मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक कॅलेंडर जारी – जाणून घ्या!
Mumbai University Academic Calendar Declared
Mumbai University Academic Calendar Declared : मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांसाठी विद्यापीठ प्रशासनाने अखेर शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार यंदा कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या सुट्टीत कपात होणार असून, अवघ्या १३ दिवसांची उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. याचबरोबर सत्रात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार आवश्यक शैक्षणिक कालावधीही पूर्ण होत नसल्याची टीकाही शिक्षक संघटना करत आहेत.
राज्य सरकारच्या नव्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व विद्यापीठांना त्यांचा शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा सर्वच कॉलेजांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक वेळापत्रकाकडे सर्व कॉलेजांचे लक्ष लागून राहिले होते. कॉलेजांमध्ये नव्या वर्षात नव्या सत्राचा अभ्यास सुरू होईल. यासाठी कॉलेजांची तयारी पूर्ण झाली असून, दुसऱ्या सत्रातही ऑनलाइन लेक्चरद्वारेच विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि आर्किटेक्चर, मॅनेजमेंट स्टडीसह इतर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कॉलेजांनी त्यांचे पहिले सत्र ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. तर दुसरे सत्र १ जानेवारी, २०२१ ते ३१ मे, २०२१पर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. यानंतर १ ते १३ जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी असेल. या वेळापत्रकाच्या आधारे ९० दिवसांचा शैक्षणिक कालावधी पूर्ण होत नसल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाने उपकेंद्रासाठीही वेळापत्रक जाहीर केले आहे. ठाणे उपकेंद्रातील बीएमस आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी देखील वेळापत्रक जाहीर केले आहे.
Mumbai University Academic Calendar Declared – असे आहे वेळापत्रक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पहिले सत्र : ७ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर, २०२०
- दुसरे सत्र : १ जानेवारी ते ३१ मे, २०२१
- उन्हाळी सुट्टी : १ जून ते १३ जून, २०२१
प्रथम वर्षासाठी नवे वेळापत्रक?
इंजिनीअरिंग, एमबीए, विधी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नाहीत. यामुळे प्रथम वर्षासाठी हे वेळापत्रक लागू होऊ शकणार नाही. यामुळे यासाठी विद्यापीठ स्वतंत्रपणे पुन्हा वेळापत्रक जाहीर करणार आहे का, असा प्रश्नही प्राध्यापक विचारत आहेत.
सोर्स : म. टा.
Table of Contents