मुंबई विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

Mumbai University Started Helpline For Student


विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी ) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरु केली आहे. विद्यार्थी या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकतील.

कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु असल्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालये यांच्या परीक्षाबाबत राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समिती नियुक्त केली होती, त्या समितीच्या शिफारशीनुसार पदवी व पदव्युत्तर वर्षाच्या अंतिम सत्राच्या / वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. पदवीस्तरावरील द्वितीय व तृतीय वर्षाच्या व पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या प्रवेशाविषयीही निर्देश दिले होते. या संदर्भात अधिक तपशील विद्यापीठ प्रसिद्ध करेल असे जाहीर केले होते. यानुसार विद्यापीठ परीक्षा व प्रवेशाबाबत एक कृती योजना ( Action Plan ) तयार करीत आहे. यामध्ये प्रत्येक विद्याशाखेनुसार ( Faculty wise ) त्याचा सविस्तर तपशील लवकरच जाहीर करणार आहे.

तोपर्यंत जर विद्यार्थ्याना परीक्षा व प्रवेशाबाबत काही समस्या असेल किंवा अधिक मार्गदर्शन हवे असल्यास विद्यार्थ्यांनी खालील मोबाईल क्रमांक व ईमेलवर संपर्क करावा. विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेशाबाबत मार्गदर्शन मिळेल तसेच्या त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. हि हेल्पलाईन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

  • विद्यापीठ हेल्पलाईन क्रमांक : + ९१ ९६१९० ३४६३४ व + ९१ ९३७३७ ००७९७
  • ईमेल : examhelpline@mu.ac.in

आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी ईमेलद्वारे मदत 

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या विद्यार्थ्यांकरिता info@idol.mu.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा. या ईमेलवरून विद्यार्थी परीक्षा व प्रवेशाबाबत आपल्या समस्येचे निराकरण करू शकतील.Leave A Reply

Your email address will not be published.