मुंबई महापालिकेत यापुढे कामगार भरती नाही

Mumbai Mahanagar Palika

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील कर्मचार्‍यांना बढती आणि पदोन्नती देत रिक्त पदे भरण्याचे फर्मान सोडणार्‍या आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी आता नवीन सर्वसाधारण पद भरतीवर रोख आणण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिका आयुक्तांनी सोमवारी परिपत्रक जारी करत हे निर्देश दिले आहेत.

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महसुली उत्पन्न कमी होत असल्याने महापालिका भविष्यात आर्थिक संकटात येण्याची भीती वर्तवली आहे. त्यामुळेच त्यांनी नवीन कामगारांची भरती रोखण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेत यापुढे रस्ते, पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, मलनि:सारण, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण या सेवांमध्ये थेट संबंधित असणारे कर्मचारी तसेच अधिकारी जसे की इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स यांचीच पदभरती करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे चतुर्थ श्रेणीतील कामगार, शिपाई, लिपिक तसेच इतर पदांसाठी भविष्यात कोणत्याही प्रकारची भरती होणार नाही.

महापालिकेचे माजी आयुक्त अजोय मेहता तसेच विद्यमान अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड यांनी सुरुवातीपासून नवीन कामगार भरतीऐवजी कंत्राटी पध्दतीने कामगार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे परदेशी यांनी महापालिका आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर, त्यांनी रिक्तपदे भरण्याचे निर्देश दिल्याने सर्वच अधिकार्‍यांचे डोळे विस्फारले होते. परंतु आर्थिक मंदीचा फटका बसत असल्याने आणि भविष्यातील आर्थिक संकटाचा विचार करत आयुक्तांना फक्त डॉक्टर आणि इंजिनिअर्स ही पदे भरण्यास सांगितले आहे.


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा !