मुंबई अग्निशामक दल भरती वैद्यकीय चाचणी वेळापत्रक जाहीर | Mumbai Fire Brigade Medical Exam Merit List 2023
Mumbai Fire Brigade Merit List 2023, Result, Selection List
Mumbai Fire Brigade Selection List 2023
Mumbai Fire Brigade Merit List 2023: The recruitment process for the post of Firefighter in Mumbai Fire Brigade through Brihanmumbai Municipal Corporation is going on in a transparent manner and the results are at the final stage, So, BMC Agnishamak Result is published Now… !!
मुंबई अग्निशमन दलाच्या भरतीमध्ये मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या ८७३ उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले. यादीतील पात्र उमेदवारांची पुढील आठवड्यात वैद्यकीय चाचणी होणार आहे. सहा महिने अग्निशमन दलाचे प्रशिक्षण झाल्यानंतर ही तुकडी सेवेत दाखल होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अग्निशामक संवर्गातील ९१० पदांसाठी, पुरुष व महिला उमेदवारांची सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया दिनांक १३ जानेवारीपासून सुरू झाली होती. दहिसर (पश्चिम) मधील गोपीनाथ मुंडे मैदान या ठिकाणी राबवलेल्या या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने आलेल्या उमेदवारांना वेळेअभावी सामावून घेता आले नव्हते. त्यामुळे उमेदवारांना टोकन देण्यात आले होते व नंतर त्यांचीही चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांना धावणे, जम्पिंग शीट मध्ये उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे जोर काढणे, अशा मैदानी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. ९१० जागांपैकी ८७३ जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( mcgm. gov.in ) जाहीर झाली आहे. त्यात महिलांसाठी राखीव २७३ जागांकरिता पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अपंग वर्गासाठी एकूण ३७ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
“Result of Essay Drawing Tactical Drill Industrial Drills Competition FSW-2023 dt.17.04.23” Click here ”Fireman List for batch 2023 with Allotment Letter” Click here ”2nd list of Officer Batch” Click here
Title | Date | Size | Format | Download/View | |
---|---|---|---|---|---|
1 | FIREMAN Batch No. 159 to 166 – RESULT | 14/12/2021 | 4453.68 KB | download | |
2 | FIREMAN Batch No.167 to 175-RESULT | 19/10/2022 | 2428.64 KB | download | |
3 | FTC Result 100to118 | 30/11/2020 | 1983.91 KB | download | |
4 | FTC Result 119to128 | 30/11/2020 | 2189.94 KB | download | |
5 | Sub Officer batch No. 08 Result | 14/12/2021 | 511.82 KB | Download |
सदस्य विलास पोतनीस यांनी या भरती प्रक्रियेबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, ९१० अग्निशामक पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये सेवा प्रवेश नियमानुसार महिलांसाठी उंचीची मर्यादा १६२ सेंटीमीटर एवढी ठेवण्यात आली होती. यानुसार १६२ सेंटीमीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या पात्र एकूण ३३१८ महिला उमेदवारांची पुढील मैदानी भरती प्रक्रिया करण्यात आली.
ही भरती प्रक्रिया १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण झाली असून अंतिम निकालाची कार्यवाही सुरू आहे. महिला उमेदवारांच्या उंचीच्या बाबतीत पुढील भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल. तसेच मोबाईल ॲप विकसित करून प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
Mumbai Fire Brigade Merit List 2023
Mumbai Fire Brigade Merit List 2023 – Recently Mumbai Fire department has conducted Physical Exam For Mumbai Fireman Bharti 2023. Now Interviews will get conducted for Shortlisted candidates. 45 thousand candidates participated in the recruitment process. The next test will be conducted on February 14 for the 16 qualified female candidates. You can Download Mumbai Fire Brigade Merit List 2023, Mumbai Fire Department Male Selection List, Mumbai Agnishamak Female Selection List from below link
महिला अग्निशामक भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या अपात्रतेवरून शनिवारी गोंधळ झाला. महिला उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. मात्र भरतीच्या ठिकाणी वेळेत उपस्थित न राहिल्याने व शारीरिक उंचीच्या निकषात न बसणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले असल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रिया निकषानुसारच झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
पालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात अग्निशामक पदाची भरती प्रक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून सुरू झाली. ही प्रक्रिया अग्निशामक या पदाची कर्तव्ये लक्षात घेता शारीरिक क्षमता आणि मैदानी चाचणी याबाबत निश्चित केलेल्या निकषानुसारच राबवली आहे. भरतीसाठी दिलेल्या वेळेच्या आत येणाऱ्या उमेदवारांना विहित मानक पूर्ण केल्यास पात्र ठरवले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ४ फेब्रुवारीला महिला उमेदवार भरती प्रक्रियेप्रसंगी निकष पूर्ण न केलेल्या ज्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले होते, त्यापैकी काही उमेदवारांनी परिस्थितीचा विपर्यास करून प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे आणले अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
Female Fire Brigade Bharti 2023
भरतीमध्ये शारीरिक उंची मोजण्याची आणि अन्य साधनेही नियमानुसार भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्थात स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी प्रमाणित करून दिलेली आहेत. शनिवार, ४ फेब्रुवारीला महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना अंदाजे ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आले होते. नियमानुसार उंचीची प्रथम चाचणी केल्यानंतर एकूण ३ हजार ३१८ महिला उमेदवारांना प्रथमदर्शनी पात्र करून मैदानामध्ये दाखल करून घेतले. मात्र वेळेत हजर न राहिलेले व शारीरिक उंचीच्या निकषात न बसलेल्या उमेदवारांना अपात्र ठरवल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
काय आहे निकष?
या भरतीसाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक उंची १७२ सेंमी आणि महिला उमेदवाराची शारीरिक उंची १६२ सेमी हा मानक निश्चित केलेला आहे.
किती पात्र, किती अपात्र?
अग्निशामक पदाच्या ९१० जागांच्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकूण ४२ हजार ५३४ उमेदवार दाखल झाले. त्यातील १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ जण पात्र ठरले.
काय आहे निकष?
या भरतीसाठी पुरुष उमेदवाराची शारीरिक उंची १७२ सेंमी आणि महिला उमेदवाराची शारीरिक उंची १६२ सेमी हा मानक निश्चित केलेला आहे.
किती पात्र, किती अपात्र?
अग्निशामक पदाच्या ९१० जागांच्या भरती प्रक्रियेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एकूण ४२ हजार ५३४ उमेदवार दाखल झाले. त्यातील १६ हजार ५७१ उमेदवार अपात्र ठरले. तर २५ हजार ९६३ जण पात्र ठरले.
मुंबई अग्निशमन दल भरतीप्रक्रियेत शनिवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला. भरतीप्रक्रियेत आलेल्या महिला उमेदवारांवर लाठीमार झाला. त्यानंतर सर्व महिला उमेदवारांना आत प्रवेश देऊन त्यांची उंची पुन्हा मोजण्यात आली. यातील पात्र ठरलेल्या १६ महिला उमेदवारांची १४ फेब्रुवारी रोजी पुढील चाचणी घेण्यात येणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अग्निशमन दलातील ९१० पदांसाठी पात्र उमेदवारांची चाचणी होणार १४ फेब्रुवारीला
अग्निशमन दलातील ९१० पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली. भरतीप्रक्रियेत ४५ हजार उमेदवारांनी सहभाग घेतला. दहिसरच्या मैदानात वॉक इन सिलेक्शन पद्धतीने उमेदवारांची निवड केली असून, या भरतीप्रक्रियेत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. महिला उमेदवारांच्या २७३ पदांसाठी ७ हजार महिला उमेदवार भरतीसाठी आल्या होत्या. महिला उमेदवारांच्या बाबतीत उंची १६२ सेंमी, वजन किमान ५० किलो हे दोन अंतिम निकष तपासले जातात. या निकषांमध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांनाच पुढील मैदानी चाचणीसाठी पाठविले जाते. शनिवारी ज्या महिला उमेदवार उंचीच्या प्रथम चाचणीत अपात्र झाल्या. उमेदवारांनी गोंधळ घातला. त्यानंतर उंचीच्या प्राथमिक चाचणीत अनुत्तीर्ण महिला उमेदवारांची उंचीची फेरचाचणी डॉक्टर व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यात १६ महिला उमेदवार पात्र ठरल्या.
Mumbai Fire Brigade Merit List 2023
Table of Contents
OBc Female merit kitila lagel
अग्निशमन भरती चा रिझल्ट कधी आहे .
weting for agnishamk results
Agnishamak list kab lagegi sr