MUHS निकाल २०१९

MUHS Result 2019

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नी विविध पदभरती परीक्षचे निकाल जाहीर केलेले आहे. परीक्षेचे निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १५ पदांच्या ९५ जागांसाठी भरती होत असून, त्यासाठी घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील हरकतीनंतर आता गुण जाहीर करण्यात आले आहेत. जाहीर केलेल्या यादीनुसार उमेदवारांनी गुण तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विद्यापीठातील आस्थापनेवरील गट-ब, गट-क आणि गट-ड अंतर्गत ही भरती होत आहे. कक्ष अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेख, सहाय्यक लेखापाल, निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ सहाय्यक, विद्युत पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघु टंकलेखक, टंकलेखक यासह छायाचित्रकार, ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट, वीजतंत्री, वाहनचालक आणि शिपाई ही पदे भरण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यात भरतीप्रक्रियेत घेण्यात आलेल्या परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील हरकती मागविण्यात आल्या. अंतिम उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर महापरीक्षा पोर्टलने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या वेबसाइटवर उमेदवारांना सर्व पदांची यादी पाहता येणार आहे. भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसांत नियुक्ती संदर्भातील अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती महापरीक्षातर्फे देण्यात आली.

 

निकाल   उमेदवारांचा प्रतिसाद


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !