नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु, त्वरित अर्ज करा | Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 Details 

Nashik Mahanagarpalika Bharti 2022Nashik Municipal Corporation has declared a new recruitment notification for the various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 25th of April 2022. Further details are as follows:-

नाशिक महानगरपालिके अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Read PDF)
 • नोकरी ठिकाणनाशिक
 • वयोमर्यादा – 45 ते 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. आयुक्त, नाशिक महानगरपालिका
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.nmc.gov.in

How To Apply For Nashik Mahanagarpalika Bharti 2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.nmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NMC Nashik Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/BFRsz6L
✅ अधिकृत वेबसाईट
www.nmcn.gov.in

 


Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 : Approval for recruitment in the medical department of the corporation. The approval of the Urban Development Department to fill 348 vacancies will help in resolving the issue of recruitment of vacancies for many years as well as the format of new posts which were earlier submitted to the State Government. Further details are as follows:-

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील (Medical Department Bharti 2022) ३४८ रिक्त पदे भरण्यास नगरविकास विभागाने मान्यता (Ministry of Housing and Urban Affairs) दिल्याने अनेक वर्षांपासूनचा रिक्त पदाच्या भरतीचा तसेच यापूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या नवीन पदांच्या आकृतिबंधाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 – Vacancy Details 

ही पदे भरण्यास मिळाली मान्यता

 • वैद्यकीय अधीक्षक- २
 • निवासी वैद्यकीय अधिकारी- २
 • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- १
 • वैद्यकीय अधिकारी- ५८
 • वैद्यकशास्त्रतज्ज्ञ- ८
 • शल्यचिकित्सक १८
 • स्त्रीरोगतज्ज्ञ १६
 • बालरोगतज्ज्ञ १६
 • क्ष- किरणतज्ज्ञ- ४
 • बधिरीकरणतज्ज्ञ- ९
 • अस्थिव्यंगतज्ज्ञ- ४
 • नेत्रशल्यचिकित्सक – ४
 • सिस्टर (हेडनर्स)- १४
 • स्टाफ नर्स- १०
 • एएनएम- ७४
 • मिश्रक- २६
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ- ६
 • वॉर्डबॉय- ११
 • आया ३०

महापालिकेच्या स्थापनेनंतर लोकसंख्या व महापालिकेला असलेल्या ‘क’ वर्गाच्या दर्जानुसार विविध संवर्गातील सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. परंतु बारा वर्षांत मोठ्या प्रमाणात यातील पदे रिक्त झाली. रिक्त पदे भरताना शासनाची परवानगी आवश्‍यक असते. परंतु आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली असेल तरच रिक्त पदे भरता येतील, असा शासनाचा नियम असल्याने पदे भरता आली नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चौदा हजार पदांचा नवीन आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला. परंतु, अद्यापही आकृतिबंध शासन मान्यतेसाठी प्रलंबित आहे. पूर्वीच्या ४१७ पदे व नवीन ६३५ अशा एक हजार ५२ पदांना राज्य शासनाने मध्यंतरीच्या काळात मंजुरी दिली. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व अग्निशमन या विभागातील अत्यावश्‍यक पदांना मान्यता देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ८ डिसेंबर २०२१ ला महापालिकेला पत्र देत वैद्यकीय विभागातील ३४८ पदांच्या भरतीसाठी परवानगी दिली. यात आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यात आली. त्याशिवाय ३ जानेवारी २०२२ ला उर्वरित विविध विभागाच्या ५२७ पदांची माहितीही पाठविण्याच्या सूचना देण्यात आला.

पदाधिकारी अनभिज्ञ

Opposition leaders, including the ruling BJP, were unaware of the order. While the actual administration is obliged to inform the standing committee and the mayor after receiving the government order on December 8, it has come to light that the order has been withheld for 15 months. The administration is putting forward technical reasons for the difficulties in preparing the service entry rules for the recruitment of the reservation points required for the recruitment of posts and direct service.


Nashik Municpal Corporation Bharti 2021 Details 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : NMC decided to recruit on honorarium basis for about 3000 vacancies in various NMC establishments. The proposal was approved at a special general body meeting chaired by Mayor Satish Kulkarni on Wednesday. Further details are as follows:-

महापालिकेच्या विविध आस्थापनांमधील रिक्त असलेल्या सुमारे ३ हजार जागांसाठी मानधन तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.१८) झालेल्या विशेष महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या भरती प्रक्रियेच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचं सांगत विरोधकांनी या प्रस्तावाचा कडाडून निषेध केला. महापालिकेचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे. १९९८ पासून महापालिकेने भरती केलेली नाही.

त्यामुळे ही भरती आवश्यक असल्याचं महापौर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागात ७९७ घंटागाडी कर्मचारी व सुमारे ७०० स्वच्छता कर्मचारी, तर आरोग्य विभागात एकूण ३७१८ कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.आवेश पलोड यांनी सभागृहात दिली. शिक्षण विभागात एकही कंत्राटी कर्मचारी नसून, २०१७ च्या संच मान्यतेनुसार १९३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एकूणच, महापालिकेतील विविध संवर्गात सुमारे तीन हजार जागा रिक्त आहेत. त्यासाठी मानधन तत्त्वावर ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाणार आहे.


NMC Vacancy Details 

Nashik Mahanagarpalika Bharti 2021 : NMC has sent a revised figure of 14,700 employees to the state government for approval. However, the recruitment process could not take place even after that. A total of 7,090 posts have been sanctioned in various categories, out of which about 24 posts are vacant. Further details are as follows:-

महापालिकेत अपुर्‍या मनुष्यबळाच्या मुद्याकडे अंगुलीनिर्देश करीत मानधनावर नोकर भरती करण्याचा प्रस्ताव बुधवारी (दि. १७) होणार्‍या विशेष महासभेत सादर केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला. त्यानुसार महापालिकेने १४ हजार ७०० कर्मचारी संख्येचा सुधारित आकृतिबंध राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. मात्र त्यानंतरही भरती प्रक्रिया होऊ शकली नाही. पालिकेतील अस्थपणा विविध संवर्गातील एकूण ७ हजार ९० पदे मंजूर असून त्यापैकी सुमारे २४ हे पद रिक्त आहेत.

त्यातच महापालिकेतून मोठ्या प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. याचा ताण पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर येत आहे. दरम्यान, शहराचा दरवर्षी विस्तार होत असून लोकसंख्या देखील वाढ होत आहे. या तुलनेत शहराचा कारभार चालविणार्‍या पालिकेतील मनुष्यबळाचा अभाव भासत आहे. या पार्श्वभूमीवर मानधनावर भरती करण्याची मागणी सातत्याने होत आहे. महासभेने मानधनावर भरती प्रक्रियेस मान्यता दिल्यास अकरा महिने कालावधीसाठी कर्मचार्‍यांची भरती करण्यात येईल. त्यामुळे अपुर्‍या मनुष्यबळाचा सामना करणार्‍या महापालिकेला दिलासा मिळेलच; शिवाय सत्ताधार्‍यांसह विरोधकांचा राजकीय हेतू देखील साध्य होईल.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

23 Comments
 1. Sagar Nanavare says

  Lab technician sati job ahe ka

 2. Namdev pawar says

  12th pad sathi job pahije

 3. Khemchand says

  आर्मी भरती कधी पडणार

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड