नाशिक महापालिका अंतर्गत २ हजार ७०० पदांच्या भरती लवकरच सुरु होणार!- Nashik Mahanagarpalika Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

 

रखडलेल्या महापालिकेतील नोकर भरतीला गती येणार असून लवकरच ४९ विभाग त्यांचा आकृतिबंध महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना सादर करणार आहे. दरम्यान कोणत्या विभागानुसार शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसात महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा श्री गणेशा होणार आहे. नोकर भरती प्रक्रिया पुढच्या काही दिवसात सुरु होऊन महापालिकेत नोकर भरतीची प्रकिया सुरु असून लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

महापालिकेत मागील तब्बल चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. याचा मोठा फटका पालिकेच्या कामकाजावर होतो आहे. नोकर भरतीसाठीचे काम टीसीएस कंपनीला देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाकडून प्रारंभी आरोग्य, अग्निशमन या विभागातील ७०६ पदांसाठी भरती करणार आहे. ही भरती झाल्यानंतर उर्वरीत पदांकरिता नोकर भरती होइल.  यापूर्वी महानगरपालिकेने भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे १४ हजार रिक्त जागांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला होता. परंतु महापालिकेने पाठविलेल्या आकृतीबंधात अनेक त्रुटी आढळल्या. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यावर पालिकेवर ताण वाढेल. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे शासनाने हा आकृतीबंध पुन्हा महापालिकेला पाठवत त्रुटी दूर करुन नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अंतिम आकृतीबंध तयार करुन तो आयुक्तांना सादर करुन शासनाच्या नगररचना विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल.



नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

दरम्यान महापालिकेची हद्द दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरवासियांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. महानगरपालिकेच्या जवळपास साडे सात हजार कर्मचाऱ्यांपैकी आज मितीस तीन ते चार हजारांच्या आसपास कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे नाशिककरांना उपलब्ध मनुष्यबळात सोयीसुविधा देताना महापालिकेवरील ताण वाढला आहे. कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने दिसत आहे.

 


Nashik Mahanagarpalika Bharti 2023: Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Livestock Supervisor, Livestock Development Officer” posts. There are a total of 07 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 26th of September 2023. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in. . More details about Nashik Mahanagarpalika Bharti 2023, NMC Bharti 2023are as follows:-

There is a good news for the people of Nashik. There is a golden opportunity for you if you want to work in Municipal Corporation. Nashik Municipal Corporation animal conservation department recruitment process is being implemented. A total of 7 vacant posts of Livestock Supervisor, Livestock Development Officer will be filled under this recruitment. Applications are invited from eligible and interested candidates for these posts. Apply for this recruitment through offline mode and the last date to apply is 26 September 2023. Livestock Supervisor – Must have a Veterinary degree from a recognized university. Also it is necessary to be retired from government service as Livestock Supervisor or Supervisor.  The detailed details of this recruitment are as follows..

नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग अंतर्गत “पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नावपशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी
  • पदसंख्या07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख26 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in

Nashik Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
पशुधन पर्यवेक्षक 06
पशुधन विकास अधिकारी 01

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पशुधन पर्यवेक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण असणे आवश्यक
पशुधन विकास अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची | पशुवैदयकीय शाखेची पदवी

Salary Details For Nashik Mahanagarpalika Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
पशुधन पर्यवेक्षक रू. २५,०००/-
पशुधन विकास अधिकारी रू.४०,०००/-

How To Apply For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2023 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Nashik Municipal Corporation Vacancy 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील, नोटीस बोर्ड मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, नोटीस बोर्ड, मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक येथे लावण्यात येईल.
  • मुलाखतीतस पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही.
  • अर्ज छाननी अंती पात्र ठरणा-या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल.
  • मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ निवृत्ती झाल्याचा दाखला/पत्रा सह उपस्थितीत रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmc.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/alFW3
✅ अधिकृत वेबसाईट
https://nmc.gov.in/

 

Nashik Municipal Corporation Bharti 2023 Details

✅Name of Department Nashik Municipal Corporation
✅Recruitment Details Nashik Mahanagarpalika Bharti 2023
✅Name of Posts Livestock Supervisor, Livestock Development Officer
✅ No of Posts 07 vacancies
✅ Job Location Nashik
✍? Application Mode Offline
✉️ Address  Read PDF
✅ Official WebSite nmc.gov.in

Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

Livestock Supervisor (Refer PDF)
Livestock Development Officer (Refer PDF)

Age Criteria For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

Age Limit  Read PDF

Nashik Municipal Corporation Recruitment Vacancy Details

Livestock Supervisor 06
Livestock Development Officer 01

All Important Dates | nmc.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  26th of September 2023

Nashik Municipal Corporation Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

Nashik Municipal Corporation Recruitment 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023:After Chief Minister Eknath Shinde announced to fill the posts of 75 thousand officers and employees across the state on the occasion of Amrit Mahotsav year of Independence, Nashik Municipal Corporation also got relaxation from the condition of establishment expenditure limit. But the recruitment could not be done. Now this term is coming to an end on December 2023 and considering the fact that the Municipal Corporation is likely to face difficulty in recruitment. The Commissioner has ordered that since the establishment expenditure limit condition is relaxed till December 2023, the posts for which the point list has been checked by the Backward Class Cell of the Government should be processed urgently.

वाढता आस्थापना खर्च लक्षात घेता अत्यावश्यक असलेलीच पदे भरण्याबाबत खातेप्रमुखांनी शिफारस करावी, असे स्पष्ट आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत आस्थापना खर्च मर्यादा अट शिथिल असल्यामुळे ज्या पदाची बिंदू नामावली शासनाच्या मागासवर्ग कक्षाकडून तपासली गेली आहे, अशा पदांची पदभरती तातडीने करणे शक्य असल्यामुळे त्याबाबत तातडीने प्रक्रिया करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

७०९२ पदे मंजूर

आयुक्त तथा प्रशासक डॉ. करंजकर यांनी नोकरभरतीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. यासंदर्भात खातेप्रमुखांच्या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेतील रिक्त पदांचा आढावा घेतला. यात सरळसेवेतील अनेक पदे भरली गेली नसल्याचे समोर आले. महापालिकेचा आकृतीबंध ‘क’ वर्गानुसार असून सुमारे ७०९२ पदे मंजूर असताना सद्यस्थितीत साडेचार हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जवळपास गेल्या २४ वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती झालेली नसून, त्या मागचे प्रमुख कारण म्हणजे आस्थापना खर्च हा ३५ टक्के पेक्षा अधिक आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात ७५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत घोषणा केल्यानंतर नाशिक महापालिकेलाही आस्थापना खर्च मर्यादेच्या अटीमधून शिथिलता मिळाली. मात्र नोकरभरती होऊ शकली नाही. आता ही मुदत डिसेंबर २०२३ ला संपुष्टात येत असून महापालिकेला त्यामुळे नोकरभरतीत अडचण येण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेत आयुक्त करंजकर यांनी आवश्यक असलेली कमीत कमी पदे भरण्याबाबत शिफारस करण्याच्या सूचना खातेप्रमुखांना दिल्या आहेत.

यामुळे रखडला सुधारित आकृतीबंध..

शासन निर्देशानुसार महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधासाठी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत पडताळणी झाल्यानंतर दहा विभागांच्या आकृतीबंधास आयुक्तांची मान्यता मिळून ते अंतिम झाले आहेत. ३० विभागांचे आकृतीबंध समितीवर ठेवून निर्णय घेणे अपेक्षित असून ९ विभागांकडून अद्यापही आकृतीबंधाचा मसुदा आलेला नाही. त्यामुळे संबंधित विभाग प्रमुखांनी दोन ते तीन दिवसांत ही कारवाई पूर्ण करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

मानधनावर भरतीसाठी हालचाली

दरम्यान एकीकडे सरळसेवेने भरती प्रक्रिया राबविताना मानधनावर कर्मचारी भरण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधित विभागांनी प्रशासन विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. नोकर भरतीसाठी प्रशासनामार्फत वेगाने प्रयत्न सुरू झाले असून पदभरती करता आवश्यक आयआरडी फॉर्म भरून विभाग प्रमुखांनी आपली स्वाक्षरी करून दोन ते तीन दिवसांत सामान्य प्रशासन शाखेत सादर करावा, असेही आदेश दिले आहेत.


Nashik Municipal Corporation Bharti 2023 Update

Nashik Mahanagarpalika Bharti 2023:The much awaited recruitment process of 11 departments of Nashik Municipal Corporation will finally start next month. Along with 704 posts in fire and health department, the technical completion of recruitment of 2,500 vacancies in other departments is going on, and for this it will take four weeks i.e. one month. Therefore, it is likely that the online application will be invited by publishing the recruitment advertisement in the first or second week of August.

The way for the mega recruitment process was cleared after the General Assembly approved the proposal for the entry rules for 11 departments in the Municipal Corporation. However, the entire process was stalled due to a controversy over the agency conducting the recruitment process.

नाशिक महापालिकेच्या ११ विभागांच्या बहुप्रतिक्षित भरतीप्रक्रियेला अखेर पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे. अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ पदांसोबतच इतर विभागांतील अडीच हजार रिक्तपदांच्या भरतीबाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू असून, यासाठी चार आठवड्यांचा म्हणजेच साधारणत: एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आॅनलाइन अर्ज मागविले जाण्याची शक्यता आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महापालिकेतील ११ विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर मेगाभरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या एजन्सीवरून वादंग निर्माण झाल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान, राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच भरती होणार असल्याचे स्पष्ट केल्याने भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आस्थापन परिशिष्टावर तब्बल सात हजार घ्यायची पदे मंजूर असून, त्यातील २,८०० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच टेबलवर दोन ते तीन टेबलचे काम सुरू असल्याने, कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नसल्याने, मनपा प्रशासनही भरतीसाठी आग्रही आहे.


Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Lawyer” posts. There are a total of 03 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 24th of July 2023. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

Nashik Municipal Corporation Bharti 2023

नाशिक महानगरपालिका, विधी विभागात विविध न्यायाधिकरणांकरिता विशेष मनपा पॅनल तयार करावयाचे आहे. अर्हता धारक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज, जाहिरात इत्यादी तपशीला करीता भेट द्यावी व दिनांक २४/०७/२०२३ पावेतो अर्ज करावेत. केवळ जाहिरातीत नमूद विविध न्यायाधिकरणात काम केलेल्या विधिज्ञांनीच अर्ज करावा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nashik Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वकील 03 पदे

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वकील विधी शाखेत पदव्यतुर परीक्षा एल. एल. एम. (LLM) पदवी धारक असावा.

NMC Recruitment 2023 – Important Documents

  1. आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षाचे किमान १ ते २ न्यायनिवाडे
  2. वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत
  3. सनद प्रत
  4. आधार कार्ड
  5. पॅन कार्ड
  6. शैक्षणिक प्रमाणपत्र इ

How To Apply For NMC Bharti 2023

१) मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ४/०७/२०२३ ते दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत.

२) मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार करण्यात येणार नाही.

(३) अजांचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना झुऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

४) सोबत दाखल करावयाचे दस्तऐवज आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षांचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत, सनद प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/hvJOT
✅ अधिकृत वेबसाईट
nmc.gov.in


Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : Out of total seven hundred and four posts in fire and medical cadre, 587 posts in ‘B’ cadre will be filled through outsourcing. For this, Tata Consultancy Services has been appointed by Nashik Municipal Corporation. The recruitment process is likely to start from the end of July. But since the post of doctor in medical department and some other cadres, total 84 posts are in ‘A’ category, such posts are going to be recruited through State Public Service Commission. Earlier guidance has been sought from the state government. The Municipal Service Entry Rules have been approved, and accordingly, the work of preparing the revised structure of posts in various cadres has been undertaken. The proposal for point list of various categories of 13 cadre posts in the total cadre has been submitted for the approval of the Divisional Commissioner.

 महापालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली असून, त्याअनुषंगाने विविध संवर्गातील पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण संवर्गातील विविध प्रकारच्या १३ संवर्गातील पदांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदे भरण्यास परवानगी

महापालिका ‘क’ संवर्गातून ‘ब’ संवर्गात समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु ‘ब’ संवर्गात समाविष्ट करताना विविध पदांचा आकृतिबंध अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. जुन्या संवर्गातील पदानुसारच अद्यापही काम सुरू आहे. ‘क’ संवर्गातील आस्थापना परिशिष्टानुसारच ‘ब’ संवर्गात पदे कार्यरत आहे.

२८०० पदे रिक्त

पूर्वीचा आस्थापना परिशिष्ट सात हजार ९२ पदांचा आहे. त्यानंतर राज्य शासनाने कोरोना कालावधीमध्ये अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने सद्यःस्थितीत सात हजार ७१७ पदे मंजूर आहेत. निवृत्तीसाठी कारणांमुळे सध्या २८०० पदे रिक्त आहेत. कोविडकाळात राज्य शासनाने परवानगी दिलेल्या अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील पदांची भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेसमार्फत राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला सेवा व प्रवेश नियमावली मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दोन महिन्यापूर्वी महासभेने मंजुरी दिली. त्याचबरोबर ‘ब’ संवर्गानुसार सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी तीन महिन्यांच्या आत सादर करण्याच्यादेखील सूचना दिल्या. प्रशासनाकडून शासनाला आकृतिबंध सादर केला जाणार आहे.

त्यापूर्वी बिंदू नामावलीला मंजुरी द्यावयाच्या शिल्लक तेरा संवर्गाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांकडून बिंदू नामावलीला मंजुरी मिळाल्यास भरतीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण पदांपैकी ४४ पदांमध्ये वाढ होईल. महापालिकेतील मंजूर आस्थापना परिशिष्टानुसार २१० संवर्ग आहे. सुधारित आकृती बंध तयार झाल्यानंतर संवर्गांची संख्या वाढणार आहे. तर गंगा पट्टेवाले संवर्ग सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट होईल , तसेच वॉचमन ही पदेदेखील सुरक्षा रक्षक संवर्गात समाविष्ट होणार आहे.

अग्निशमन व वैद्यकीय संवर्गातील एकूण सातशे चार पदांपैकी ‘ब’ संवर्गातील ५८७ पदे आउट सोर्सिंगच्या माध्यमातून भरली जाणार

अग्निशमन व वैद्यकीय संवर्गातील एकूण सातशे चार पदांपैकी ‘ब’ संवर्गातील ५८७ पदे आउट सोर्सिंगच्या माध्यमातून भरली जाणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलैच्या अखेरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होण्याची शक्यता आहे.

मात्र वैद्यकीय विभागातील डॉक्टर या पदासह अन्य काही संवर्गातील एकूण ८४ पदे ही ‘अ’ संवर्गातील असल्याने अशी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जाणार आहे. यापूर्वी राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.


Nashik Mahanagarpalika Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023: Nashik Mahanagarpalika is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Garden inspector”. Eligible candidates can apply offline before the last date. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; मिळणार भरपूर पगार!!

Nashik Municipal Corporation is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Applications are invited for the “Garden inspector” posts. There are a total of 07 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Nashik. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 13th of June 2023. For more details about NMC Recruitment 2023, Nashik Municipal Corporation Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

Nashik Municipal Corporation Bharti 2023

नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग अंतर्गत “उद्यान निरीक्षक” पदे मानधन पध्दतीने भरण्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व संबधित उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण करत असल्यास आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात प्रसिध्द झालेल्या तारखेपासुन जाहिरातीमध्ये विहित नमुन्यातील असलेला अर्ज / संकेतस्थळावर प्रसिध्द केलेला विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करुन सादर करावा. अर्ज कार्यालयीन सुटी व सार्वजनिक सुटटी वगळुन सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यत स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख दि. १३/०६/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. परंतु अर्ज स्विकारणेच्या अंतिम वेळेबाबत स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचा अधिकार निवड समितीस असेल. जाहिरात मुदतीत प्राप्त अर्जाची छानणी करुन यादी मुलाखतीसाठी मनपाच्या नोटिस बोर्डवर तसेच मनपाच्या www.nmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्या दिवशी मुलाखतीच्या बाबत गुणपत्रिका तयार करुन पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटिस बोर्डवर व www.nmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

  • पदाचे नावउद्यान निरीक्षक
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताउद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड,नाशिक.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्तामुलाखतीचे ठिकाण :- सकाळी १०.०० ते ५.०० दि. २८/०६ / २०२३ रोजी स्थायी समिती, मिटींग हॉल २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक
  • मुलाखतीची तारीख – 28 जुन 2023
  • अधिकृत वेबसाईट – nmc.gov.in

Nashik Mahanagarpalika Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
उद्यान निरीक्षक 07 पदे

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 

पदाचे नाव पद संख्या 
उद्यान निरीक्षक बी.एस्सी. (कृषी) अथवा बी.एस्सी (उद्यानविद्या अथवा बी. एस्सी (फॉरेस्ट्री) ( नियमित ४ वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेले)

Salary Details For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
उद्यान निरीक्षक Rs. 30,000/- per month

Nashik Mahanagarpalika Vacancy details 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

NMC Recruitment 2023 – Important Documents

  1. पासपोर्ट साईज फोटो-२
  2. जन्म तारखेकरीता (वयाचा दाखला/ दहावीचे टि.सी./जन्मपत्र) आयडी- मतदान ओळख पत्र / आधार कार्ड इ. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची / अंतीम गुणपत्रिका
  3. अनुभवाचे प्रमाणपत्र
  4. मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्रे मुळ सत्य प्रत, सांक्षाकित प्रत.

How To Apply For NMC Bharti 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुन 2023 आहे.
  • अर्ज कार्यालयीन सुटी व सार्वजनिक सुटटी वगळुन सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यत स्विकारण्यात येतील.
  • यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज स्विकारण्याचे ठिकाण व वेळ :- उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड,नाशिक. वेळ सकाळी १०.०० ते ५.००
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Selection Process For NMC Recruitment 2023

  1. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग मनपा, नाशिक अंतर्गत भरण्यात येणाऱ्या सर्व उद्यान निरीक्षकांची निवड मुलाखत पध्दतीने करण्यात येईल.
  2. अर्जाची छाननी झाल्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळील, नोटिस बोर्ड, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक येथे लावण्यात येईल.
  3. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. २८/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० वेळेत घेण्यात येतील.
  4. मुलाखतीस पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविणेत येणार नाही.
  5. मुलाखतीचे ठिकाण :- सकाळी १०.०० ते ५.०० दि. २८/०६ / २०२३ रोजी स्थायी समिती, मिटींग हॉल २ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक
  6. मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्रे व सर्व प्रमाणपत्रांची सांक्षाकित सत्य प्रतीसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे.
  7. अर्ज छाननीअंती पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेश देण्यात येईल. पात्रतेसाठी एकुण १०० गुण असतील व त्याची विभागनी खालील प्रमाणे असेल.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details

🆕 Name of Department Nashik Municipal Corporation (NMC)
📥 Recruitment Details NMC Recruitment 2023
👉 Name of Posts Garden inspector
🔷 No of Posts 07 Vacancies
📂 Job Location Nashik
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  Department of Parks and Trees Authority 2nd Floor, Municipal Headquarters, Rajiv Gandhi Bhawan, Sharanpur Road, Nashik.
✅ Official WebSite nmc.gov.in

Educational Qualification For Nashik Municipal Corporation Recruitment 2023

Garden inspector B.Sc. (Agriculture) or B.Sc (Horticulture) or B.Sc (Forestry) (Completed regular 4 year course)

Age Criteria For Nashik Mahanagarpalika Jobs 2023

Age Limit 45 years

Nashik Mahanagarpalika Vacancy

Garden inspector 07 Vacancies

All Important Dates For Nashik Municipal Corporation Recruitment

⏰ Last Date  13th of June 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nmc.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/hvJOT
📑 PDF जाहिरात (शुद्धिपत्रक) https://shorturl.at/INRT5
✅ अधिकृत वेबसाईट
nmc.gov.in

Previous update –

Nashik Mahanagarpalika Bharti 2023: Finally, the agreement has been finalized with the signing of the agreement by TCS organization. The agreement to be made with TCS, a government recognized organization, for the recruitment process of 7-0 vacant posts in Nashik Municipal Corporation for Health Medical and Fire Department has finally been finalized.

नाशिक महापालिकेमध्ये ७०९० पर्यंतचा पहिला आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळाल्याने नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जवळपास दुप्पट म्हणजे १४७१५ पदांचा आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. पूर्वीच्या ७०९० पदांपैकी जवळपास २८०० पदे सेवानिवृत्ती व अन्य कारणांमुळे रिक्त झाली आहे. त्यामुळे महापालिकेत रिक्त पदांची संख्या वाढली आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन टेबल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. दरम्यान, कोविड पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय विभागातील जवळपास ७०६ पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे.

महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही. अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु, भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्यात अशा स्पष्ट सूचना दिल्या. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांना भरतीचे अधिकार दिले. टीसीएस पहिल्यांदा नकार तर आयबीपीएसने महापालिकेला होकार कळविला. टीसीएस कंपनीच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा झाल्यानंतर कराराचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला. त्या मसुद्याला महासभेची मंजुरी घेऊन टीसीएस समवेत करार करण्यात आला. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु कोविडकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्तींचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार दिला. त्यानंतर टीसीएसकडे महापालिकेच्या वतीने प्रस्ताव सादर करण्यात आला.

प्रक्रिया पूर्ण
आगामी तीन वर्षांसाठी टीसीएस सोबत करार करताना भरतीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. कंपनीकडून प्रोजेक्ट मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली. टीसीएस कंपनी समवेत नोकरभरतीच्या करारानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी नोकर भरतीला सुरवात होईल.


मात्र अद्याप तो आराखडा मंजूर झालेला नाही. नियमित रिक्तपदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली आहे. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्तपदांची भरती करू नये. अशा स्पष्ट सूचना आहेत.

परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८ तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला.

परंतु भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांच्या माध्यमातूनच भरती करता येणार आहे. महापालिकेने दोन्ही कंपन्यांना सुरवातीला निमंत्रित केले. परंतु टीसीएसने नकार दिल्यानंतर ‘आयबीपीएस’ ने नोकर भरतीसाठी होकार कळविला. परंतु, आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता आणि अटी व शर्तींचा विचार करता आयबीपीएस कंपनीला नकार देण्यात आला.

 


अशी पार पडली प्रक्रिया
अखेर या संस्थेने करारनाम्यावर स्वाक्षरी केल्याने करारनामा अंतिम झाला आहे. यामुळे जून महिन्यापासून साधारणपणे भरती प्रक्रियेच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात होण्याची शक्यता प्रशासन विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. राज्य शासनाने भरती प्रक्रिया राबविण्याकरता शिफारस केलेल्या टीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्थांना नाशिक मनपा प्रशासनाने प्राधान्य दिले होते. त्यापैकी आयबीपीएसला भरतीचा प्रस्ताव दिल्यानंतर या संस्थेने नकार दिला. त्यानंतर टीसीएस या संस्थेबरोबर आता मनपाचा करारनामा पूर्ण झाला आहे.

सात हजार पदे मंजूर; जवळपास अडीच हजार जागा रिक्त 

महापालिकेच्या आस्थापनेवर सात हजार पदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास अडीच हजार जागा रिक्त असल्याने उर्वरित पाच हजार कर्मचारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. यामुळे शासनाने किमान तांत्रिक व गरज असलेल्या विभागातील पद भरतीला तरी मंजूरी द्यावी, अशी  मागणी वजा साकडे प्रशासनाने शासनाला घातले होते. त्यानुसार शासनाने आरोग्य वैद्यकीय व अग्निशमन विभागातील सुमारे ६६८ पदांची भरती करण्यास मंजुरी दिली याशिवाय आस्थापना खर्चाच्या मर्यादेची अट देखील एका वर्षापुरती शिथील केली आहे. यामुळे ही भरती प्रक्रिया राबविणे मनपाला शक्य झाले आहे.

संस्थांव्दारे भरती करण्यास विरोध शासनाने शिफारस केलेल्या खासगी संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने विरोध केला आहे. यामुळे भरती प्रक्रियेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भरती प्रक्रिया महानगरपालिका राबविण्याचा करारनामा अंतिम होऊन त्यावर दोन्ही बाजुने स्वाक्षरी झालेली असली तरी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर ● यांनी खासगी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेलाच विरोध केलेला आहे. यामुळे प्रशासनाची पुढील भूमिका महत्वाची ठरणार आहे.


Nashik Mahanagarpalika Bharti 2023: The draft agreement with TCS has been finalized for the recruitment process of 700 posts in the Municipal Corporation. The process of contracting for a period of three years is in the final stage. The process of contracting for a ten-year period is in the final stages. In the coming days Nashik Municipal Recruitment Process will carried Out. Check below Update:

 

महापालिकेतील रिक्त पदांना भरतीस शासनाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर या भरतीसाठी शासनानेच ठरवून दिलेल्या टाटा इन्स्टिट्यूट कंपनीसोबत नोकर भरतीच्या कच्चा कराराला महापालिका आयुक्तांनी अंतिम मान्यता दिली असून, सामंजस्य कराराची प्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास येणाऱ्या तीन वर्षाच्या काळात महापालिकेत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मनपाने नोकर भरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती केली. त्यासंदभातील शासनाचा निर्णय महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने नोकरभरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी या दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएस या संस्थेकडून महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून टीसीएसशी संपर्क साधण्यात आला होता. टीसीएसने नोकर भरतीसाठी होकार दर्शविल्यानंतर त्यासाठी नियमावली ठरविण्यात आली.

 

महापालिकेने त्यात काही बदल सुचविल्यानंतर कंपनीने कच्चा कराराचा मसुदा गेल्या आठवड्यात महापालिकेकडे पाठविला होता. त्याचा अभ्यास करून महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या कच्चा कराराला मान्यता दिली आहे. हा कच्चा मसुदा पुन्हा टीसीएसकडे पाठविण्यात आला असून, येत्या आठवडाभरात अंतिम सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होतील.

 

 

महापालिकेतील ७०० पदांच्या नोकर भरती प्रक्रियेसाठी टीसीएस या संस्थेसमवेत कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. तीन वर्षे मुदतीसाठी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. दहा वर्षे मुदतीसाठी करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. दहा दिवसांत याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. एकीकडे शहराची लोकसंख्या २० लाखांपेक्षा जास्त झाली असताना गेल्या २४ वर्षांत जवळपास २८०० पदे रिक्त झाली आहेत. . ती दबाव, अर्थिक आरोप-प्रत्यारोप होण्याची भीती लक्षात घेत प्रशासनाने चाणाक्षपणे स्वप्रक्रियेला ‘टाटा’ करून या भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएससोबत करारनाम्याच्या अंतिम मसुद्यास चाल दिली. पुढील तीन वर्षांसाठी महापालिका टीसीएसला महापालिकेतील सर्वप्रकारच्या पदांच्या भरतीचे अधिकार देणार आहे.

 


 

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Bharti 2023: NMC (Nashik Municipal Corporation) has recently announced recruitment for the vacant post. The recruitment process will be carried by TCS now. The official website of Nashik Mahanagar Palika is nmc.gov.in. More details are as follows:-

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करताना लाड व पागे समितीच्या शिफारशी संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसह अन्य कुठलाही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मेघवाळ, मेहतर व वाल्मीकी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने लाड व पागे समिती गठित केली. या समितीने डोक्यावरून मैला वाहणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेचे काम त्यांनाच द्यावे अशा सूचना केल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाल्मीक मेहतर व मेघवाळ समाजाच्या नागरिकांना स्वच्छतेचे काम दिले जात होते. परंतु २०१६ मध्ये तत्कालीन शासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बदल केला. त्यात मेघवाळ, वाल्मीकी व मेहतर समाजाव्यतिरिक्त स्वच्छतेचे काम करणारा प्रत्येक घटक या व्याख्येत बसविण्यात आला.

 

शौचालय स्वच्छता, घाणीशी संबंधित तसेच मलनिस्सारण व्यवस्था नाली व गटारे ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, डोक्यावरून महिला वाहून नेणारा वर्ग यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बसविण्यात आले.

 

तसेच, सफाई कामगारांकरिता वारसा हक्काची तरतूददेखील करण्यात आली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या वारसांना त्यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्या आधारे नेमणूक वर्ग चार किंवा वर्ग तीनमध्ये करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. शासनाच्या या निर्णयामुळे वाल्मीकी, मेहता व मेघवाळ समाजा व्यतिरिक्त अन्य लोक सफाई कामाचे हकदार ठरले.

 

परंतु असे असले तरी स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचे नोकरी पदेदेखील घटली. लाड व पागे समितीच्या शिफारशी कायम करावे याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. यावर १८ एप्रिलला पुढील सुनावणी देण्याचे सूचित करताना तोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये, अशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.

 


 

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय, अग्निशमन विभागासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने पुढील आठवड्यात टीसीएस या संस्थेशी महापालिकेचा करारनामा होणार आहे. करारनामा झाल्यानंतर मनपाच्या बहुप्रतीक्षित असलेला ७०१ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

शासनाने नाशिक महापालिकेला आरोग्य वैद्यकीय विभाग आणि अग्निशमन विभागातील जवळपास ७०१ पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी मागील वर्षी मंजुरी दिली होती. त्यासाठी शासनाने नामनिर्देशित केेलेल्या संस्थांपैकी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन संस्थांची निवड महापालिकेने केली होती. त्यानुसार मनपाच्या प्रशासन विभागाने संबंधित दोन्ही संस्थांना पत्र देऊन त्यांच्या अटीशर्ती तसेच भरती प्रक्रिया कशी राबविणार, त्यासाठीचे शुल्क किती आकारणार, याबाबतची माहिती मागविली होती. त्यासंदर्भात आयबीपीएसने भरती प्रक्रियेसाठी होकार कळविला होता. मात्र त्यानंतर करारनामा करण्याविषयी संस्थेने काहीच कार्यवाही केली नाही वा तसे स्वारस्यही दाखविले नाही. त्यामुळे प्रशासन विभागाने टीसीएस संस्थेशी संपर्क साधून भरती प्रक्रियेविषयी विचारणा केली असता, टीसीएसने उत्सुकता दाखविली असून, आता या संस्थेबरोबर करारनामा होणे तेवढे बाकी आहे. संस्थेच्या प्रतिनिधींबरोबर मनपाची बैठक होऊन आढावा घेण्यात आला असून, पुढील आठवड्यात मनपा आणि टीसीएस यांचा करारनामा पूर्ण होऊन भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

 

महापालिकेचा आस्थापना खर्च वाढता असल्याने महापालिकेसमोर भरती करण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र, शासनाने आस्थापना खर्चाची अट एकवेळेसाठी शिथिल केल्याने तसेच सध्या मनपाचा आस्थापना खर्चही ३५ टक्क्यांपर्यंत आल्याने मनपाच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

 


महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदासाठीच्या भरतीची प्रक्रियेसाठी महापालिकेने टीसीएस कंपनीला दिलेला प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. नियम व अटी महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, असमर्थता दर्शविण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नोकर भरतीचा प्रस्ताव सादर केला. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला मनुष्यबळाची गरज असताना २४ वर्षांपासून महापालिकेत कुठलीही नोकरभरती झाली नाही.

महापालिकेत ‘क’ वर्ग संवर्गातील मंजूर पदांची संख्या ७०८२ इतकी असताना नियत वयोमानानुसार निवृत्त, स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्त पदांची संख्या २६०० वर गेली. महापालिकेत सद्यःस्थितीत जेमतेम ४५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. परिणामी नागरी सुविधा पुरविताना उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडू लागला. शासनाच्या ३५ टक्के आस्थापना खर्चाची मर्यादा नोकर भरतीला अडचणीची ठरत आहे.

परंतु, कोरोना काळात अत्यावश्यक गरज म्हणून नगरविकास विभागाने सुधारित आकृतिबंधातील आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन आदी विभागातील ८७५ नवीन पदांना नगरविकास विभागाकडे मंजुरी दिली होती.

परंतु,सन २०१७ पासून महापालिकेची सेवा प्रवेश नियमावलीची फाइल मंत्रालयात मंजुरीअभावी पडून असल्याने ही भरती अडकली होती. अखेरीस नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली.

 


राज्याच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरभरतीसाठी आवश्यक असलेली ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट एका वेळेपुरती शिथिल केली आहे. त्यामुळे महापालिकेतील जम्बो नोकरभरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सद्यस्थितीतील पदभरतीसोबतच नगरविकासच्या निर्णयानंतर महापालिकेत जवळपास २,८०० जम्बो भरतीतील मुख्य अडथळाही दूर झाला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेत सातव्या वेतन आयोगासह आश्वासित प्रगती योजनेमुळे महापालिकेचा आस्थापना खर्च सध्या ३५ टक्क्यांवर आहे.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र ‘क’ वर्गाचाच कार्यरत आहे. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७,०९० पद मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे २,८०० हून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना उपलब्ध साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना मुलभूत सेवा-सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर गेल्यावर्षी शासनाने अग्निशमन विभागाच्या ३४८, तर वैद्यकीय व आरोग्य विभागातील ३५८ अशाप्रकारे एकूण ७०४ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली.

 

या भरतीसाठी आयबीपीएस संस्थेसमवेत कराराची प्रक्रिया महापालिका स्तरावर सुरू आहे. परंतु, आता नानाविध कारणामुळे गेल्या अकरा वर्षांपासून अडकलेली महापालिकेतील नोकरभरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी घेतलेल्या लागोपाठ दोन निर्णयांमुळे दृष्टिपथास आली आहे. राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारने या नोकरभरतीत अडथळा ठरणारी ३५ टक्के आस्थापना प्रशासनाने प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी केल्याने महापालिकेत आता ७०४, नव्हे तर २,८०० पदांसाठी जम्बो भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

■ आरोग्य विभाग : ३५८
■ अग्निशमन विभाग : ३४८
■ एकूण पदे : ७०४
उर्वरित २,००० पदे नगरविकासच्या निर्णयामुळे महापालिकेत भरती

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

25 Comments
  1. MahaBharti says

    अखेर नाशिक महापालिकेतील नोकरभरतीला वेग; पदभरती तातडीने करावी असे आदेश

  2. Sunita gangurde says

    Sir mala nokri paijel hoti milel ka nokri

  3. Sagar Nanavare says

    Lab technician sati job ahe ka

  4. Namdev pawar says

    12th pad sathi job pahije

  5. Khemchand says

    आर्मी भरती कधी पडणार

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड