‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेला ब्रेक !! अर्ज स्वीकारणे बंद; जाणून घ्या अधिक माहिती । Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form Download
Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form PDF
CM Vayoshri Yojana Stopped Due To Achar Sanhita
Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form Download: विधानसभा आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ आणि ‘योजना दूत’ या योजनांसह मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजनेलाही थांबवावे लागले आहे. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासंबंधी पत्र काढून अर्ज घेणे तात्पुरते थांबवले आहे. या योजनेंतर्गत ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी तीन हजार रुपयांचा लाभ मिळतो, परंतु सध्या तो देखील थांबवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक सहाय्य साधने व उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी केंद्रे उपलब्ध करून देते. दोन लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात काही बदल करून १९ ऑगस्ट रोजी सुधारणा करण्यात आली होती, आणि ८ ऑक्टोबरपासून ज्येष्ठांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुख्यमंत्री ‘वयोश्री’ योजनेत अर्ज करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे अर्ज घेण्यावर थांबविण्यात आले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सर्व सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे नवीन अर्ज घेणे सध्या बंद करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३६ हजार ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज केले होते, पण त्यापैकी केवळ ६ हजारांनाच लाभ मिळाला आहे. उर्वरित लाभार्थी अजून प्रतीक्षेत आहेत. समाजकल्याण आयुक्तांनी जाहीर केलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, आचारसंहिता लागू झाल्याने योजनेच्या अर्जवाढीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असली तरी, ती आता लागू राहणार नाही.
वयोश्री योजनेची सद्यस्थिती:
- अपेक्षित अर्ज: १५ लाख
- वार्षिक अपेक्षित खर्च: ४५० कोटी
- आतापर्यंत अर्ज: ११.३२ लाख
- प्रतीक्षेत असलेले लाभार्थी: ७.०२ लाख
योजना पुन्हा सुरू झाल्यावर उर्वरित लाभार्थींना योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form Download
Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form Download: The Department of Social Welfare is implementing the “Mukhya Mantri Vyoshree Yojana” scheme to provide one-time financial assistance to senior citizens aged 65 years and above to maintain their physical and mental health.
This scheme is being implemented to provide necessary assistance to senior citizens to deal with age-related disabilities and infirmities, to purchase equipment and to keep their mental health intact through mental health centers and yoga therapy centers. In this, a lump sum of Rs.3 thousand will be provided to the Aadhaar linked personal bank account of the eligible beneficiaries through Direct Benefit Distribution (DBT) system. For this purpose, Santosh Chikane, Assistant Commissioner, Social Welfare, Sindhudurg is appealing to senior citizens who qualify the criteria of Chief Minister Vyoshree Yojana to contact the office of Assistant Commissioner, Social Welfare, Sindhudurg.
Mukhyamantri Vayoshri Yojana Application Form Download: राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
योजनेचे उदिष्ठ व वयोमर्यादा
राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करणेकरिता, तसेच मनः स्वास्थ केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
सन २०२४-२५ या वर्षापासून वयोश्री योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी या https://tinyurl.com/ue7d9sc लिंकवर जाऊन अर्जाची प्रिंट काढून दिलेली माहिती भरुन अर्ज कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ या कार्यालयात करावा.
या योजनेसाठी लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष
या योजनेसाठी लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत, योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील जेष्ठ नागरीक, ज्या नागरिकांनी दि. ३१ डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक, पात्र समजण्यात येतील. यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल, आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाखाच्या आत असावे. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स हे निकष अर्जदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे
Click Here to Apply For CM vayoshri Yojana 2024
Table of Contents
Comments are closed.