मुंबई विद्यपीठाच्या प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ

Mumbai University FY Admission 2020

Mumbai university FY Admission 2020 : मुंबई विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतील प्रवेश पूर्व नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ केली आहे…

Mumbai university FY Admission 2020: मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या पहिल्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशपूर्व नोंदणी करण्यासाठी विद्यापीठाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. यापूर्वीदेखील एकदा मुंबईतल्या पावसामुळे विद्यापीठाने प्रवेश पूर्व नोंदणीसाठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी जाहीर झाली आहे.

या परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना आता ७ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून प्रवेश नोंदणीसाठी संकेतस्थळावरील लिंक अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. हि लिंक विद्यार्थ्यांना १४ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या लिंकमधून विद्यार्थी आपली प्रवेश नोंदणी करू शकतील. जे विद्यार्थी ७ ऑगस्टपासून प्रवेश नोंदणी करतील त्यांना महाविद्यालयांनी तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादीत समाविष्ट करून प्रवेश प्रकियेत सामील करावे, अशी सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिली आहे. विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावे लागतील, असेही विद्यापीठाने परिपत्रकात म्हटले आहे. http://mum.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी प्रवेश पूर्व नोंदणी करू शकतात.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Mumbai University Admission

प्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

  • अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०
  • प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)
  • प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)
  • पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)
  • कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)
  • मुदतवाढीनंतर प्रवेश पूर्व नोंदणी – ७ ऑगस्ट २०२० ते १४ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
प्रवेश पूर्व नोंदणी वेबसाईट – http://mum.digitaluniversity.ac/

मुंबई विद्यापीठ वेबसाईट – https://mu.ac.in/

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची यादी – http://academicaudit.mu.ac.in/AA/college_reps.php

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Kaushik rautkar says

    No entrace direct add n

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड