नारीशक्ती दूत मोबाईल अँप चालेना, पोर्टल वर पण डाऊन! काय कराल… – Nari Shakti App, portal Down
Nari Shakti App Portal Down
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोबाईल अँपद्वारे भरणे चालू केले, परंतु गेल्या दहा ते बारा दिवसांपासून हे मोबाईल ऍप चालत नसल्यामुळे अनेक बहिणी या योजनेपासून फॉर्म भरण्यास वंचित राहत आहेत. मोबाईल अँप चालत नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने पोर्टलदेखील चालू केले, परंतु पोर्टलवरदेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, पोर्टलदेखील व्यवस्थित चालत नाही. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मोबाईल अँप चालत नाही, तसेच पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नसल्याच्या तक्रारी सेवा केंद्र चालक करीत आहेत. यामुळे अनेक बहिणींचे फॉर्म भरणे अद्यापही बाकीच आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. या योजनेत प्रति महिना १५०० रुपये महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सेवा केंद्र, तसेच ग्रामपंचायत मध्ये महिलांची एकच गर्दी होत आहे. शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना चालू केलेली आहे. परंतु, मोबाईल अॅप चालत नाही, तसेच पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नसल्यामुळे अनेक महिलांची फॉर्म भरणे अद्यापही बाकीच आहे. रक्षाबंधनला ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्या महिलांच्या खात्यावर दोन हप्ते जमा होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आता जवळच रक्षाबंधन येत असल्यामुळे सर्वच महिला आपले फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, तसेच ही सेवा केंद्रावर गर्दी करताना पाहण्यास मिळत आहेत.
आताच प्राप्त नवीन माहिती नुसार, नारी शक्ती अँप आणि पोर्टल सध्या डाऊन आहे किंवा लॉगिन करताना बहिणींना बरेच प्रॉब्लेम येत आहेत. सर्वाना माहीतच आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे स्वतः फॉर्म भरून घेतले. या कार्यक्रमाला अवघे १२ तास लोटत नाही तोच या योजनेचे सर्व्हर बंद पडले आहे. मोबाईल अँप चालत नाही, पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नसल्याच्या तक्रारी सेवा केंद्र चालक करीत आहेत. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांनी योजनेचा शुभारंभ केला आहे: परंतु फॉर्म भरले जात नसल्याने बहिणी मात्र रुसल्या आहेत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कार्यक्रमाला २४ तास लोटत नाही तोच या योजनेचे राज्यभरातील पोर्टल बंद पडले. नारीशक्ती दूत मोबाईल अँपही ३ ऑगस्टपासून बंद पडल्याने अर्ज भरणे ठप्प झाले आहे. सध्या कामाचे दिवस असतानादेखील महिला अर्ज भरण्यासाठी शेतमजुरी सोडून घरी थांबत आहेत. या योजनेचे सव्र्व्हर ३ ऑगस्टपासूनच बंद पडल्याने काम ठप्प झाले आहे. या योजनेचे मोबाईल अँप आणि कॉम्प्युटर पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मेसेज फिरू लागले आहेत. एकाच वेळी लाखो फॉर्म येत असल्याने या पोर्टलवर लोड आल्याचे बोलले जात आहे. या पोर्टलची दुरूस्ती करण्यात येत असून, ६ ऑगस्टपर्यंत पोर्टल बंद राहणार असल्याचे सोशल मीडियावर संदेश फिरत आहेत.
घरबसल्याच करा लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज, नारीशक्ती वरून कसा करायचा अर्ज पूर्ण माहिती पहा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे स्वतः फॉर्म भरून घेतले. या कार्यक्रमाला अवघे १२ तास लोटत नाही तोच या योजनेचे सर्व्हर बंद पडले आहे. मोबाईल अॅप चालत नाही, पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नसल्याच्या तक्रारी सेवा केंद्र चालक करीत आहेत. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांनी योजनेचा शुभारंभ केला आहे: परंतु फॉर्म भरले जात नसल्याने बहिणी मात्र रुसल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे स्वतः फॉर्म भरून घेतले. या कार्यक्रमाला अवघे १२ तास लोटत नाही तोच या योजनेचे सर्व्हर बंद पडले आहे. मोबाईल अॅप चालत नाही, पोर्टलवरही फॉर्म अपलोड होत नसल्याच्या तक्रारी सेवा केंद्र चालक करीत आहेत. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात मोठ्या थाटात मुख्यमंत्र्यांनी योजनेचा शुभारंभ केला आहे: परंतु फॉर्म भरले जात नसल्याने बहिणी मात्र रुसल्या आहेत.
बहिणीचा फॉर्म भरला. राखी- पौर्णिमेच्या दिवशी बहिणींच्या खात्यावर पैसे येतील, असे जाहीर केले. या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला; परंतु आता सर्व्हर आणि नारीशक्ती दूत अॅप चालत नसल्याने बहिणींची फजिती होत आहे.
Comments are closed.