नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; अर्ज सुरु!! – Nashik Mahanagarpalika Bharti 2025
Nashik Mahanagarpalika Recruitment 2025
Nashik Mahanagarpalika Bharti 2025
Nashik Mahanagarpalika Bharti 2025: Nashik Mahanagarpalika has published the notification for the Post of “Biomedical Engineer”. There is a 02 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 08th of August 2025. For more details about Nashik Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “बायोमेडीकल इंजिनियर” पदाची एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – बायोमेडीकल इंजिनियर
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- वयोमर्यादा – 58 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाशिक सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 ऑगस्ट 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.nmc.gov.in/
Nashik Mahanagarpalika Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
बायोमेडीकल इंजिनियर | 02 |
Educational Qualification For Nashik Mahanagarpalika Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बायोमेडीकल इंजिनियर | बी.ई./बी.टेक. |
Salary Details For Nashik Mahanagarpalika Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
बायोमेडीकल इंजिनियर | २५,०००/- |
How To Apply For Nashik Mahanagarpalika Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nmc.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/tl2hL |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.nmc.gov.in/ |
नाशिक महापालिकेने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ६७१ पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला असून, ही भरती सुमारे २४ वर्षांनंतर होणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात महापालिकांमध्ये जम्बो भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर नाशिक महापालिकेने सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून ६७१ पदांच्या भरतीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महापालिकेत रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग लवकरच मोकळा होणार असल्याचे संकेत आहेत.. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ कमतरतेच्या समस्येचा सामना करणाऱ्या महापालिकेला यामुळे काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. राज्यातील २९ महापालिकांमधील रिक्त ४८ हजार ६८० पदांपैकी २३ हजार ३८१ पदे भरली जाणार आहेत. त्यात नाशिक महापालिकेतील ६७१ पदांच्या भरतीचा समावेश आहे. नाशिक महापालिकेत २४ वर्षांपासून नोकरभरती झालेली नाही. सद्यस्थितीत महापालिका आस्थापना परिशिष्टावरील ७७२५ पदे मंजूर आहेत. नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला तरी महापालिकेचे आस्थापना परिशिष्ट अद्यापही क वर्गीय महापालिकेचेच आहे. २०१७मध्ये महापालिकेचा १४,९४४ पदांचा आकृतिबंध शासनास सादर केला होता. त्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी शासनाने महापालिकेला पत्र पाठवत सुधारित आकृतिबंध सादर करण्याचे निर्देश दिले होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
महापालिकेने सर्व विभागांचा आढावा घेऊन ९०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेने शासनास सादर केला आहे. सदर आकृतिबंधामध्ये महापालिकेस आवश्यक सर्व संवर्गाचा समावेश करण्यात आला असून, काही संवर्ग हे आवश्यकतेनुसार निरसित करण्यात आले आहेत. परंतु, अद्याप या आकृतिबंधास शासनाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे आकृतिबंधानुसार रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला चालना मिळू शकली नाही. दरम्यान, कोरोना काळात शासनाने महापालिकेतील अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठी भरती प्रक्रियेला मंजुरी दिली होती. बिंदूनामावली मंजूर नसल्याने या पदांची भरती प्रक्रिया रखडली होती. महापालिकेतील रिक्तपदांची संख्या ३५९७ वर पोहोचल्याने मनुष्यबळाअभावी कामकाजात अडथळे येत आहेत. सिंहस्थापूर्वी नोकरभरती करणे आवश्यक आहे. त्यात राज्य सरकारनेच जम्बो भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता.
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत (एनयूएचएम) मानधनावर ३०९ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे यासंदर्भातील जाहिरात महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यानंतर बेरोजगारांच्या अक्षरशः उड्या पडल्या असून, ३०९ जागांसाठी तब्बल ३,०३९ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ‘एएनएम’च्या ५३ जागांसाठी सर्वाधिक १,०४३, तर ६७ स्टाफ नर्स पदांकरिता ८१६ अर्ज प्राप्त झाले आहेत. बालरोगतज्ज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीपदासाठी मात्र एकही अर्ज आलेला नाही. सध्या वैद्यकीय विभागाकडून प्राप्त अर्जाची छाननी केली जात असून, लवकरच महापालिकेच्या संकेतस्थळावर पात्र, अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य अभियानात वैद्यकीय विभागात रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी डॉक्टर, तसेच आवश्यक स्टाफची पदे भरली जातात. महापालिकेची आरोग्यवर्धिनी केंद्रे, तसेच शहरी आरोग्य प्राथमिक केंद्रांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविली जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत ३०९ जागांसाठी ३,०३९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननीअंती संबंधित उमेदवारांचा समावेश निवडप्रक्रियेत करण्यात येईल. अर्ज छाननीनंतरी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. एमबीबीएस आणि विशेष तज्ज्ञांच्या पदांकरिता मुलाखती घेतल्यानंतर नियुक्तीचा निर्णय जाहीर केला जाईल. उर्वरित पदांसाठी मेरिटनुसार निवडयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. बिंदुनामावलीनुसार ही निवड केली जाईल, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
बालरोगतज्ज्ञ मिळेना ‘एएनएम’ आणि स्टाफ नर्स पदांकरिता मोठ्या संख्येने अर्ज आले असले, तरी बालरोगतज्ज्ञ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. फिजिओथेरपिस्टच्या १४ जागांसाठी केवळ दोनच अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीपदाच्या १८ जागांसाठीदेखील केवळ आठ अर्ज आले आहेत. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांसाठी नव्याने भरतीप्रक्रिया राबवावी लागणार आहे.
महापालिकेत दिवसेंदिवस रिक्त पदांची संख्या वाढतच असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्ळ्याच्या पाश्वभूमीवर महापालिकेत नोकरभरती आवश्यक असताना यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे मनपातील सुमारे साडेतीन हजार रिक्त पदांच्या भरती बरोबरन सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळावी, यासाठी महापालिकेने राज्य शासनाला दोन वेळा विनंतीपत्रे पाठविली आहेत. मात्र, त्याविषयी शासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोकरभरती कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर भरती केली जाईल. नोकर भरतीस मान्यता मिळाल्यास मनुष्यबळाचा प्रश्न निकाली निघेल. तसेच, आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने देखील मनुष्यबळ उपयोगी येऊ शकते.
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 – महापालिकेच्या आस्थापनेवर ७७०० पदे मंजूर आहेत. त्यांपैकी सुमारे तीन हजारांहून अधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृतीमुळे आजमितीस रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मनपाच्या प्रशासकीय कामकाजात, तसेच नागरी सेवा पुरविताना महापालिकेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. १० वर्षापूर्वी महापालिकेला ‘व’ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. असे असताना जुन्याच आस्थापनेनुसार महापालिकेचा कारभार सुरू आहे. काही वर्षांपूर्वी १४ हजार पर्दाचा सुधारित आकृतीबंध महापालिकेने शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, शासनाने दुरुस्तीसह सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मनपाला दिले होते. त्याचबरोबर महापालिकेचा आस्थापना खर्च देखील ३७ टक्क्यांच्या तर जात असल्याने सरळसेवेने भरती करण्यास शासनाने नकार दिला होता. तीन वर्षापूर्वी कौविड महामारीच्या काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य, तसेच अग्निशमन विभागातील ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली होती. या भरतीकरिता टीसीएस कंपनीसोबत करारही करण्यात आला होता. मात्र, या भरतीसाठी देण्यात आलेली एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने नोकरभरती रखडली.
तांत्रिक संवर्गातील भरती रखडली – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तांत्रिक विभागातील १४० पदे भरण्यासाठी महापालिकेला मंजुरी दिली आहे. यामुळे महापालिकेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविल्यास विलंब होईल. त्यमुळे मना टीसीएस या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया राबवणार आहे. अद्यापतरी बिंदुनामावली मंजूर न झाल्याने ही सुद्धा भरती रखडण्याची चिन्हे आहेत.
नाशिक महापालिकेत सलग दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चतुर्थ श्रेणीवरील कंत्राटी कामगारांची सेवा आता कायम करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत, या कामगारांना ज्येष्ठतेनुसार कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.
न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला असून, नाशिक महापालिकेला ४५ दिवसांत अशा कंत्राटी कामगारांची यादी तयार करून नगर विकास खात्याकडे पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर नगर विकास खात्याने या यादीनुसार कामगारांची सेवा कायम करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, ज्या कंत्राटी कामगारांचे निधन झाले आहे, त्यांना निवृत्तीचे लाभ देण्याचा आदेश देखील न्यायालयाने दिला आहे. नाशिक पालिकेत कंत्राटी काम करणारे अविनाश वानखेडेसह ३६ जणांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कामगारांची सेवा आणि बलिदान:
दहा वर्षांहून अधिक काळ नाशिककरांची सेवा करणारे हे कंत्राटी कामगार आपल्या आयुष्याचा मोठा भाग या सेवेत व्यतीत करत आहेत. यातील काही जणांचे निधनही झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अशा मजुरांसाठी कायम पदांची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने ठामपणे सांगितले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी तांत्रिक मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने महानगरपालिकेला सरळसेवेने विविध विभागांतील १४० अभियंत्यांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. कुंभमेळा नियोजनाचे आव्हान लक्षात घेऊन या भरतीसाठी आस्थापनाच्या खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथील करण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागातील सरळसेवेने पदे भरण्यासाठी आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मयदिची अट शिथील करण्याचा विषय नगरविकास विभागासमोर होता. शहराचा विस्तार होत असताना महापालिकेला मूलभूत सुविधा पुरविताना मनुष्यबळ तुटवड्याला तोंड द्यावे लागत महानगरपालिका आस्थापनेवर ७०८२ पदे मंजूर आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यातील तीन हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्चाच्या निकषामुळे भरतीला मर्यादा आल्या. मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असल्याने सरळ सेवेने भरती करण्यास नकार मिळाला होता. या स्थितीचा आगामी कुंभमेळ्याचे नियोजन व तयारीवर परिणाम होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन आस्थापना खर्च मर्यादित ठेवण्याच्या अटीवर शासनाने विविध विभागातील अभियंत्यांच्या पद भरतीला मान्यता दिली. सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळवण्यासाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे. उपरोक्त रिक्त पदे भरताना काही अटी-शर्ती घालून देण्यात आल्या आहेत. रिक्त पदे भरताना महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमांन्वये निश्चित केलेली अर्हता व पद भरतीबाबत विहित कार्यपद्धतीचा अवलंब केला जाईल.
रिक्त पदांचा तपशील :
- उपअभियंता स्थापत्य – ८
- उपअभियंता यांत्रिकी – ३
- उपअभियंता विद्युत – २
- उपअभियंता अॅटो – १
- सहायक अभियंता वाहतूक – १
- सहायक अभियंता विद्युत – ७
- कनिष्ठ अभियंता विद्युत – ७
- सहायक अभियंता स्थापत्य – २१
- कनिष्ठ अभियंता स्थापत्य – ४६
- सहायक अभियंता यांत्रिकी – ४
- कनिष्ठ अभियंता यांत्रिकी – ९
- कनिष्ठ अभियंता वाहतूक – ३
- सहायक कनिष्ठ अभियंता स्थापत्य – २८
- सहायक कनिष्ठ अभियंता विद्युत – ४
महापालिकेत मागील चोवीस वर्षांपासून भरती झाली नसून, साडेसात हजार पदांपैकी आजमितीला साडेतीन हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांना सोयीसुविधा देताना मनपावर अतिरिक्त ताण पडत आहे. मात्र, आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा असून, त्यासाठी अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. हे पाहून शासनाने महापालिकेतील तांत्रिक सवर्गातील १४० पदे भरण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता आस्थापनाची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी शासनाने पस्तीस टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करत महापालिकेला अभियांत्रिकी संवर्गातील १४० पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मागील महिन्यात आयुक्त मनीषा खत्री यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कुंभमेळ्यासाठी तांत्रिक संवर्गातील भरतीला मंजुरी मिळावी हा मुद्दा प्रकषनि मांडला. त्यास यश मिळाले आहे.
आस्थापना वायाची अट शिथिल करत भरतीला मंजुरी दिली. त्यामुळे सिंहस्थाचे शिवधनुष्य पेलण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यकडे झालेल्या सिंहस्थ आढावा बैठकीत भरतीला परवानगी द्यावी, अशी मागणी आयुक्त खत्री यांनी केली होती. या अगोदर मनपा प्रशासनाने शासनाकडे अनेकदा नोकरभरतीबाबत प्रस्ताव पाठवला. परंतु, मनपाचा आस्थापना खर्च हा ४५ टक्के इतका आहे. ३५ टक्क्यांपेक्षा जादा खर्च असल्यास शासन भरतीला परवानगी नाकारते. त्यामुळे मनपाचे नोकरभरतीचे घोडे रेंगाळले होते. परंतु, सिंहस्थ कुंभमेळा दोन वर्षांवर येऊन ठेपला असून, मनपाकडे अभियांत्रिकी संवर्गातील अधिकाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे.
मनपा प्रशासनाने भरतीबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु त्यास अपेक्षित यश आले नव्हते. मात्र, आगामी सिहंस्थ कुंभमेळा असल्याचे पाहून शासनाने अभियांत्रिकीच्या भरतीला ग्रीन सिग्नल दिल्याने याचा फायदा पालिकेला होणार आहे.
भरली जाणारी पदे व संख्या
उपअभियंता स्थापत्य ८, सहा. अभियंता स्थापत्य – २१, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ४६, सहायक अभियंता यांत्रिकी ४, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी – ९, कनिष्ठ अभियंता वाहतूक -३. सहा. कनिष्ठ अभियंता स्थापत्य २८, सहायक कनिष्ठ अभियंता ४, यांत्रिकी – ३, विद्युत -२, सह. अभियंता-१, सहा. विद्युत ३, कनिष्ठ अभियंता विद्युत – ७.
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या ७९१ अत्यावश्यक पदांच्या भरतीसाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर आता त्याला मान्यता मिळन्याची चिन्हे दिसू लागलो आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पदे भरण्याबाबत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे पालिकेने प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता देत लक्करच पुढची प्रक्रिया करणार असल्याचे सांगितले. सध्या आस्थापना खर्च ३५ ठक्क्यांच्या आत असण्याबाबतची अट ही प्रमुख अडचण आहे. सध्या हा खर्च भरण्यासंदर्भात देखील मागणी करण्यात नगर विकास विभागाची मिळाल्यानंतर लगेच भरती होणे शक्य असल्याचे सांगण्यात येते. गेल्या २४ वर्षांत महापालिकेत सरळ सेवेने थेट नोकर भरती झालेली नाही. कोरोना काळामध्ये महापालिकेमध्ये अपुरे मनुष्यचळ असल्यामुळे आरोग्यसेवा पुरवण्यामध्ये अडचणी आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी नियमित नव्हे तर आपातकालीन किंबहुना अत्यावश्यक सेवेतील पदभरतीला मान्यता आली आहे. देग्याबाबत प्रयत्न केले होते. राज्य शासनाने तत्वातः मान्यता दिली होती. मात्र पालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्के पेक्षा कमी असला तरच नोकर भरती करण्यास परवानगी असल्यामुळे पुढे प्रक्रिया रखडली. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मिळाल्यानंतर आस्थापना खर्चाची अट वर्षभरासाठी शिथिल होती. मात्र या कालावधी प्रयस्थ सीमेची नेमणूक प्रक्रियेमध्ये कायधी गेला. त्यामुळे नोकर भरती होऊ शकली नाही.
९०१६ कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर होणार ‘क’वर्ग पालिकेची ‘ब’वर्गात पदोन्नती झाली असली तरी अद्याप, आकृतिबंध मंजूर नाही. २०१७ मध्ये पालिकेने १४९४४ पर्दाचा आकृतिबंध शासनाला सादर केला. शासनाने नवा आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ९००६ पदांचा सुधारित आकृतिबंध मार्च २०२४ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी मिळण्याकरता राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून लवकरच भरतीसाठी परवानगी मिळणार असल्याची बातमी आहे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रलंबित नोकरभरतीला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक पदांच्या भरतीसंदर्भात महापालिकेने राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांनी मौखिक मान्यता दिली आहे. या नोकरभरतीला आस्थापना खर्चाची अट अडचणीची ठरत आहे. शासनाने ही अट शिथिल केल्यानंतरच नोकरभरतीचा मार्ग प्रशस्त होऊ शकणार आहे. दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेतील रिक्तपदांची संख्या तीन हजारांवर गेली आहे. १९९५ मध्ये मंजूर झालेल्या आकृतिबंधानुसार महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर ७०९२ पदे असून, रिक्त पदांमुळे जेमतेम चार हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जोरावर महापालिकेचा गाढा हाकला जात आहे. गेल्या ३० वर्षांत शहराचा वाढलेला विस्तार, तिपटीने वाढलेल्या लोकसंख्येला मूलभूत सेवा-सुविधा पुरविताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेची दमछाक होत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेला व्यवस्थापन करणे अवघड होणार आहे. ही बाब लक्षात घेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अत्यावश्यक सेवांशी संबंधित किमान ७०६ रिक्त पदे भरतीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्याच्या बैठकीत याकडे लक्ष वेधल्यानंतर मुख्य सचिवांनी लवकरच भरतीसाठी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले.
रिक्त पदांच्या नोकरभरतीपूर्वी सुधारित आकृतिबंधाला मंजुरी मिळणे गरजेचे आहे. महापालिकेने २०१७ मध्ये १४ हजार ९४४ पदांचा आकृतिबंध शासनाला सादर केला होता. शासनाने आवश्यक असलेल्या सर्व पदांचा विचार करून नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार ९०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध मार्च २०२४ रोजी महासभेच्या मान्यतेनुसार शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा आकृतिबंध मंजूर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
महापालिकेत रिक्त असलेल्या जवळपास २८०० पदांबरोबरच नवीन आकृतिबंधाला मंजुरी मिळावी यासाठी प्रशासनाकडून राज्यात नव्याने सत्ता स्थापन झालेल्या सरकारकडे केला जाणार आहे. महापालिका प्रशासनावर पडणारा कामाचा ताण लक्षात घेऊन पुढील वर्षात रिक्त पदांच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेत आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील ७०८२ पदे मंजूर आहेत. त्यातील जवळपास २८०० पदे सध्या रिक्त आहेत. महापालिकेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळालेला असल्याने १४ हजार पदांचा सुधारित आराखडा शासनाला सादर करण्यात आला. मात्र अद्याप तो आराखडा मंजूर नाही. नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने महसूल खर्चाची अट टाकली. ३५ टक्क्यांच्या वर प्रशासकीय खर्च जात असेल तर रिक्त पदांची भरती करू नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. परंतु कोरोनाकाळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली.
त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. मात्र भरती करताना शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत भरती कराव्या अशा स्पष्ट सूचना अध्यादेशामध्ये आहेत. आयबीपीएस व टीसीएस या दोन संस्थांची नियुक्ती करण्यात आली. आयबीपीएस संस्थेची भरती करण्याची क्षमता नसल्याने टीसीएस कंपनी सोबत करार करण्यात आला. आगामी तीन वर्षासाठी हा करार असून आता कुठलीही भरती टीसीएसमार्फतच केली जाणार आहे. ‘ब’ ते ‘ड’ संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टीसीएसमार्फत राबविली जाणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत भरतीचे नियोजन होते, परंतु अद्यापपर्यंत शासनाने परवानगी दिली नाही. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांमुळे रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. आता राज्यात सरकार स्थिरस्थावर झाल्याने प्रशासनाकडून रिक्त पदांच्या भरती साठी त्याचप्रमाणे सुधारित आकृतिबंधाला मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या ७०६ विविध पदांच्या नोकरभरतीसाठी आस्थापना खर्चाची अट छत्रपती संभाजीनगरप्रमाणे शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंजूर होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ अधिवेशनामध्ये यासंदर्भामधील प्रश्न उपस्थित करण्याची तयारी भाजपच्या आमदारांनी केली असून त्यानंतर शासनाकडून नोकरभरतीसाठी परवानगी मिळू शकते. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या वाढत आहे.
पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर ७०८२ पदे मंजूर असून त्यातील जवळपास ३००० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे नोकरभरतीला परवानगी नाही. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्यामुळे नोकरभरतीसाठी संधी होती. मात्र डिसेंबर २०२३ पर्यंत आस्थापना खर्चाची अट शिथिल असतानाही कारवाई झाली नाही. परिणामी, ही मुदत संपून गेली. त्यानंतर पालिकेने संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी प्रस्ताव पाठवले. मात्र परवानगी मिळाली नाही. दरम्यान, आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यासंदर्भात फेरविचाराचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. ८२ पदे वगळून भरतीची धडपड ७०६ पैकी ‘अ’ वर्गातील पदे ही एमपीएससीमार्फत भरली जात असल्यामुळे त्यांना वगळून उर्वरित पदांसाठी भरती होईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून ६२४ उर्वरित पदे भरण्यासाठी टीसीएस या कंपनीसमवेत पालिकेने करार केला होता. विविध २६ संवर्गातील विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना, परीक्षा पेपर आदी तयारीदेखील पूर्ण झाली होती. त्यामुळे आता शासनाचे मान्यता मिळाली की लगेच कार्यवाही होणार आहे.
Table of Contents
Nashik Mahanagarpalika Bharti 2025 Latest News & Details
Mahabhart kadhi chalu honar aahe 2024
NMC Nashik Mahanagar Palika Bharti 2023, Latest Updates & Details.
नाशिक महानगरपालिका भरती कधी सुरू होणार?
अखेर नाशिक महापालिकेतील नोकरभरतीला वेग; पदभरती तातडीने करावी असे आदेश