मुंबई विद्यापीठातर्फे पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलली
Mumbai University Exam Dates
Mumbai University LLM Entrance Exam Date 2024
Mumbai University Exam Dates : मुंबई विद्यापीठाने एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. १० नोव्हेंबरला होणारी ही परीक्षा आता १७ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. देशभरात आयआयबीएफच्या माध्यमातून सीओ आणि पीओ पदांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षा ७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षार्थ्यांना अडचणी येऊ नये, यासाठी विद्यार्थी हित लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
दरम्यान, एलएलएम परीक्षा ऑनलाइन पद्धतीने विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. सद्यःस्थितीत सुमारे ४,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, असेही विद्यापीठाने सांगितले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Mumbai University Exam Dates : मुंबई विद्यापीठातर्फे पदव्युत्तर विधि अभ्यासक्रमाच्या (एलएलएम) प्रवेशपूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १० नोव्हेंबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित तारखेनुसार १७ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. संपूर्ण भारतात ७ ते १४ नोव्हेंबर आयआयबीएफ’ च्या परीक्षा नियोजित असल्याने कोणत्याही परीक्षार्थीना संभाव्य अडचणीमुळे प्रवेशपूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Mumbai University LLM CET Entrance Exam 2024-2025
मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेमुळे विधि क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या परीक्षेद्वारे गुणवत्ता आणि क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची निवड होईल, ज्यामुळे विधि क्षेत्रात उत्कृष्टता साध्य करण्यास मदत होईल.
एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा एक लेखी परीक्षा असून त्यामध्ये विधि क्षेत्रातील विविध तत्त्वांवर आधारित प्रश्न विचारले जातात. परीक्षेत संविधान, फौजदारी कायदा, दिवाणी कायदा, आंतरराष्ट्रीय कायदे, आणि मानवाधिकार या प्रमुख घटकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, लॉजिकल रीझनिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरही उमेदवारांची क्षमता तपासली जाते. प्रश्न बहुधा बहुपर्यायी स्वरूपाचे असतात आणि त्यासाठी विशिष्ट वेळ मर्यादा असते.
दिनांक ७ ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान संपूर्ण भारतात आयआयबीएफच्या माध्यमातून सीओ/ पीओच्या परीक्षा नियोजित असल्याने कोणत्याही परीक्षार्थींना संभाव्य अडचण उद्भवू नये यासाठी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेता ही ऑनलाइन एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा १० नोव्हेंबर ऐवजी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
Mumbai University New Exam Dates
Mumbai University Exam Dates: Mumbai University Exams cancled due to havy rain. Now exam will be held on 18th & 19th of July 2022. Further details are as follows:-
अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने १४ जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या. या परीक्षा आता १८ व १९ जुलै रोजी होणार आहेत. इंजिनीअरिंग, फार्मसी व एमएस्सी फायनान्स या परीक्षेच्या ९ विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेची केंद्रे यापूर्वी जी होती तीच राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
- अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने १४ जुलै रोजीच्या सर्व परीक्षा रद्द केल्या होत्या.
- या परीक्षा आता १८ व १९ जुलै रोजी होणार आहेत. इंजिनीअरिंग, फार्मसी व एमएस्सी फायनान्स या परीक्षेच्या ९ विषयांची परीक्षा होणार आहे.
- या परीक्षेची केंद्रे यापूर्वी जी होती तीच राहणार आहेत. मुंबई विद्यापीठाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
- कम्युनिकेशन स्किल्स, प्रोफेशनल कम्युनिकेशन एथिक्स-१, फायनान्शियल अकाऊंटिंग अँड मॅनेजमेंट, इंटरप्रेन्युअरशीप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स अँड सीएसआर, फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीज या विषयांच्या परीक्षा सोमवार १८ जुलै रोजी होणार आहेत.
- क्लिनिकल इम्युनोलॉजी अँड इम्युनोपॅथॉलॉजी या विषयाची परीक्षा १९ जुलै रोजी होणार आहे.
परीक्षेच्या तारखेसंदर्भात समाजमाध्यमात काही चुकीचे संदेश पसरत आहेत, त्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करावे. विषयांच्या तारखेबाबत विद्यापीठाची वेबसाइट व आपल्या संबंधित कॉलेजशी संपर्क साधावा असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
Mumbai University Exam Dates
Mumbai University Exam Dates: All the Mumbai University Examinations scheduled for today have been canceled due to heavy rains. New exam dates will be available soon. Further details are as follows:-
मुंबई विद्यापीठाने उद्या गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले आहे. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
- सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
- आज मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत, असे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी म्हटले आहे.
Mumbai University Idol MA And MCom Exams Postponed
Mumbai University Exam Dates : Following the demise of Empress Lata Mangeshkar, the Government of Maharashtra has declared a public holiday on Monday, February 7, 2022. As a result, Idol’s M.A. And m. Com. Exams have also been postponed. Further details are as follows:-
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परिणामी ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आयडॉलच्या एम.ए. आणि एम. कॉम. परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाने यासंदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आयडॉलच्या सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी बंद राहणार आहे. परिणामी ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या एम.ए. आणि एम. कॉम अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Mumbai University Exam Dates Declared
Mumbai University Exam Dates : Mumbai University Examinations will be conducted online through Multiple Choice Questions (MCQ) system. Session 5 of the Traditional Arts, Commerce and Science Degree will be held from November 17 to December 4, 2021. Further details are as follows:-
Mu Winter Semester Exam Dates
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत. पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ५ च्या परीक्षा १७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सत्र ५ च्या काही परीक्षांचे वेळापत्रक आणि क्वेश्चन बँक विद्यापीठ पाठविणार
The schedule of BA (MMC), BMS, BCom (Account & Finance), BCom (Financial Management), BCom (Banking & Insurance), BCom (Investment & Management), BCom (Finance & Marketing), BCom (Commerce), BCM (Trace) Science), B.Sc (Biotechnology), B.Sc (Human Science), B.Sc (IT), B.Sc (Hospitality Studies), B.Sc (Aviation) and B.Sc (Aeronautics) 5th session examination will be announced separately and the question paper for this examination will be sent to the university.
कला , वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र १ व ३, अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र पदवी परीक्षा सत्र ७, बीएड परीक्षा सत्र ३, विधी पदवी परीक्षा सत्र ५ व ९ या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्र जाहीर करण्यात येईल व याची प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे. तसेच पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र ६ च्या बॅकलॉगच्या परीक्षा ७ ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान होतील. तर पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र २ व ४ च्या बॅकलॉगच्या परीक्षा १ ते १५ डिसेंबर २०२१ दरम्यान होतील.
Table of Contents