मुंबई विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा 30 नोव्हेंबर पर्यंत
Mumbai University Backlog Exams
Mumbai University Backlog Exams: Mumbai University Final Year Exam 2020 : मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम आणि द्वितिय वर्षाच्या २०१९-२० च्या बॅकलॉग परीक्षा (ATKT) ३० नोव्हेंबरच्या आत घ्याव्यात अशा सूचना मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा निर्णय जून २०२० पासून प्रलंबित होता. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यात आले होते आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतर १२० दिवसांच्या आत या बॅकलॉग परीक्षा घ्याव्यात असा सूचना कॉलेजांना करण्यात आल्या होत्या.
या परीक्षा आता कॉलेज स्तरावर बहुपर्यायी (MCQ) पद्धतीने ऑनलाइन होणार आहेत. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांच्या पदवी परीक्षा देखील अशाच पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. जून महिन्यात राज्य सरकारने परीक्षांबाबत शिफारसी सुचविण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीने बॅकलॉग परीक्षांबाबतच्या शिफारसीही दिल्या होत्या. कॉलेज सुरू झाल्यावर या परीक्षा घेण्यात याव्यात अशी समितीची शिफारस होती. पण करोना महामारीच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर कॉलेज प्रत्यक्ष कधी सुरू होणार, त्याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विद्यापीठाला १२० दिवसांच्या आता या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण त्यानंतर नियमित सत्र आणि त्यापुढे परीक्षांवर विद्यापीठाला लक्ष केंद्रित करावं लागणार नाही.
‘विद्यापीठाचे गेल्या काही महिन्यात पदवी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करणे हे प्राधान्य होते. ते पूर्ण झाल्यानंतर आता बॅकलॉग परीक्षांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. एकदा या परीक्षा पूर्ण झाल्या की दिवाळीनंतर सत्रअखेर परीक्षांवर लक्ष केंद्रित केले जाईल,’ असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ज्या महाविद्यालयांनी २३ मार्चपूर्वी बॅकलॉग परीक्षा घेतल्या आहेत, अशा महाविद्यालयांना नव्याने परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. दरम्यान, महाविद्यालयांना १२ ते १८ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी आहे.
Mumbai University Final Year Exam 2020 : मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या बॅकलॉगच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या.
Final Year ATKT Exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष / सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, विद्यापीठ शैक्षणिक विभाग आणि दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. चारही विद्याशाखेअंतर्गत विविध अभ्यासक्रम आणि विषयांच्या बॅकलॉगच्या परीक्षा आज सुरळीत पार पडल्या.
अत्यंत सुलभ अशा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नमूना प्रश्न पत्र व त्यांच्या सराव परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. काही विषयांच्या सराव परीक्षा अजूनही घेतल्या जाणार आहेत. काही अपरिहार्य किंवा तांत्रिक कारणास्तव एखादा विद्यार्थी परीक्षेला बसू शकला नसेल अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
बॅकलॉग आणि नियमित परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाने विद्याशाखानिहाय महाविद्यालयांचे ९४ समुह निर्माण केले आहेत. समुह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार आजच्या बॅकलॉगच्या परीक्षांचे यशस्वी आयोजन करण्यात आल्याचेही डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले
Mumbai University Final Year Exam 2020 : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ…
मुंबई विद्यापीठाच्या आणि संलग्न महाविद्यालयांमधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पदवी परीक्षा किंवा पदवीपूर्व बॅकलॉग म्हणजेच केटी परीक्षेसाठी अर्ज केला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने आणखी एक संधी दिली आहे. १८ सप्टेंबरपासून असे विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयामार्फत ऑनलाइन शुल्क भरून ऑनलाइन परीक्षा अर्ज भरू शकतात.
परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२० पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे केवळ तीन दिवस हे अर्ज भरण्यासाठी आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव अद्याप पदवी किंवा केटी परीक्षेचे अर्ज भरले नसतील, त्यांनी या तीन दिवसांच्या मुदतीत महाविद्यालयामार्फत ते भरावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही केले आहे.
दरम्यान, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील परीक्षा प्रवेश अर्ज भरण्याची लिंक आपोआप बंद होणार असल्यामुळे त्यानंतर अर्ज करता येणार नाही याची नोंद विद्यार्थी व महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापम मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.
महाविद्यालयांना विद्यापीठाने जारी केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्र, स्वाक्षरी, नाव, माध्यम, परीक्षा केंद्र, विषय आदि माहिती बरोबर भरल्या आहेत, याची खात्री करूनच अर्ज इनवर्ड करावा. ही माहिती गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रवेश अर्ज इनवर्ड झाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
Mumbai University Final Year Exam 2020 : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षांसंदर्भात एक महत्त्वाचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.
Mumbai University Final Year Exam 2020: मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, नियमित थिअरी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून MCQ पद्धतीने होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील. परीक्षा कशा होणार याची सर्व इत्यंभूत माहिती या वृत्तात सविस्तर देण्यात येत आहे.
परीक्षा महाविद्यालय स्तरावर
मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. क्लस्टर पद्धतीने महाविद्यालय जाणार आहेत. म्हणजेच एक लीड महाविद्यालय आणि त्याअंतर्गत त्या परिसरातील ६ ते ७ विद्यालय अशी मिळून क्लस्टर्स असतील. या एका क्लस्टरमध्ये एका वेळी एका वेळापत्रकानुसार, परीक्षा होतील. प्रश्नपत्रिकाही क्लस्टरनिहाय असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयाकडून सूचना मिळतील.
अभ्यासक्रम कोणता?
सर्व थेअरी परीक्षा १३ मार्च २०२० पर्यंत महाविद्यालयात शिकवण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.
परीक्षा पद्धती
सर्व थेअरी परीक्षा ऑनलाइन होतील. बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. परीक्षा ५० गुणांसाठी आणि १ तास कालावधीची असेल.
मूल्यांकन
ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक विषयाची थेअरी परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयाने लगेचच मूल्यांकन प्रक्रिया सुरू करून विद्यार्थ्याचे गुण तयार करावेत, थेअरी परीक्षेचे मूल्यांकन हे ५० गुणांचे असल्यामुळे संबंधित विषयाच्या कमाल (६०, ७५, ८०, १०० इत्यादी) गुणांनुसार रुपांतर करून दोन दिवसांच्या आत विद्यापीठाच्या ऑनलाइन सिस्टिमध्ये अपलोड करावेत, अशा सूचना विद्यापीठाने कॉलेजांना दिल्या आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी…
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेअरी परीक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात, (उदा. अतिरिक्त वेळ, लेखनिक इत्यादी.) असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.
एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी?
बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबर २०२० पासून सुरू कराव्यात, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. जर बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कॉलेजने फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतल्या असतील, तर पुन्हा घेऊ नयेत.
अन्य सर्व माहितीसाठी विद्यापीठाचे परिपत्रक येथे देण्यात येत आहे – https://bit.ly/35jjLvV
प्रॅक्टिकल / प्रोजेक्ट / व्हायव्हा परीक्षा कशा?
प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांच्या सहाय्याने ऑनलाइन पद्धतीने (झूम अॅप, गुगल मीट, स्काइप आदींवर) किंवा आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे व्हायवा म्हणजेच मौखित परीक्षा घ्यावी. या परीक्षा १५ सप्टेंबर २०२० पासून घ्याव्यात.
परीक्षा हुकल्यास…
जे विद्यार्थी काही कारणास्तव ऑनलाइन थिअरी परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांना पुन्हा संधी देण्याविषयी क्लस्टरमधील लीड महाविद्यालयामार्फत एकत्रित निर्णय घेतला जाऊन अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा नसल्यास…
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.
सोर्स : म. टा.
Table of Contents