Nashik Kamgar vibhag Bharti 2026 – राज्यातील कामगार विभागातील रिक्त पदांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार असून, विभागाला मोठा मनुष्यबळाला बूस्ट मिळणार आहे. कामगार आयुक्तालयामार्फत राज्यभरात ‘गट-क’ संवर्गातील एकूण ७८ जागांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे. या प्रक्रियेचा मोठा फायदा नाशिक विभागाला, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरला होणार आहे. यातील काही जागा या नाशिक विभागाला मिळणार असून, त्यामुळे कामाला गती मिळणार आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र म्हणून वेगाने विस्तारणाऱ्या नाशिक विभागातील कामगार वर्गाचे हित आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. कामगार आयुक्तालयांतर्गत राज्यातील २२ माथाडी मंडळे आणि १२ सुरक्षा रक्षक मंडळांच्या कार्यालयांमधील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने तातडीने भरली जाणार आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून अतिरिक्त कामाच्या ताणाखाली असलेल्या नाशिकच्या कामगार विभागाला दिलासा मिळणार आहे.
- पदाचे नाव – निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक
- पदसंख्या – 78 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जून २०२६
- अधिकृत वेबसाईट – labour.gov.in
- अर्ज शुल्क –
- अमागास (Open): १,००० रुपये.
- मागासवर्गीय/आ.दु.घ. (EWS)/अनाथ: ९०० रुपये.
नाशिक, अंबड, सातपूर आणि सिन्नर यांसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतींमुळे जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठी आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कामगार कल्याण योजना, तक्रारींचे निवारण आणि आस्थापनांच्या तपासण्या रखडत होत्या. आता पदांच्या या भरतीमुळे प्रशासकीय कामांना वेग येईल. तसेच, महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (रोजगार नियमन व कल्याण) अधिनियमांतर्गत स्थापन झालेल्या नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळालाही या मनुष्यबळवाढीचा थेट फायदा होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर कामगार विभागात चांगल्या वेतनाची शासकीय नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, पात्र आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भरतीसाठी ११ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















