नाशिक मनपात थेट मुलाखतीद्वारे ८००+ जागांसाठी महाभरती सुरु
Nashik MahaBharti 2020
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांंतर्गत साथरोग सर्वेक्षण आणि मनपा रुग्णालयांकरता तात्पुरत्या स्वरूपात कोविड 19 च्या कालावधीसाठी मानधनावर थेट मुलाखतीद्वारे जम्बो भरती होत आहे. विविध स्वरूपाची 811 पदे भरली जाणार आहेत.
महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे थेट मुलाखतीद्वारे भरती होणार असून, मुलाखतींसाठी विविध अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व पदांकरता प्रथम तीन महिने व आवश्यकतेनुसार पुढील तीन महिने मुदतवाढ दिली जाणार आहे. अनुभवाबाबत शासकीय-निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य अभियानांतर्गत असणारा अनुभव ग्राह्य धरला जाईल.
उमेदवारांनी 2 पासपोर्ट फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, फोटो आयडीकरिता मतदान ओळखपत्र किंवा आयडी कार्ड, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका हे कागदपत्रे आवश्यक राहील.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
चार महिन्यांपासून कोरोना महामारीशी मनपाचे वैद्यकीय कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी सामना करत आहेत. सलग चार महिने मनपाचे आहे तेच कर्मचारी काम करत असल्याने त्यांना काही काळ तरी विश्रांतीची गरज आहे. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याने कोविड केअर सेंटरमध्ये वाढ होत असल्याने वैद्यकीय मनुष्यबळाचीही मोठी निकड भासत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने मनुष्यबळात वाढ करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत होती. कृषिमंत्री दादा भुसे यांनीही नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत आवश्यकतेनुसार स्टाफ भरती करण्याची सूचना केली होती. तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांनीही वैद्यकीय कर्मचारी भरती करण्याची सूचना मनपाला केली होती. त्यानुसार मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
Ho interview honar
Mi 12 th pass aahe sar jar job sathi lagat asel tar mi Reddy aahe
Maza mo no 8830334423
10 th vr aahe ka jaga
Mulakht
Interview asel ka