासनाकडे विनंती केली आहे. सन १९९५ मध्ये ७९२ पदांचा नाशिक महापालिकेचा पहिला आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर महापालिकेत भरती झाली नाही. टप्प्या-टप्प्याने कर्मचाऱ्यांची पदे रिक्त झाली. रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने आस्थापना खर्चाची अट टाकली. त्यानुसार पस्तीस टक्क्यांच्या वर आस्थापना खर्च असेल तर महापालिकेला भरती करता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. 

 

त्यानुसार महापालिकेला आतापर्यंत भरती करता आली नाही. महापालिकेचा सद्यस्थितीत आस्थापना खर्च ४१ टक्क्यांपर्यंत आहे. कोविड काळात राज्य शासनाने आस्थापना खर्चाची अट शिथिल केली होती. मात्र या कालावधीत प्रशासनाला वैद्यकीय व अग्निशमन या पदांची भरती करता आली नाही. सद्यस्थितीत भरतीसाठी प्रक्रिया सुरू आहे. टीसीएस या कन्सल्टिंग कंपनीसोबत नोकरभरतीसाठी करार केला आहे. परंतु डिसेंबर २०२३ अखेर आस्थापना खर्चाची दिलेली मुदत संपुष्टात आली आहे.

महापालिकेची शासनाकडे धाव : आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेला विशेष सूट दिली आहे. नाशिक महापालिकेलाही आस्थापना खर्चात सवलत द्यावी, यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. ”वैद्यकीय व अग्निशमन विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील नोकर भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी शासनाची नोंदणी लागणार आहे.”- लक्ष्मीकांत साताळकर, प्रशासन उपायुक्त, महापालिका.

 


महापालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची भरती डिसेंबरअखेर होणे अपेक्षित असताना पंतप्रधान मोदी यांचा दौरा तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याने भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यात आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने मे महिन्यानंतरच भरती प्रक्रियेला मुहूर्त लागेल. महापालिकेत जवळपास दोन हजार आठशे पदे रिक्त आहे. रिक्त पद भरण्यासाठी महापालिकेला महसुली खर्च ३५ टक्क्यांपर्यंत ठेवणे बंधनकारक आहे, मात्र महसुली खर्च ४१ टक्क्यांपर्यंत पोचत असल्याने शासनाने रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली नाही. मात्र कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून राज्य शासनाने वैद्यकीय व अग्निशामक विभागाला रिक्त पदे भरण्यास संमती दिली. 

 

दोन्ही विभागांची मिळून ७०६ पदे आहेत, मात्र अशा प्रकारची संमती देताना टीसीएस किंवा आयबीपीएस या संस्थेच्या मार्फतच भरतीच्या सूचना दिल्या. आयबीपीएसची क्षमता नसल्याने महापालिकेने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसकडे प्रस्ताव सादर केला. टीसीएसने प्रक्रिया सुरू केली आहे.

महापालिकेकडून आरक्षणनिहाय डाटा मागविण्यात आला आहे. दोन्ही विभागांची मिळून ७०६ पदे आहेत. यातील ‘ब’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता उर्वरित ६२४ पदांमधून अग्निशमन विभागातील ३७ ड्रायव्हरची पदे वगळली जाणार असल्याने एकूण ५८७ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकर भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सव्वीस प्रकारच्या विविध पदांसाठी आवश्यक उमेदवारांचे वय पात्रता आणि जाहिरात फॉर्मेट संदर्भात टीसीएसने माहिती घेतली. तांत्रिक प्रकारची सर्व माहिती महापालिकेने प्रशासनाला सादर केली. त्यानंतरही मात्र भरती होत नाही. जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला, त्यात पुन्हा महापालिकेने डीप क्लीन मोहीम राबवली. त्यानंतर मराठा समाजाचे आर्थिक स्थिती अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले. २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षणासाठी मुदत आहे. सर्वेक्षण झाले तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

त्या कालावधीमध्ये परीक्षा घेता येणार नसल्याने निवडणुकीनंतरच भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यातही पुन्हा २ ते ३ महिने भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्यास पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल.

 


शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा सुविधांचाही ताण महापालिकेवर वाढला आहे. १९९५ मध्ये महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या आस्थापना परिशिष्टाला शासनाने मंजुरी दिली होती. ‘क’ संवर्गातील नाशिक महापालिकेची ‘ब’ संवर्गात पदोन्नती झाली. त्यानुसार कर्मचारी संख्याही वाढणे अपेक्षित असताना दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. जेमतेम ४,१०० कर्मचाऱ्यांच्या भरवशावर महापालिकेच्या कामकाजाचा गाडा हाकला जात आहे. त्यातही १,७५० पदे ही सफाई कर्मचाऱ्यांची आहेत. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सुधारित आकृतिबंध शासनाला सादर करण्याची तयारी केली जात आहे. मात्र, आकृतिबंधाचे सादरीकरण व त्यास शासनाची मंजुरी या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

 

कोरोना काळात तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. यातील डॉक्टरांची ८२ पदे वगळता उर्वरित पदे भरतीसाठी महापालिकेने शासनाच्या निर्देशांनुसार टीसीएस कंपनीची निवड केली आहे. टीसीएसमार्फत करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सरळसेवा पदभरती संदर्भातील इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. अशी आहे निवड समिती – आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखालील कर्मचारी निवड समितीत मनपातील अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त (कर) श्रीकांत पवार, मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हे सदस्य आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी म्हणून सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते, तर अल्पसंख्याक प्रतिनिधी म्हणून उपअभियंता महंमद एजाज काझी यांची नियुक्ती झाली आहे. उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

 

TCS च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या महापालिकेतील नोकरभरतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सरळसेवा भरतीसंदर्भातील इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी अर्ज अंतिम करण्यात आला असून, लवकरच जाहिरात प्रसिध्द होईल.

 


Nashik Mahanagarpalika Bharti 2024 – In 1995, a draft of 7,092 posts belonging to various cadres was approved for the civic body. At that time, Nashik Municipal Corporation was in Class C. Due to the increase in population, the municipality was also promoted from Class C to Class B. But in comparison to the growing population, the workforce decreased rather than increased. At present, around 3,000 posts in the civic body are lying vacant due to monthly retirement and voluntary retirement. The administration has also taken up the task of preparing the revised framework. Meanwhile, the government approved filling up of posts in medical, health and fire departments as an emergency during the pandemic. This paved the way for recruitment of 706 posts, including 348 in the fire department and 358 in the medical department. Tcs is recruiting 587 posts, excluding 121 posts in the doctor cadre and 39 other posts. For this, the work of creating software applications and payment gateways was completed. Interested candidates will be subjected to a written test. TCS had also taken up the task of preparing the question paper for this. For this, various posts from the Municipal Corporation.

 

महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांच्या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी (TCS)ने संवर्गनिहाय प्रश्नपत्रिका तयार केली असून, महापालिका प्रशासनाच्या अवलोकनानंतर संभाव्य त्रुटी दुरुस्ती करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे. महापालिकेसाठी १९९५ मध्ये विविध संवर्गातील ७०९२ पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी नाशिक महापालिका क वर्गात होती. लोकसंख्या वाढल्याने महापालिकेचीही क वर्गातून ब वर्गात पदोन्नती झाली. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारीसंख्या वाढण्याऐवजी कमी होत गेली. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे सद्यस्थितीत महापालिकेतील सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. प्रशासनाने सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे. या दरम्यान, कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. डॉक्टर संवर्गातील ८२, तर अन्य ३९ अशा एकूण १२१ पदे वगळता ५८७ पदांची भरती टीसीएसमार्फत केली जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण केले आले. इच्छुक उमेदवारांची संर्वगनिहाय लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही टीसीएसने हाती घेतले होते. यासाठी महापालिकेकडून विविध पदांशी निगडित परीक्षेचा अभ्यासक्रम मागून घेण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून, प्रश्नपत्रिकेचे विविध नमुने तयार करण्यात आले असून, त्यातील एक प्रशासनाकडून अंतिम केला जाईल. टीसीएसकडून आलेल्या प्रश्नावलीच्या मसुद्यातील त्रुटी दुरुस्त करून त्यानंतर परीक्षा संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. 

 

कोरोनाचे कारण देत महापालिकेतील या नोकरभरतीला शासनाने परवानगी दिली असली तरी यातील ८२ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया राबविण्याचे टीसीएसला अधिकार नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून डॉक्टर पदांची भरती करावी लागणार आहे. यासाठी महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. मात्र, शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळू न शकल्याने डॉक्टर भरतीप्रक्रिया रखडली आहे.

असे असणार परीक्षा शुल्क
अर्जदारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. दहा हजारांपर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे. दहा हजार ते पन्नास हजार मिळाले परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे. एक लाखापर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये, असा दर आकारला जाईल. दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे.


Nashik Mahanagarpalika Bharti 2023 – Preparations for the recruitment of 587 posts in fire and health and medical departments of the municipal corporation are now in the final stage. The number of cadre-wise reserved seats for recruitment has been fixed and online facility will be provided to the candidates through TCS to fill the application form. The sample of the recruitment application will be submitted by TCS to the administration in the next two-three days. Commissioner Sources in the administration department said the advertisement for the actual job will be published after Ashok Karanjkar confirms it.

 

महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य-वैद्यकीय विभागांतील ५८७ पदांच्या नोकरभरतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी संवर्गनिहाय आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आली असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी टीसीएसच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसमार्फत येत्या दोन-तीन दिवसांत प्रशासनाला सादर केला जाणार आहे. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकरभतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

 

नाशिक महापालिकेची आठ वर्षांपूर्वी ‘क’ संवर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली असली, तरी महापालिकेचे मंजूर आस्थापना परिशिष्ट पूर्वीच्या ‘क’ संवर्गानुसार आहे. त्यानुसार महापालिकेत ७,०९२ पदे मंजूर असली तरी, सध्या यातील तीन हजार पदे ही सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या नवीन आकृतिबंधाची तयारी पालिकेकडून सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोना काळात राज्यशासनाने क संवर्गातील परिशिष्टानुसार, तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय विभागांच्या ७०६ पदांना भरतीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिली होती. शासन निर्देशांनुसार महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएसला काम देण्यात आले आहे.

ब ते ड संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाऊ शकते. अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता, उर्वरित ६२४ पदांमधून अग्निशमन विभागातील ३७ ड्रायव्हरची पदे वगळली जाणार आहे. त्यामुळे एकूण ५८७ पदांसाठी टीसीएसमार्फत नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी महापालिका आणि टीसीएसमध्ये कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भरती केली जाणाऱ्या २६ संवर्गांतील ५८७ पदांकरिता आरक्षण निश्चितीही करण्यात आली आहे. यात जातिनिहाय आरक्षित पदे, पदवीधर, दिव्यांग, क्रीडा, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी राखीव पदांची निश्चिती करण्यात आली असून, त्यानुसार पदभरती केली जाणार आहे.

महापालिकेतील या नोकरभरतीसाठी टीसीएच्या माध्यमातून आॉनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी वेबसाइटचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. नोकरभरतीच्या अर्जाचा नमुना टीसीएसकडून प्रशासनाला येत्या दोन-तीन दिवसांत सादर केला जाणार आहे. आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमदेवारांना निर्धारित मुदत दिली जाईल. या मुदतीनंतर संवर्गनिहाय पद भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल.


 

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : As per the directions of the state government, the BMC has prepared a revised draft of 9,000 posts of officers and employees in various cadres and this figure will be submitted to the urban development department of the state government for approval before Diwali. Meanwhile, a meeting of department heads has been convened at 11 am on Thursday at the chamber of Additional Commissioner Pradeep Chaudhary regarding the plan, Nashik Mahanagarpalika Bharti 2023.

 

राज्य शासनाच्या निर्देशांनुसार महापालिकेने विविध संवर्गनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध तयार केला असून, दिवाळीपूर्वी हा आकृतिबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीस्तव सादर केला जाणार आहे. दरम्यान, या आराखड्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या दालनात गुरुवारी(दि.२६) सकाळी ११ वाजता खातेप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली आहे. 


 

 Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “General Surgen, Physicians, Gynaecologist, Pediatrician, Radiologist, Dermatologist, Anesthetist, ENT Specialist, Psychiartist, Dentist, Part Time Medical Officer, Full Time Medical Officer, Staff Nurse, ANM” posts. There are a total of 96 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 26th of October 2023. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in. . More details about Nashik Mahanagarpalika Bharti 2023, NMC Bharti 2023are as follows:-

नाशिक महानगरपालिका अंतर्गत “जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, भूलतज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम” पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.

 • पदाचे नाव –  जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोगतज्ञ, भूलतज्ञ, ईएनटी विशेषज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम
 • पदसंख्या96 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३. रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  26 ऑक्टोबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in

Nashik Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
जनरल सर्जन  02 पद
फिजिशियन 04 पदे
स्त्रीरोगतज्ञ 05 पदे
बालरोगतज्ञ 05 पदे
रेडिओलॉजिस्ट 02 पदे
त्वचारोगतज्ञ 02 पदे
भूलतज्ञ 02 पदे
ENT स्पेशलिस्ट 02 पदे
मानसोपचारतज्ज्ञ 01 पद
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 10 पदे
आयुष्य वैद्यकीय अधिकारी 20 पदे
दंतवैद्य 03 पद
स्टाफ नर्स 20 पदे
एएनएम 20 पदे

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल सर्जन  MD/DNB
फिजिशियन MD/DNB
स्त्रीरोगतज्ञ MD/DNB
बालरोगतज्ञ MD/DNB
रेडिओलॉजिस्ट MD/DNB
त्वचारोगतज्ञ MD/DNB
भूलतज्ञ MD/DNB
ENT स्पेशलिस्ट MD/DNB
मानसोपचारतज्ज्ञ MD/DNB
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS
आयुष्य वैद्यकीय अधिकारी BAMS
दंतवैद्य BDS
स्टाफ नर्स B.Sc Nursing/GNM
एएनएम ANM

Salary Details For Nashik Mahanagarpalika Notification 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
जनरल सर्जन  75,000/-
फिजिशियन 75,000/-
स्त्रीरोगतज्ञ 75,000/-
बालरोगतज्ञ  75,000/-
रेडिओलॉजिस्ट 75,000/-
त्वचारोगतज्ञ 75,000/-
भूलतज्ञ 75,000/-
ENT स्पेशलिस्ट 75,000/-
मानसोपचारतज्ज्ञ 75,000/-
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 60,000/-
आयुष्य वैद्यकीय अधिकारी 40,000/-
दंतवैद्य 30,000/-
स्टाफ नर्स 20,000/-
एएनएम 18,000/-

How To Apply For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

 • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 ऑक्टोबर 2023 आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmc.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/alFW3
✅ अधिकृत वेबसाईट
https://nmc.gov.in/

Nashik Mahanagarpalika Bharti 2023:  There are five major municipal hospitals in the city, including Bitco, Dr Zakir Hussain, Indira Gandhi Hospital, Sri Swami Samarth Hospital and Tapavan. There is always a rush for treatment at this place. A total of 933 posts are sanctioned in the health department, out of which 463 posts are vacant. Only 470 people are working on the hospital and the extra stress is affecting the service. The bmc will recruit 706 posts of technical, health and medical at Nashik Mahanagarpalika Bharti 2023. But the recruitment of ‘A’ cadre posts was done through the Maharashtra Public Service Commission. Therefore, apart from 82 posts of medical officers, other posts of health will be filled. But there are signs of the new year. However, at present, the health department is facing a lot of problems due to lack of human power. He has decided to fill up the posts of 96 doctors in different cadres immediately for six months and the proposal will be sent to the commissioner for approval immediately. Their salaries will be increased to six months at a cost of Rs 2.5 crore.

 

Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Livestock Supervisor, Livestock Development Officer” posts. There are a total of 07 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 26th of September 2023. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in. . More details about Nashik Mahanagarpalika Bharti 2023, NMC Bharti 2023are as follows:-

There is a good news for the people of Nashik. There is a golden opportunity for you if you want to work in Municipal Corporation. Nashik Municipal Corporation animal conservation department recruitment process is being implemented. A total of 7 vacant posts of Livestock Supervisor, Livestock Development Officer will be filled under this recruitment. Applications are invited from eligible and interested candidates for these posts. Apply for this recruitment through offline mode and the last date to apply is 26 September 2023. Livestock Supervisor – Must have a Veterinary degree from a recognized university. Also it is necessary to be retired from government service as Livestock Supervisor or Supervisor.  The detailed details of this recruitment are as follows.

Nashik Municipal Corporation Bharti 2023 Details

✅Name of Department Nashik Municipal Corporation
✅Recruitment Details Nashik Mahanagarpalika Bharti 2023
✅Name of Posts Livestock Supervisor, Livestock Development Officer
✅ No of Posts 07 vacancies
✅ Job Location Nashik
✍? Application Mode Offline
✉️ Address  Read PDF
✅ Official WebSite nmc.gov.in

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

Livestock Supervisor (Refer PDF)
Livestock Development Officer (Refer PDF)

Age Criteria For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

Age Limit  Read PDF

Nashik Municipal Corporation Recruitment Vacancy Details

Livestock Supervisor 06
Livestock Development Officer 01

All Important Dates | nmc.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  26th of September 2023

Nashik Municipal Corporation Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

28 Comments
 1. Ragini khare says

  Mahabhart kadhi chalu honar aahe 2024

 2. MahaBharti says

  NMC Nashik Mahanagar Palika Bharti 2023, Latest Updates & Details.

 3. अजय विजय चव्हाण says

  नाशिक महानगरपालिका भरती कधी सुरू होणार?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड