नवीन महत्वाचा अपडेट, आता अग्निशमन दलातील कंत्राटी भरती बंद!- Mumbai Fire Department Bharti Advertisement

Mumbai Fire brigade Bharti 2025

Mumbai Fire brigade Bharti 2025

 

अग्निशमन दलात यापुढे कंत्राटी भरती होणार नसून यापुढील सर्व भरती प्रक्रिया कायमस्वरूपी कामगार-कर्मचारी म्हणून केली जाणार आहे. यासाठी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेने पाठपुरावा केला. दरम्यान, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अतिरिक्त आयुक्त अमित सैनी, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे बैठकही पार पडली. यावेळी प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. तसेच तसेच फायरमन शारीरिक परीक्षा माहिती साठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Mumbai Fire Department Bharti 2024

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुंबई अग्निशमन दलातील महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात नुकतीच पालिका प्रशासनाकडे बैठक पार पडली. यावेळी कामगार सेनेकडून मुंबई अग्निशमन दलात पंत्राटी पद्धतीने होणाऱया भरतीस विरोध करण्यात आला. यानंतर कंत्राटी पद्धतीने भरती होणार नाही असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. शिवाय मुंबई अग्निशमन दलातील कर्मचाऱयांची सर्व प्रवर्गातील रिक्त पदे/कार्यशाळेतील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याबाबत, दुय्यम अधिकारी पदामध्ये वाढ करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचे सर्व दावे विहित वेळेत मिळण्याबाबत, कर्मचाऱयांच्या कष्ट व जोखीम भत्त्यामध्ये वाढ करणे, कर्मचारी कर्तव्यावर असताना मृत्यू अथवा अपंगत्व झाल्यास नुकसानभरपाईमध्ये वाढ करण्याबाबत, नवीन भरती झालेल्या अग्निशामक यांना सुरक्षात्मक उपकरणे व प्रशिक्षण भत्ता, वेतन तातडीने मिळण्याबाबत, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी प्रशासनाकडून सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष बाबा कदम, माजी महापौर-संघटनेच्या सरचिटणीस किशोरी पेडणेकर, प्रशांत तळेकर, उपाध्यक्ष अनील खराटे, चिटणीस मिलिंद वळंजू, उमेश सिंगासने, खजिनदार दशरत घनवट, उपचिटणीस पुष्कर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रमुख अग्निशमन दल अधिकारी आंबुलगेकर, सावंत, डी. एस. पाटील, प्रशासकीय अधिकारी मोगरे आदी उपस्थित होते.

 

 


Mumbai Fire Department Bharti – The High Court observed that it was a discriminatory policy for women candidates applying for the post of fire brigade personnel in various municipal corporations in the state to have different height criteria. There cannot be different criteria for the same job and women cannot be harassed unnecessarily due to such arbitrary policies.” Girish Kulkarni and Justice Jitendra Jain said.

 

राज्यातील विविध महापालिकांमध्ये अग्निशमन दलातील  कर्मचाऱ्यांच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी उंचीचे वेगवेगळे निकष असणे हे भेदभावपूर्ण धोरण असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. एकाच नोकरीसाठी वेगवेगळे निकष असू शकत नाही आणि अशा मनमानी धोरणांमुळे  नाहक महिलांना त्रास दिला जाऊ शकत नाही, असे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. जितेंद्र जैन यांनी म्हटले.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात अग्निशामक या पदासाठी अर्ज केलेल्या चार महिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. संबंधित महिलांची उंची १६२ सेंटीमीटर नसल्याने त्या उंचीच्या निकषात बसत नसल्याचे सांगून त्यांना नोकरी देण्यास नकार दिला, अशी माहिती याचिकाकर्त्या महिलांचे वकील ए.एस. राव यांनी न्यायालयाला दिली.  ‘महाराष्ट्र अग्निशमन दल सेवा प्रशासनानुसार महिला उमेदवारांची उंची किमान १५२ से.मी असणे बंधनकारक आहे; परंतु, पुणे, ठाणे, मुंबई आणि नागपूर या महापालिकांनी महिलांसाठी १६२ से.मी. उंची निश्चित केली आहे. अन्य महापालिका १५२ सें.मी.चा नियम पाळत आहेत,  असे राव यांनी न्यायालयाला सांगितले.

 


Whenever a fire breaks out, a bird gets stuck or an emergency occurs anywhere in Mumbai, Mumbai Fire Brigade personnel rush to the spot and bring the situation under control. However, this fire safety of Mumbaikars is currently entrusted by the municipal administration to the shoulders of contract soldiers. Mumbaikars are questioning how suitable it is to hire contract fire fighters and the municipal fire fighters are also opposed to this recruitment process. Mumbai Municipal Corporation’s fire brigade has recently inducted 22 quick response vehicles in its fleet.

 

मुंबईत कुठेही आग लागली, पक्षी अडकला किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणतात. मात्र, मुंबईकरांची ही अग्निसुरक्षा सध्या कंत्राटी जवानांच्या खांद्यावर पालिका प्रशासनाने सोपविली आहे. कंत्राटी अग्निशमन दलाचे जवान नेमने कितपत योग्य आहे, असा सवाल मुंबईकर विचारत असून या भरती प्रक्रियेला पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचाही विरोध आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून नुकत्याच २२ क्विक रिस्पॉन्स व्हेइकल आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. सध्या पालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांत ही वाहने उभी असून. ‘डी’ आणि ‘ई’ विभाग हे मुख्य अग्निशमन केंद्राजवळ असल्याने हे दोन विभाग वगळून इतर २२ विभागांसाठी ही वाहने सज्ज ठेवली आहेत. यासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली असून या वाहनांवर जवान, चालक आणि सुपरवायझर कंत्राटी नेमले आहेत.

 

Mumbai Fire Man Bharti

 

 


Mumbai Fire brigade Bharti 2023 will be available From 13 Jan 2023. As per the latest information, this will recruitment process will in next week. Fire Service Department of Brihanmumbai Municipal Corporation/ Municipal Corporation of Greater Mumbai has issued a vacancy Notification for direct service recruitment for the post of Fireman. Applications are invited from eligible candidates for BMC Fire Brigade Recruitment through interviews, Medical Test. Candidates are instructed to attend the interview from 13.01.2023 to 04.02.2023. More details are given below.

महापालिका प्रशासनाकडून 910 पदांसाठी सरळसेवा पद्धतीने प्रक्रिया हाेणार गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया 13 जानेवारीपासून सुरू हाेत आहे. 910 अग्निशामक पदांसाठी ही भरती हाेणार आहे. सात वर्षांनंतर ही भरती हाेत असून, मुंबई महापालिका प्रशासनाने त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सरळसेवा (वाॅक इन सिलेक्शन) पद्धतीने हाेणारी ही भरती 4 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.यापूर्वी 2017 मध्ये या दलात भरती झाली हाेती.तशीच भरती आताही हाेणार आहे.

किमान 50 टक्के गुण मिळवून 12 वी उत्तीर्ण झालेल्या इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी आदींचा या प्रक्रियेत समावेश आहे.मुंबई अग्निशमन दलात सुमारे तीन हजार अग्निशामक, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ आहे. त्यापैकी अडीच हजार अग्निशामक आहेत. मात्र, पदाेन्नती किंवा निवृत्तीमुळे माेठ्या प्रमाणावर पदे रिक्त झाली हाेती.

महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्हीचा वापर होणार आहे. भरती प्रक्रियेचे चित्रीकरण करण्याकरिता ९ कॅमेरे असणार आहेत. यासर्व चित्रकरणासाठी एक नियंत्रण कक्षही तयार करण्यात आला आहे.

रिक्त जागांसाठी ही भरती हाेणार आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही प्रक्रिया हाेणार असून, त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे. या वेळी 120 गुणांची मैदानी चाचणी, 80 गुणांची प्रमाणपत्र चाचणी हाेणार आहे.या पदांसाठी 14 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया वैद्यकीय चाचणी यासाठी दाेन महिने लागणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. भरतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण हाेऊन उमेदवारांना प्रत्यक्षात अग्निशमन दलात रुजू हाेण्यास एक वर्ष लागणार आहे.टाळेबंदीमुळे पाेलिस भरतीमध्ये जशी दाेन वर्षांनी वयाेमर्यादा वाढवण्यात आली, तशीच सूट या भरतीतही देण्यात येणार असून, त्याला नुकतीच प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती अग्निशमनदलाकडून देण्यात आली. त्यामुळे आता खुल्या गटासाठी वयाेमर्यादा 25 ऐवजी 27 वर्षे, तर आरक्षणासाठी हीच मर्यादा 30 ऐवजी 32 वर्षे असेल.

भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी मैदानात सुमारे १६५ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावण्यात आले आहे. भरतीमध्ये उमेदवारांना धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहे.

याशिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना ६ महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण देऊन त्यानंतर सेवेत रुजू केले जाणार आहे.

 

 

At the end Of the Year Mumbai Municipal Corporation has gifted candidates with Big Recruitment in Mumbai Fire Department. Mumbai Fire Department published an advertisement for the various 910 vacancies in the Mumbai region. Out of these vacancies, 37 vacancies are for Persons with disabilities.  For Mumbai Fire Brigade Department Vacancy 2023, candidates have to submit their application form at the time of the Interview. More details about this advertisement are given in PDF advertisement Attached below. The Selection will be on the basis of direct Interviews & Examinations.

मुंबई अग्निशामक विभागांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध ९१० पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. हि भरती प्राक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून ते ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे. या संदर्भातील अधिक तपशील PDF जाहिराती मध्ये दिलेला आहे. अधिक माहिती साठी PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

Mumbai Fireman Recruitment 2023

One of the Most Awaited Recruitments amongst candidates is Agnishamak Vibhag Bharti 2023, which is already declared by Brihanmumbai Municipal Corporation. It’s a very big opportunity for those who are 12th Pass and in search for Fire Department Mumbai Job. They should apply for MCGM Agnishamak Bharti 2023, for this You have to bring your Properly filled application Form, Demand Draft, And Original Documents at the time of Mumbai Fire Department Recruitment. Mumbai Fire Brigade Recruitment Process is starting from 13th January 2023 Till 4th Feb 2023. Candidates are required to appear for the recruitment process on the date on which they have been called as per the percentage. If they appear on any other day, they will not be allowed to participate in the recruitment process. Also, candidates who come after 08.00 am will not be allowed to enter the recruitment venue Whole BMC Fireman Recruitment 2023 Time Table, Mumbai Fireman Recruitment 2023 is given below :

BMC Fire Fighter Recruitment 2022 Application Form

BMC Fire Department Bharti 2023

  • पदाचे नाव – गट ड संवर्गातील पदे भरण्याची जाहिरात
  • पदसंख्या – 910 जागा
  • शैक्षणिक पात्रता –12 वी (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण –मुंबई
  • वयोमर्यादा20 वर्षापेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • अर्ज पद्धती -मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – १३ जानेवारी २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२३पर्यंत 
  • भरतीचे ठिकाण : लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.
  • अधिकृत वेबसाईट -mahafireservice.gov.in

Mumbai Fire Department Vacancy 2023 | BMC Fire Brigade Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या 
अग्निशामक 910 पदे

Educational Qualification For BMC Fire Department Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निशामक
  • उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची कला, विज्ञान, किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता 12 वी किमान 50 टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
  • माजी सैनिकांसाठी –उपरोक्त अर्हता धारण केलेली असावी.किंवा
  • उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण असावा व त्याच्याकडे भारतीय सेनेत किमान 15 वर्षे सेवा केल्याबाबत पदवी प्रमाणपत्र असावे.
  • उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Medical Criteria For Mumbai Agnishamak Bharti 2023

पदाचे नाव वैदयकीय दर्जा
अग्निशामक

उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्टया सदृढ असावा. सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा.

उमेदवाराकडे खालील नमूद केलेला किमान शारिरीक दर्जा असणे आवश्यक आहे.

  • उंची – किमान 172 से.मी. (पुरुषांसाठी)
  • उंची – किमान 162 से.मी. ( महिलांसाठी)

छाती – 81 से. मी. (साधारण), 86 से.मी. ( फूगवून ) ( महिलांसाठी छातीची अट लागू नाही)

वजन किमान 50 कि.ग्रॅ.

  • दृष्टी- चष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय नेहमीची (सामान्य), वर्णान्धता: आजारापासून मुक्त असावा.

Application Fee For Mumbai Fire Department Bharti Advertisement

पदाचे नाव भरती प्रक्रीया शुल्क 
अग्निशामक
  • खुला / अराखीव प्रवर्ग- रु. 944/-
  • आणि मागासवर्गीय व आदुघ / अनाथ आरक्षण अंतर्गत अर्ज करणारे उमेदवार – रु.590/- इतके भरती प्रक्रीया शुल्क (वस्तू व सेवा कर सहीत) ‘बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
  • डिमांड ड्राफ्ट नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही व सदर उमेदवारास भरती प्रक्रीयेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

BMC Fire Brigade Salary

पदाचे नाव पाठयवेतन
अग्निशामक
  • प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक उमेदवारास दरमहा रु. 3000/- (रुपये तीन हजार फक्त) इतके पाठयवेतन देण्यात येईल.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल.

How To Apply For Mumbai Fire Department Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2023 आहे.
  • त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For BMC Fireman Recruitment 2023

मैदानी चाचणी (120 गुण)
प्रमाणपत्र पडताळणी (80 गुण)

  1. इयत्ता 12 वी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
  2. भरती प्रक्रीयेतील मैदानी व प्रमाणपत्र चाचणी ( व्यावसायिक चाचणी) यामध्ये प्राप्त झालेले गुण अशा एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार सामाजिक / समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड / गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि, दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास जन्मदिनांकानुसार वयोजेष्ठतेने प्राधान्यक्रम देण्यात येईल व जन्म दिनांक समान असल्यास उमेदवाराच्या नावाचे अद्याक्षर (इंग्रजी) याप्रमाणे प्राधान्यक्रम देण्यात येईल.
  3. उच्च गुणवत्ताधारक मागासप्रवर्गाच्या उमेदवारांची खुला पदांवर नेमणूक करण्यात येईल.
  4. निवड झालेल्या उमेदवारांमधून रिक्त असलेल्या पदांच्या उपलब्धतेनुसार अग्निशमन शल्य चिकित्सक यांच्याकडे वैदयकीय तपासणीस पाठविण्यात येईल. वैदयकीय तपासणीत पात्र झालेल्या उमेदवारांना मुंबई अग्निशमन दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर, मुंबई अग्निशमन दलाच्या पाठयक्रमानुसार 6 महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणाच्या नियमावलीनुसार देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान अग्निशामक उमेदवारास दरमहा रु. 3000/- (रुपये तीन हजार फक्त) इतके पाठयवेतन देण्यात येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची सदर पदासाठी निवड झाल्यास तो ज्या खात्यात कार्यरत होता त्या खात्यामार्फत प्रशिक्षण कालावधीसाठी त्याचे वेतन काढण्यात येईल.
  5. प्रशिक्षण कालावधीमध्ये तीन चाचणी परिक्षा व अंतिम मैदानी व लेखी परिक्षा घेण्यात येईल. एकत्रित सर्व परिक्षा मिळून सरासरी 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुत्तीर्ण झाल्यास शेवटची संधी म्हणून प्रशिक्षण कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविण्यात येईल व वाढीव प्रशिक्षण कालावधीत घेण्यात येणा-या एक चाचणी व अंतिम लेखी व मैदानी परिक्षेत एकत्रित 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल व पुन्हा संधी दिली जाणार नाही. प्रशिक्षण वाढविण्यात आलेल्या उमेदवाराला त्याच्या वाढीव प्रशिक्षण कालावधीत कोणतेही पाठयवेतन देण्यात येणार नाही व त्यांना वाढीव प्रशिक्षण विनापाठयवेतन करावे लागेल.
  6. भरतीच्या निवडीच्या वेळची गुणवत्ता / निवड यादीत प्राप्त केलेले गुण 50 टक्के व प्रशिक्षण कालावधीत प्राप्त केलेले गुण 50 टक्के ( गुणांची बेरीज करुन ) यासह सेवाज्येष्ठता तयार करुन उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच त्यांचे आरक्षण भरतीच्या गुणवत्ता यादीतील आरक्षणानुसारच राहील.
  7. शारिरीक मानके, शैक्षणिक अर्हतांचे निकष व भरती प्रक्रियेतील विविध चाचण्या पूर्ण करणा-या उमेदवारांचीच (पात्र उमेदवारांची ) कार्यालयीन नोंद ठेवण्यात येईल व भरती प्रक्रियेत अपात्र ठरणा-या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची नोंद ठेवण्यात येणार नाही.
  8. अग्निशामक पदाच्या भरती प्रक्रीयेत पात्र होण्यासाठी मैदानी चाचणीत किमान 50 टक्के गुण (म्हणजेच 120 गुणांपैकी किमान 60 गुण) प्राप्त करणे आवश्यक आहे. मैदानी चाचणीत 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीसाठी अपात्र होतील.

Mumbai Fire Brigade Department Recruitment Time Table 2023

Mumbai Fire Department Bharti Advertisement

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Mumbai Fire Department Bharti 2023 

????सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न पूर्ण माहिती पहा
???? PDF जाहिरात
shorturl.at/agvAR
✅ अधिकृत वेबसाईट
https://mahafireservice.gov.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    नवीन महत्वाचा अपडेट, आता अग्निशमन दलातील कंत्राटी भरती बंद

  2. himmat patil says

    good job sir thank you

  3. MahaBharti says

    धन्यवाद !

  4. कोमल says

    खूप छान काम करता तुम्ही…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड