Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यापीठ परीक्षा 15 जुलैपासून होणार

MUHS Nashik

MUHS Nashik – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा लॉकडाऊनमुळे अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे.

येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निश्‍चित केले जाईल, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली.

15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे वैद्यकीय परीक्षेच मार्ग मोकळा होणार असल्याचे दिसून येत आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड