Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची पदे रिक्त – Nagpur Shikshak Bharti 2024

Nagpur Shikshak Bharti 2024

Nagpur Shikshak Bharti 2024

Nagpur Shikshak Bharti 2024: राज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नव्या शैक्षणिक धोरणांनुसार विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यात शाळांची संख्या दरवर्षी वाढत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मागील काही वर्षांपासून उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात चार उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना एकच कार्यरत आहे. तीन पदे रिक्त असल्याने प्रभारी पदभार सांभाळत आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर असताना एकच कार्यरत असून १२ पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५४ पैकी ३६ पदे रिक्त असल्याने प्रभारींच्या खांद्यावर भार वाढला आहे. अशा परिस्थितीत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर जि.प. शाळांचा दर्जा उंचावण्यासोबतच तळागाळांतील मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे. मात्र, रिक्त पदांमुळे उपक्रम राबविताना अडचणी येत आहे. रिक्त पदांमुळे जिल्ह्यात पेन्शनशी संबंधित शेकडो प्रकरणे रखडली आहेत. संबंधित शिक्षकाच्या निवृत्तीपूर्वीच त्याची प्रक्रिया सुरू होते, परंतु कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे काम विलंबाने मार्गी लागत असल्याचे चित्र आहे.

अशी आहेत रिक्त पदे
• जिल्ह्यात माध्यमिक व प्राथमिकसाठी उपशिक्षणाधिकाऱ्यांचे प्रत्येकी दोन असे चार पदे मंजूर आहेत. परंतु त्यापैकी प्राथमिकमध्ये एकच नियमित उपशिक्षणाधिकारी कार्यरत असून, उर्वरित तीन पदे रिक्त आहेत.
• गटशिक्षणाधिकाऱ्यांची १३ पदे मंजूर असून, एकच कार्यरत आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ५४ पैकी सुमारे ३६ पदे रिक्त आहेत.
• केंद्रप्रमुखांची १३६ पैकी २५ पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागात महत्त्वाची पदे रिक्त असल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे.

तपासणी, बांधकामावर परिणाम

• शाळांची नियमित तपासणी, नवीन शाळा खोल्यांची उभारणी, शाळा दुरुस्ती, शौचालयांची उभारणी, दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे यासह मुलांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे.
यासाठी जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी तर तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अंमलबजावणी होत असते. परंतु गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने भौतिक सुविधांवर परिणाम झाला आहे


Nagpur Shikshak Bharti 2023 – Nagpur district has the unfortunate picture of having no teachers to teach in schools with good student numbers. Shocking information has come to light that as many as 730 teacher posts are vacant in 1515 Zilla Parishad schools in 13 talukas of Nagpur district under Nagpur Shikshak Bharti 2023. While the total number of students in the district is 72 thousand 661, the number of teachers is 3760. 42 schools have one teacher in the district.

Nagpur Municipal Corporation (NMC) Recruitment Notification For Nagpur Shikshak Bharti 2023 & Recruitment application form is available @ www.nmcnagpur.gov.in. Nagpur Municipal Corporation (NMC) selection will be done on the basis of tests/interviews and shortlisted candidates will be appointed in Maharashtra. More details of www.nmcnagpur.gov.in recruitment, new vacancies, upcoming notices, syllabus, answer key, merit list, selection list, admit card, result, upcoming notifications and etc. will be uploaded on the official website about Nagpur Shikshak Bharti 2023.

 

 

विद्यार्थी पटसंख्या चांगले असलेल्या शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याचे दुर्दैवी चित्र नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर जिल्ह्याच्या १३ तालुक्यांतील १५१५ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल ७३० शिक्षकांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या एकूण ७२ हजार ६६१ इतकी असताना शिक्षकांची संख्या मात्र ३७६० इतकी आहे. जिल्ह्यात ४२ शाळा एक शिक्षकी आहेत.

 या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शिक्षक नाहीत म्हणून शाळा ओस पडल्याने विद्याथ्यांना चक्क शंभर किलोमीटरचा प्रवास करून थेट जिल्हा परिषद गाठावी लागल्याची घटना गेल्याच आठवड्यात नागपुरात घडली होती. नागपूर जिल्ह्यात असलेल्या काटोल तालुक्यात मलकापूर हे गाव आहे. गावात प्राथमिक शाळेत शिक्षण घेणान्या विद्याथ्यांची पटसंख्या १५ इतकी असून वर्ग १ ते ५ पर्यंतचे वर्ग भरवले जातात. मात्र, नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर शाळेत शिक्षकच नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते.

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात १०३ शाळा असून २८ पदे रिक्त आहेत. हिंगणा तालुक्यात १२३ शाळांमध्ये ८३ शिक्षक, कळमेश्वर तालुक्यात ८६ शाळांत ३९ पदे, कामठी तालुक्यात ७७ शाळांत ६१ शिक्षक, काटोल येथे ६१, कुही तालुक्यात ६५, मौदा तालुक्यात ७२, नागपूर ग्रामीणमध्ये ६१, नरखेड तालुक्यात ६३. पारशिवानी तालुक्यात ७७, रामटेक तालुक्यात ३६ सावनेर तालुक्यात ३८ आणि उमरेड ४५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 1)) सेवानिवृत्त शिक्षकांची दरवर्षीची संख्या गेल्या काही वर्षांपासून नवीन शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ७३० शिक्षकांची पद हे रिक्त झालेली आहेत. २०१८ यावर्षात १४३ शिक्षक निवृत्त झाले आहेत तर २०५९ साली हा आकडा १८५ इतका होता तर २०२० मध्ये २०५ शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. २०२५ साली २३७ तर २०२२ मध्ये २३६ शिक्षक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड