मुंबई महापालिकेत अभियंत्यांची भरती लवकरच होणे अपेक्षित! – Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

Mumbai Mahanagar Palika Mega Bharti 2023

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: For the past three months, the state government’s red tape has stuck the point of the recruitment process for engineers in the civic body under Mumbai Mahanagar Palika Bharti 2023. As a result, the recruitment of 664 prospective engineers has been put on hold. Therefore, future engineers who are looking forward to this recruitment process are worried. There is a demand that the state government should announce the point list at the earliest and submit it to the municipal administrator.

 

गेल्या तीन महिन्यांपासून राज्य सरकारच्या लालफितीमध्ये महापालिकेत अभियंत्यांच्या भरती प्रक्रियेची बिंदू नामावली अडकली आहे. यामुळे पालिकेत येवू घातलेल्या ६६४ भावी अभियंत्यांची भरती रखडलेली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेकडे आस लावून बसलेले भावी इंजिनियर्स चिंतेत आहेत. राज्य सरकारने लवकरात लवकर बिंदू नामावली जाहीर करून ती पालिका प्रशासकाकडे सादर करण्याची मागणी होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 



महाराष्ट्र शासनाने केलेल्या सूचनेनुसार बिंदू नामावली तयार केली जाते. सरकारच्या बिंदू नामावलीप्रमाणे विविध विभागातील पदभरती होते. दरवर्षी बिंदू नामावली सुधारित केली जाते. समाजातील विविध प्रवार्गांना आरक्षण लागू असल्याकारणाने सर्वांना समान न्याय देणे व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी बिंदू नामावली दरवर्षी सुधारितरित्या प्रसिध्द होते. मात्र ती ‘तीन महिन्यांपासून राज्य सरकाकडे धूळखात पडलेली आहे.

पालिकेतील अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. यासाठी ६६४ अभियंत्यांची पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता पदी ३६९ आणि दुय्यम अभियंतापदी ३१५ पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे भरण्यास महापालिका प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे. यासाठी राज्य सरकारच्या बिंदू नामावलीची आवश्यकता असते. तीन महिन्यांपूर्वी प्रशासकाने राज्य सरकारकडे बिंदू नामावलीचा प्रस्ताव सादर केला आहे. परंतु सरकारकडून तो महापालिका प्रशासनाकडे अद्यापही आला नसल्याने भावी अभियंत्यांची गेल्या तीन महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भरतीची जाहिरात प्रकाशित होवू शकली नाही, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी सूत्रांनी दिली.

 


मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. महापालिकेत सध्या ४२ हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत ५३ हजार रिक्त जागा असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ने केला आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये. त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची मणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या कामाचा पसारा मोठा आहे. मुंबईतील मुख्यालयाबरोबरच २४ वॉर्डातूनही काम चालते. एकूण १ लाख ४० हजार जागा असून त्यापैकी महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी ९८ हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे कायमस्वरूपी लवकरच भरती. 

 

मुंबई महापालिकेत असलेल्या रिक्त जागांमुळे सध्या पालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. महापालिकेत सध्या ४२ हजार जागा रिक्त असल्याची माहिती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र, पालिकेची ही आकडेवारी खोडून काढत ५३ हजार रिक्त जागा असल्याचा दावा ‘दि म्युनिसिपल युनियन’ ने केला आहे.

मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे निवडणूक कामांची जबाबदारी पालिका कर्मचाऱ्यांना देऊ नये. त्यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांची मणूक करण्याची मागणी युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे.

महापालिकेच्या कामाचा पसारा मोठा आहे. मुंबईतील मुख्यालयाबरोबरच २४ वॉर्डातूनही काम चालते. एकूण १ लाख ४० हजार जागा असून त्यापैकी महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी ९८ हजार कर्मचारी असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या ४२ हजार रिक्त जागा आहेत. यापैकी २८ हजार जागांवर कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत.

 


लवकरच भरती
■ महापालिकेत १,१०० लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. लवकरच या पदांवर कर्मचारी नियुक्त
होतील. तर १७०० लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून, त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai Agnishamak Vibhag Bharti 2023

■ मुंबई अग्निशमन दलात ९१० अग्निशमन दलाच्या जवानांची भरती होत असून, त्यापैकी ५०७ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. येत्या काही महिन्यांत आणखी सुमारे ४५० जवानांची भरती केली जाणार आहे.

■ तर ४०० हून अधिक अभियंत्यांचीही भरती केली जाणार असून त्या प्रक्रियेसाठी एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे

 


Mumbai MahanagarPalika Medical College Bharti 2023

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 : Thousands of patients come to Nair, Nair Dental, KEM, Sion and Cooper Hospitals in Mumbai not only from Mumbai but also from outside states. Regularly all these five hospitals are overflowing with patients. Many surgeries have a waiting list in these hospitals. It is also being questioned that what is the use of contract thinking for doctor recruitment when there is no time for a month for CT and MRI tests. 439 posts (27 percent) are vacant out of total 1606 posts of teachers in Nair, Nair Dental, KEM, Sion and Cooper Hospitals affiliated to four medical colleges under the jurisdiction of Mumbai Municipal Corporation. Doctors occupying 323 posts (20 percent) of these total posts are filled on contractual basis.The vacancies will be advertised and filled through MPSC. The file is at the ministerial level. Preference will be given to fill the posts of Assistant Professor.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील चार वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या नायर, नायर डेंटल, केईएम, सायन व कूपर रुग्णालयातील अध्यापकांच्या एकूण १६०६ पदांपेकी ४३९ पदे (२७ टक्के) रिकामी आहे. या एकूण जागांतील ३२३ पदांवर (२० टक्के) असणारे डॉक्टर्स हे कंत्राटी पद्धतीने भरले गेले असून ते अनेक वर्षे काम करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला डॉक्टरांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी केव्हा मुहूर्त मिळणार, असा संतप्त सवाल डॉक्टरांकडून विचारला जात आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत नवीन भरती सुरू; ‘या’ पदांसाठी मिळणार 75 हजार पर्यंत पगार

मुंबई वा राज्यातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमधूनही हजारो रुग्ण मुंबईतील या रुग्णालयांमध्ये येत असतात. नियमितपणे ही पाचही रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरून वाहत असतात. अनेक शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी या रुग्णालयांमध्ये आहे. सीटी आणि एमआरआयच्या चाचण्यांसाठी महिनाभर वेळ मिळत नाही, अशी स्थिती असताना डॉक्टर भरतीबद्दल कंत्राटी विचारसरणी काय कामाची, असाही सवाल केला जात आहे.

सेवेत समाविष्ट होण्याचे वय खुला वर्गासाठी ३८ तर आरक्षित वर्गासाठी ४३ आहे

ज्यावेळी डॉक्टरांची भरती निघेल त्यावेळी कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या डॉक्टरांना घेऊ असे सांगण्यात येत आहे. मात्र, सरकारी सेवेत समाविष्ट होण्याचे वय खुला वर्गासाठी ३८ तर आरक्षित वर्गासाठी ४३ आहे. अनेक डॉक्टरांचे वय आता निघून जाण्याच्या मार्गावर आहे. सरासरी पाच ते सात वर्षांपासून डॉक्टर कंत्राटी पदावर काम करत आहेत. इतकेच नव्हे तर काही डॉक्टर कंटाळून सोडून गेले आहेत.

अनेक वर्षे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती झालेली नाही

वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात डॉक्टर भरतीचे पहिले पद म्हणजे सहाय्यक प्राध्यापक असे असून या प्राध्यापकावर रुग्ण तपासण्याची प्राथमिक जबाबदारी असते. महापालिकेत गेली अनेक वर्षे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती झालेली नाही. गेली अनेक वर्षे या पदावर कंत्राटी तत्वावर डॉक्टरांची भरती केलेली आहे.

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?

  1. सरकारी सेवेत समाविष्ट होण्याचे वय निघून गेल्यावर काय करणार ?
  2. ५ ते ७ वर्ष काम केलेल्या कंत्राटी डॉक्टरांना मिळणारे वेतन आणि नुकतेच पदव्युत्तर पदवी पास केलेल्या बॉन्डेड डॉक्टरांचे वेतनसारखेच कसे ?
  3. डॉक्टरांच्या मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत मग जाहिरात का काढत नाही ?
  4. गेली पाच वर्ष पदभरती का गेली नाही ?
  5. नियमित डॉक्टरांप्रमाणे कंत्राटी डॉक्टरांना रजा का नाही?

बिंदुनामावली बनविण्याचे काम सुरू आहे. सर्व पदांचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर लवकरच रिकाम्या पदाची जाहिरात काढून एमपीएससीमार्फत ही पदे भरण्यात येणार आहेत. फाईल मंत्रालयीन स्तरावर आहे. सहायक प्राध्यापकाची पदे भरण्यासाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे.
– डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त


Mumbai MahanagarPalika Bharti 2023

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 – A total of 1 thousand 797 posts of constable post are vacant under school in Mumbai Municipal Corporation. So, 391 porters and 122 gardeners and keeper posts are vacant. RTI activist Anil Galgali had sought information about vacancies under schools in the Mumbai Municipal Corporation from the Education Officer’s office. From this information it was revealed that the posts of constable, porter and gardener-keeper are largely vacant. The total number of sanctioned constable posts is 2 thousand 635 and the number of vacant posts is 1 thousand 797. Hamal posts are 602 and currently 391 posts are vacant. Whereas 122 posts of gardeners and guards are vacant and the number of sanctioned posts is 231.

 

मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई पदाची एकूण १ हजार ७९७ पदे रिक्त आहेत. तर, ३९१ हमाल आणि १२२ माळी आणि रखवलदारांची पदे रिक्त आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत रिक्त पदांची माहिती मागितली होती. या माहितीतून शिपाई, हमाल आणि माळी- रखवलदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याचे समोर आले. शिपाई पदाची एकूण मंजूर पदे २ हजार ६३५ असून रिक्त पदांची संख्या १ हजार ७९७ आहे. हमाल ही पदे ६०२ असून सध्या ३९१ पदे रिक्त आहेत. तर माळी आणि रखवलदारांची १२२ पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या २३१ आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मुंबई जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

प्रत्येक शाळेत शिपाई हे पद महत्वाचे असून मोठ्या प्रमाणावर ही पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढवली असून रिक्त पदे तत्काळ भरावीत, असे पत्र गलगली यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे.

 


IBPS has been appointed to recruit engineers and a proposal has been sent to the Konkan Divisional Commissioner for approval for the point list of reserved posts, the Engineer Association informed that the Municipal Commissioner has informed.

 

अभियंत्यांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली असून राखीव पदांच्या बिंदू नामावलीसाठी कोकण विभागिक आयुक्तांकडे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती इंजिनिअर असोशिएशने दिली.

पालिकेच्या सेवेत अभियंता पदवी आणि पदवीका प्राप्त केलेल्या कर्मचार्यांसाठी कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यासाठी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पाठपुरावा केला होता. प्रमुख अभियंता, उपायुक्त, अभियांत्रिकी या पदाच्या पदोन्नतीसाठी लाभ मिळेल, असे अतिरिक्त सरचिटणीस संजय जाधव यांनी यांनी सांगितले.

 


जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एकमत होत नसल्याने संप लांबला आहे. या संपाचा राज्यातील आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होऊ लागला असून, त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. संपाच्या सुरुवातील जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी, परिचारिका आणि शिकाऊ परिचारिकाची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच संपात सहभागी न झालेल्या काही बदली कामगारांच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरविण्यावर भर देण्यात येत होता. मात्र संप अधिकच चिघळत असल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत चालावी यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी लवकरच जे.जे. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी.टी. रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यात येणार आहेत. रुग्णालयातील कक्ष सेवक, आया, सफाई कामगार आणि शिपाई यांची कामे करण्यासाठी हे कंत्राटी कर्मचारी घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

 

संप चिघळल्यास रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता आहे. रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला काही अवधी लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

 


 

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 – The scope of work of Mumbai Municipal Corporation is huge. Along with the headquarters in Mumbai, the work is also carried out in 24 wards. Currently, there are 98 thousand of permanent employees to manage the finances of the Municipal Corporation. Apart from that, there are 42 thousand vacancies and out of these 28 thousand are contract employees.

In view of the vacancies in the municipality and the workload on the working employees, it has been decided to fill seven thousand vacancies at present. A senior official of the Mumbai Municipality informed that these will be third and fourth class seats.

मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात असलेल्या रिक्त जागांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो. त्यामुळे महापालिकेने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या सात हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्यात लिपिक पदाच्या १,१०० जागा अंतर्गत परीक्षेद्वारेच भरण्यात येणार आहेत. 

मुंबई महापालिकेच्या कामाचा पसारा मोठा आहे. मुंबईतील मुख्यालयाबरोबरच २४ वॉडांतूनही काम चालते. महापालिकेचा डोलारा सांभाळण्यासाठी सध्या कायमस्वरूपी ९८ हजार कर्मचारी आहेत. त्याव्यतिरिक्त ४२ हजार रिक्त जागा असून यापैकी २८ हजार जागांवर कंत्राटी कर्मचारी आहेत. सहा महिने, वर्षभर किंवा तीन वर्षे अशा विविध कालावधीकरीता त्यांची नेमणूक केली जाते. पालिकेतील रिक्त जागा आणि कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा ताण पाहता सध्या सात हजार रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या या जागा असतील, अशी माहिती मुंबई पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

तृतीय आणि चतुर्थ श्रेणींची पदे भरणार

सात हजारपैकी १,१०० लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी शासनमान्य असलेल्या एका संस्थेची निवडही केली असून त्यांच्याकडून प्रक्रिया सुरू आहे. साधारण तीन महिने या प्रक्रियेला लागतील. ती पूर्ण होत असतानाच आणखी ९०० जागा लिपिक पदासाठी बाह्य पद्धतीने भरण्यात येणार आहेत.

लिपिक पदे : Mumbai Municipal Corporation Lipik Bharti 2023

■ पहिल्या टप्प्यात १,१०० जागा अंतर्गत परीक्षेद्वारे
■ ९०० जागांसाठी बाहेरून अर्ज मागविणार

पावसाळ्यानंतर जागा भरणार

साधारणपणे पावसाळ्यानंतर या जागा भरल्या जातील. त्यासाठी बाहेरील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार असल्याचे सांगितले. ऊर्वरित पाच हजार रिक्त जागाही अशाच दोन्ही प्रकारे भरल्या जातील. बाहेरून अर्ज मागविल्यानंतर उमेदवाराला त्याच्या परिसरातच परीक्षा केंद्र मिळावे, यासाठी मुंबई पालिकेकडून विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.


Mumbai Mahanagar Palika Bharti 2023

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 -As announced by the Chief Minister, 40,000 vacant posts in all Municipal Corporation establishments in the state will be filled under the Amrit Mahotsava year of independence, according to the said matter, information should be given regarding the recruitment of vacant posts in the junior engineer and secondary engineer cadres to be filled through the office of the City Engineer of Brihanmumbai Municipal Corporation. More updates about this bharti process will be available on MahaBharti soon.

 

मा. मुख्यमंत्री यांनी जाहिर केल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षी राज्यातल्या सर्व महानगर पालिकेच्या आस्थापनावरील ४०,००० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, उक्त विषयास अनुसरून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंता यांच्या कार्यालयामार्फत भरण्यात येणा-या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता संवर्गातील रिक्त पदांच्या भरती बाबतची माहिती देण्यात यावी.

सद्यस्थितीत कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता संवर्गाकरीता अनुक्रमे ३४९ व ३१५ रिक्त पदे भरण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही कार्यान्वित आहे. आवश्यक प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर http://portal.mcgm.gov.in जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

BMCRecruitment 2023

 


Previous Updates : 

मुंबई महापालिकेच्या विधी खात्यातील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी(श्रेणी २) या दोन पदांच्या रिक्त जागा आता भरल्या जाणार आहेत. सहायक कायदा अधिकारी या श्रेणीतील ३४ पदे आणि सहायक कायदा अधिकारी (श्रेणी २)मधील १९ अशाप्रकारे एकूण ५३ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक केलेली असून लवकरच याबाबतची जाहिरात प्रदर्शित करून अर्ज मागवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या विधी खात्यातील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी २) या श्रेणतील रिक्त पदे जाहिरात देऊ सरळसेवेने भरली जाणार आहे. या पदांसाठी जाहिरातील नमुद केलेल्या सेवा प्रवेश निकषांनुसार निश्चित केलेल्या अटी,अर्हता तसेच शर्ती पूर्ण करत असलेल्या पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या ऑनलाईन परीक्षेमध्ये मराठी(२०), इंग्रजी (२०), सामान्य ज्ञान आधारीत प्रश्न(२०), बौध्दिक क्षमता आधारीत प्रश्न (२०) व महापालिका प्रशासनाशी संबंधित घटकांवर आधारीत प्रश्न (१२०) अशाप्रकारे एकूण २०० गुणांचा बहुपर्यायी वस्तूनिष्ठ प्रश्न पध्दतीचा अंतर्भात करण्यात आलेला आहे. या ऑनलाईन परीक्षेमध्ये उच्च गुणवत्तेनुसार व पात्र उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या योग्य पडताळणीनुसार सरळ सेवेने ही पदे भरली जाणार आहेत.

 

ही परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. या परीक्षे प्रक्रियेसाठी सुमारे १ हजार अर्ज अपेक्षित असून त्यानुसार आयबीपीएस या संस्थेला ११ लाख ४१ हजार ६० एवढा खर्च अपेक्षित आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून मागासवर्ग प्रवर्गाकरता १२२१ रुपये आणि खुल्या प्रवर्गाकरता १३५७ रुपये आकारले जाणार आहे. उमेदवारांकडून अनुक्रमे १२२१ रुपये व १३५७ रुपये शुल्क आकारले जाणार असले तरी प्रत्यक्षात एका जागेच्या भरती प्रक्रियेसाठी २१ हजार १३० रुपये महापालिका आयबीपीएस या संस्थेला मोजणार आहे.

यापूर्वी विधी खात्यातील सहाय्यक कायदा अधिकारी व सहाय्यक कायदा अधिकारी (श्रेणी२) या श्रेणीतील रिक्त पदे भरण्यासाठी सन २०१६ व २०१७मध्ये ऑनलाईन प्रक्रिया महापालिकेच्या निकषांनुसार यशस्वीरित्या राबवून भरती प्रक्रियेचे कामकाज समाधानकाररित्या पूर्ण केले आहे. त्या या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महापालिकेच्या परिपत्रकातील शासन निर्णयानुसार आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही पदांच्या रिक्त जागा आणि महापालिकेतील न्यायालयीन दाव्यांची संख्या वाढत असल्याने दावे निकाली काढण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने तसेच न्यायालयाकडून महापालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त होत असल्याने तसेच मनुष्यबळाअभावी दावे महापालिकेच्या विरोधात जात असल्याने ही पदे तात्काळ भरण्याची आवश्यकता असल्याचे विधी विभागाचे म्हणणे आहे.


Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: The Mumbai Municipal Corporation has security departments to protect its offices, properties and water supply dams. 1735 posts are vacant in this department due to non-recruitment in last 4 years. The municipality has decided to recruit 50 percent of them i.e. 849 security guards (BMC Security Guards Recruitment). The security department (BMC Security Department) has informed that the administrative level is proceeding in this regard and the recruitment process can be completed in the next six months. Due to this, job opportunity in BMC will be available to the unemployed youth. For More details about Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 see below:

महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कनिष्ठ लिपिकांची ११०० पदांची भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जाहिरात महिनाभरात सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. २ हजार कनिष्ठ लिपिक पदांची भरती मुंबई महानगरपालिकेत होणार आहे. भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता पाहता संपूर्ण राज्यात या भरती प्रक्रियेसाठीची केंद्र उपलब्ध करून देता येतील का? याबाबतची चाचपणी सध्या महानगरपालिका स्तरावर सुरू आहे.

मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी ११०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्रयस्थ संस्थेला हे काम देण्यात आले आहे. या संस्थेसोबत महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचा करारही झाला आहे. आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थेकडून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तब्बल दहा वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेत दरवर्षी रिक्त होणाच्या पदांनुसार लिपिक पदाची सुमारे ४० टक्के पदे ही रिक्त आहेत. त्यासाठीच दोन टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात ११०० पदांची भरती करण्यात येईल. तर उरलेल्या टप्प्यात उर्वरीत ९०० पदांची भरती करण्यात येणार आहे. सरळसेवा तसेच अंतर्गत अशा दोन्ही पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यातील ११०० पदांसाठी येत्या महिन्याभरात जाहिरात निघणे अपेक्षित आहे. भरतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता आहे.

 


Previous Update Given Below: 

मुंबई महानगरपालिकेत सध्या सुरक्षा रक्षक (BMC Security Guards Recruitment) पदावर कार्यरत असणाऱ्यांची एकूण संख्या २ हजार १९४ असली तरी अजूनही १ हजार ७१५ पदे सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त आहेत. (BMC Security Department) मुख्य रक्षक पदी २०५ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. 

Mumbai Mahanagar Palika security guards Bharti 2023

  •  जमादारपदी ३७ जण कार्यरत असून १० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सुरक्षा रक्षक विभागात एकूण २ हजार ३४७ पदे कार्यरत असून १ हजार ७३५ पदे रिक्त आहेत. ही पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी म्युनिसिपल युनियनने कामगार आयुक्तांकडे केली आहे.
  • दरम्यान, भरती प्रक्रिया सुरु करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आदेश दिले होते. त्यानुसार ८४९ सुरक्षा रक्षक पदे भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही सुरु आहे.
  • मात्र येथे २४ जागा रिक्त आहेत. मुख्यालयात एका शिफ्टमध्ये केवळ २३ सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात असतात. त्यातही सुट्टीवर गेल्यास एका शिफ्टमधील २३ ची संख्या आणखी कमी होते.
  • मुंबई महापालिकेचे मुख्यालय हे नेहमीच दहशतवाद्यांच्या केंद्र स्थळी राहिले आहे. पाकिस्तानी आतंकवादी अजमल कसाब याने मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी पालिकेच्या, मागील बाजूस केलेल्या गोळीबारात एका सुरक्षा रक्षकाला गोळी लागली होती.

 


Previous Update –

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022: Good news for job seekers!! as per the latest news, there are a total of 10 thousand posts will be recruited soon in Mumbai Municipal Corporation. The recruitment process of Mumbai Municipal Corporation, which has been stalled since 2017, will be cleared. Further details are as follows:-

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023

मुंबई महानगरपालिकेचा २०१७ पासून रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध पदांअंतर्गतच्या सुमारे १० हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्य सरकारच्या शासन आदेशाच्या पाठोपाठच मुंबई महानगरपालिकाही भरतीबाबतचे एक परिपत्रक जारी करणार आहे. त्यामुळे पालिकेतील विविध विभागनिहाय भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्रयस्थ संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया करण्याबाबतची स्पष्टता या परिपत्रकामुळे येणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाला भरती करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करता येईल. कोरोनामुळेही ही भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांमध्ये रखडली होती.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

  • मुंबई महानगरपालिकेच्या १० हजार कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून मंदावली होती.
  • परंतु शासनाच्या अध्यादेशामुळे आता एजन्सी नेमण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • पालिकेकडूनही परिपत्रक काढण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
  • त्यामध्ये एजन्सीसोबत करण्याचे करार, अटी व शर्थी यासारख्या बाबींचा समावेश असणार आहे.
  • त्यामुळेच पालिकेच्या विविध विभागांमध्ये असलेली मनुष्यबळाची भरतीसाठीची प्रक्रिया सुरू करता येणे शक्य होणार आहे.
  • येत्या आठवड्याभरात हे परिपत्रक पालिकेकडून जारी होणे अपेक्षित आहे.
  • त्यामुळे पालिकेतील विविध विभागांना भरती प्रक्रियेसाठीची एजन्सी नेमून रिक्त जागांची भरती करणे शक्य होईल.
  • परिपत्रक निघाल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यात ही प्रक्रिया पुर्ण करणे शक्य असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
  • त्यामुळे नव्या वर्षात जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Update –

मुंबई महापालिकेत 5 हजार पदांची भरती होणार!! 

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022: Good news for job seekers!! Mumbai Municipal Corporation will recruit 5 Thousand posts. The ban on recruitment in Mumbai Municipal Corporation from 2019 will be lifted soon. For more details about Mumbai Municipal Corporation Recruitment, Mumbai Mahanagar Palika Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

मुंबई महापालिकेत 2019 पासूनची नोकर भरतीवरील बंदी लवकरच उठणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबई महापालिकेत 5 हजार पदांची भरती होणार असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mumbai Municipal Corporation Recruitment 2023

कामगार संघटना आणि पालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने नोकर भरतीवरील बंदी उठवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले आहे. पण, नेमक्या किती जागा भरल्या जाणार याचा निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत. गेल्या तीन वर्षांत पालिकेत भरती झालेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत सुमारे 30 ते 40 हजार पदे रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. या निर्णयाचे पडसाद याआधी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीत उमटले होते.


Mumbai Mahanagar Palika Vacant Posts

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023 : Out of total 505, 88 posts are vacant. The staff consists of senior inspectors, inspectors and workers. The highest number of vacancies is for workers at 81. There are 373 sanctioned posts and the current number is 292. Further details are as follows:-

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी मुंबई महाननगरपालिकेकडे (BMC) अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे निष्कासितकरण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती विचारली होती. एकूण ५०५ पैकी ८८ पदे रिक्त असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांनी मुंबई महान नगर पालिकेकडे अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती विचारली होती. अनुज्ञापन अधीक्षक यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, अनुज्ञापन खात्याच्या आस्थापनेवर अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी कर्मचारी वृंदात वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, कामगार अशी पदे आहेत.

सर्वात जास्त रिक्त पदे कामगारांची असून त्याची संख्या ८१ आहे. मंजूर पदे ३७३ असून सद्या कार्यरत संख्या २९२ आहे. वरिष्ठ निरीक्षक ही २५ मंजूर पदे असून ५ पदे रिक्त आहेत. तर निरीक्षक यांची मंजूर पदे १०७ असून सद्यस्थितीत १०५ पदे कार्यरत आहेत. मंजूर संख्या मुंबईतील वाढलेल्या फेरीवाल्यांच्या तुलनेत कमी आहे. याकामी क्लीन अप मार्शल यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे. असा एक मतप्रवाह आहे. आता पालिका या कर्मचाऱ्यांचा कसा वापर करून घेते आहे. हे येत्या काळात दिसून येईल.


Mumbai Mahanagar Palika Vacant Posts

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022 : Important – As many as 2,500 posts of clerks are vacant in Mumbai Municipal Corporation. The health department is short of 600 clerks. The corporation had twice called for tenders to conduct the recruitment of clerks as well as to appoint a company to conduct the aptitude test. Further details are as follows:-

महत्त्वाचे – मुंबई महानगरपालिकेत लिपिकांची तब्बल 2,500 पदे रिक्त

Mumbai Mahanagar Palika Bharti 2022 – महानगर पालिकेतील प्रशासनाच्या लिखापढीचा आधार असलेल्या कारकूनांची (क्लर्क) तब्बल अडीज हजार पदे रिक्त आहेत. तर,आरोग्य विभागात 600 कारकूनांचा तुटवडा आहे. कारकूनांच्या भरतीचे नियाेजन करण्या बरोबर पात्रता परीक्षा घेण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यासाठी महानगर पालिकेने दोन वेळा निवीदा मागवल्या होत्या.

मात्र,दोन्ही वेळेला पालिकेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही भरती रखडली आहे.अशा परीक्षांचे नियोजन करणाऱ्या काही कंपन्यांकडे पालिकेने संपर्क साधून त्यांना निवीदा प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली होती.मात्र,तरीही या कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. महानगर पालिकेच्या प्रशासकीय कारभारात कारकून हे पद पाया मानले जाते.किरकोळ नोंदी पासून महत्वाच्या दस्तांची नोंद ठेवण्यात कारकूनांचा महत्वांचा वाटा असतो.तर,रुग्णालयात केसपेपर तयार करण्या पासून महत्वाची लिखापढीची कामे कारकूनां मार्फत केली जातात.पालिकेच्या सर्व विभागात मिळून 2500 हजारच्या आसपास कारकुनांची पदे रिक्त आहेत. तर,त्यात 600 रिक्त पदे ही आरोग्य विभागातील आहेत.अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजूल पटेल यांनी दिली.

2013-14 मध्ये भरती 

A meeting was held with the administration regarding the vacancies of the clerks in the health department. At that time, it was understood that 18,000 posts were vacant in the entire corporation. The corporation had appointed candidates in 2013-14 without taking written test. The administration has been instructed to check whether the recruitment process can be carried out in the same manner now, said Patel.

 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

69 Comments
  1. MahaBharti says

    New Update..!!

  2. Prashant says

    BA Graduates clerical sathi job kuthe available aahe ka

  3. आकाश चंदू वळंज says

    मि 12th पास आहे मला जॉब हवा आहे ड्राइवर गव्हर्नमेंट जॉब मला भेटू शकेल का मि मुंबई बोरिवली मध्ये राहतो माझा नंबर 8779550788 मला जॉब खूप गरज आहे मि एक गरीब मुलगा आहे मला थोडी मदत करा जॉब साठी तुझे तेवढे मदत होईल दन्यवाद.

  4. Amit vasant surve says

    Sir mi 10 pass aahe,maze 39 year aahe,mi sadhaya mahindra finance madhe office assistant aahe geli 10 varshe mi kam karto aahe pan pagar groth mahi aahe,mahindra finance cha aagodar. Mi mahindra auto sector madhe kam karat ho pan mala breck bhetla Natar mi mahindra finance madhe office assistant mhaun kam karat aahe. Sir mala chaglaya kamachi garaj aahe jane mazi family chagle hoil ya sathi mala kamachi garaj aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड