कामगार विभागात भरतीत या महत्वाच्या कामासाठी मिळाली अखेर मुदतवाढ! । Ministry of Labour and Employment Recruitment 2026

Kamgar Vibhag Bharti 2026

कामगार विभाग द्वारे प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार या भरतीच्या पेमेंट प्रोसेस साठी मुदत वाढ भेटली आहे. त्यानुसार उमेदवारांचे अर्ज दिनांक 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरीता दिनांक 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, काही तांत्रिक अडचणी शुल्क भरण्याकरीता उमेदवारांना येत असल्यामुळे सदरच्या शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये दिनांक 18.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदरची मुदतवाढ ही दिनांक 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरीता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.


Ministry of Labour and Employment Bharti 2026: Ministry of Labour and Employment The Central Government Industrial Tribunal cum Labour Court is going to recruit interested and eligible candidates to fill 78 vacant posts of “Inspector, Accountant, Stenographer”. There are various vacancies available. Eligible candidates can apply online before the last date. The last date for submission of application is 11th of June 2026. For more details about Ministry of Labour and Employment Bharti 2026 through https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html, visit our website www.MahaBharti.in.

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे “निरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक” पदाची 78 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय भरती २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२६ आहे. हि भरती प्रक्रिया TCS द्वारे राबविण्यात येत आहे. अर्जाची लिंक सुरु झाली असून खाली दिली आहे.

कामगार विभाग भरतीची वाट पाहणाऱ्या आणि अर्ज भरताना अडचणींचा सामना करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी अखेर एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेच्या अटींमध्ये MSCIT चा कुठेही उल्लेख नव्हता, मात्र प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज भरताना सिस्टममध्ये अचानक MSCIT प्रमाणपत्र अपलोड करण्याची अनिवार्य अट दाखवली जात होती. जोपर्यंत उमेदवार प्रमाणपत्र अपलोड करत नव्हते, तोपर्यंत फॉर्म ‘Save’ होत नव्हता आणि पुढील स्टेपवर जात नव्हता. या तांत्रिक त्रुटीमुळे हजारो पात्र उमेदवारांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या तांत्रिक अडचणीत सुधारणा करण्यात आली असून सिस्टममधून MSCIT च्या पर्यायासमोर असलेले लाल रंगाचे अनिवार्य स्टार चिन्ह हटवण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे सध्या MSCIT प्रमाणपत्र नाही, त्यांनी आता अजिबात घाबरून किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही, कारण आता प्रमाणपत्र नसतानाही फॉर्म यशस्वीरित्या ‘Save’ होऊन पुढच्या स्टेपला जात आहे. सर्व उमेदवारांनी आता कोणतीही वाट न पाहता लवकरात लवकर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

कामगार आणि रोजगार मंत्रालय भरती २०२६

  • पदाचे नावनिरीक्षक, लेखापाल, लघुटंकलेखक
  • पदसंख्या78 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –  मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ११ जून २०२६
  • अधिकृत वेबसाईट – labour.gov.in
  • अर्ज शुल्क
    • अमागास (Open): १,००० रुपये.
    • मागासवर्गीय/आ.दु.घ. (EWS)/अनाथ: ९०० रुपये.

Ministry of Labour and Employment Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
निरीक्षक62
लेखापाल12
लघुटंकलेखक04

Salary Details For Maharashtra Kamgar Vibhag Bharti 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
निरीक्षकS-13 (Rs. 35,400-1,12,400/-)
लेखापालS-13 (Rs. 35,400-1,12,400/-)
लघुटंकलेखकS-8(Rs. 35,500- 81,100/-)

How To Apply For Kamgar Ayuktalay Bharti 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जून २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Kamgar Ayuktalay Arj 2026

📑 शुद्धिपत्रकhttps://shorturl.at/ENXHc
📑 PDF जाहिरात https://lnk.ua/PDQIpU8WM
👉 ऑनलाईन अर्ज करा https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/Index.html
✅ अधिकृत वेबसाईट labour.gov.in

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड