MUHS Exams 2021: वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर

MUHS Exams 2021

MUHS Exams 2021: Medical postgraduate examinations have been postponed again. The exams were scheduled to start from June 24. The revised schedule of the examination will be announced later.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर. वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार होत्या. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

या परीक्षा २४ जूनपासून सुरू होणार होत्या. मात्र त्या आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या परिपत्रकाची खात्री करण्यासाठी विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


आरोग्य विज्ञान विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम लेखी परीक्षा दोन जूनपासून

MUHS Exams 2021 : University of Health Sciences exams will start from June two. The university has issued revised dates. The written examinations for the winter 2020 and summer 2021 sessions of the students of all the faculties of the university are being conducted offline.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम लेखी परीक्षा दोन जूनपासून. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा दोन जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने सुधारित तारखा जारी केल्या आहेत. विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या हिवाळी- २०२० व उन्हाळी २०२१ सत्रातील लेखी परीक्षा सध्या ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. यासंदर्भात अधिक सविस्तर माहिती व वेळापत्रक विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर प्रसिध्द करण्यात आले आहे.


MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा लांबणीवर!!

MUHS Exams 2021 : Medical examinations conducted by Maharashtra University of Health Sciences have also been postponed. This information was given by Medical Education Minister Amit Deshmukh. The exams, which were scheduled to be held from April 19, will now be held in June. 

MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा लांबणीवर!! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वैद्यकीय परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. या परीक्षा येत्या १९ एप्रिल पासून घेण्यात येणार होत्या त्या आता जूनमध्ये होणार आहेत.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…


MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षांचे काय? पुढील ७२ तासात निर्णय

MUHS Exams 2021 : Medical Education Minister Amit Deshmukh interacted with medical students through a television system. We will take a decision in the next 72 hours regarding the examination, he clarified. Further details are as follows:-

MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षांचे काय? पुढील ७२ तासात निर्णय. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा घेण्यासंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परीक्षा १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान होऊ घातल्या आहेत.


MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी!

MUHS Exams 2021 – Examinations will be conducted by the Maharashtra University of Health Sciences from 19th April to 30th June. In view of the increasing prevalence of corona in the state and the increasing number of patients, there are a demand from the people’s representatives, students, and organizations to postpone the examination.

MUHS तर्फे आयोजित वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी! महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे १९ एप्रिल ते ३० जून दरम्यान परीक्षा होणार आहेत. राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांची वाढती संख्या पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, संघटनांकडून होत आहे. अभ्यासिका देखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.

विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पध्दतीने वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार असून कोविड आजाराविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले आहे. मात्र, सदरील परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आज करोनाबाधित आहेत. तर परीक्षेला बसता यावे म्हणून लक्षणे असून सुध्दा अनेक विद्यार्थी करोनाची चाचणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


MUHS हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षेच्या तारखा जाहीर

MUHS Exams 2021 : MUHS’s winter session medical UG exams will start from April 19th. The university administration is ready for the first, second, and third-year examinations of MBBS, BDS, BAMS, BHMS courses. These examinations are being conducted for the first, second, and third UG courses. 

MUHS हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षेच्या तारखा जाहीर. MUHS च्या हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून. MUHS च्या हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. MBBS, BDS, BAMS, BHMS अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितिय आणि तृतीय वर्षांच्या या परीक्षांसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यूजी अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा होत आहेत. या परीक्षा २३ मार्चपासून होणार होत्या, पण त्या लांबणीवर पडल्या होत्या.

आता १९ एप्रिलपासून या परीक्षा सुरू असून १२ मे पर्यंत सुरू राहणार आहेत. MBBS, BDS, BAMS, BHMS अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितिय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठाने असेही कळवले आहे की मॉडर्न मेडिसीनच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा अनुक्रमे ३ मे ते ५ मे आणि ३ मे ते १५ मे या कालावधीत होणार आहेत.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू..


MUHS उन्हाळी-2021 PG अंतिम वर्ष परीक्षा पुन्हा लांबणीवर!!

MUHS Exams 2021 : MUHS PG अंतिम वर्ष परीक्षा पुन्हा लांबणीवर – या तारखेपासून होणार परीक्षा – MUHS उन्हाळी-2021 PG वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा (Medical PG Final Year Exams 2021) पुन्हा ढकलण्यात आल्या आहेत. MUHS उन्हाळी-2021 PG वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा 25 मे पासून सुरू होणार होत्या, त्याऐवजी आता परीक्षा 24 जून पासून आयीजीत करण्यात आल्या आहेत.

  • परीक्षेचे नाव – MUHS उन्हाळी-2021 PG वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा (Medical PG Final Year Exams 2021)
  • परीक्षेची तारीख – 24 जून 2021 (MUHS Exams 2021)

वाढत्या करोना संसर्गामुळे MUHS उन्हाळी-2021 PG वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर 45 दिवसांच्या स्टडी लिव्हवर होते. पण त्यांना पुन्हा ड्युटीवर बोलावण्यात आले. त्यामुळे या परीक्षा आता 24 जूनला सुरू होतील.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू …


MUHS Exams : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एम. डी., एम. एस., डिप्लोमा, एम.एस्सी आदी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आता दि.15 ते 22 जून या कालावधीत होणार असल्याचे विद्यापीठाने कळवले आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील या परीक्षांचे दि.12 मे पासून नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तुर्त स्थगित करण्याचे आवाहन विद्यापीठाला करण्यात आले होते. मार्डचे अध्यक्ष डॉ. राहूल वाघ व इतर पदाधिकार्‍यांनी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देषमुख यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. कोरोना विषाणूचा संसर्गास अटकाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची मदत होणार आहे. या अनुषंगाने मे उन्हाळी सत्रातील वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

सोशल मिडीयावरील संदेश चुकिचे

विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा वेळापत्रक बदलाविषयी सोशल मिडीयाव्दारे सातत्याने चूकीचे संदेश पसरविण्यात येत आहेत. यापासून विद्यार्थी व पालकांनी सावध रहावे. परीक्षा व अन्य घटनांबाबत बनावट संदेश तयार करणार्‍यांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. वेळापत्रकातील बदल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रक

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा पेपर-1 (दि.15 जून) रोजी, पेपर-2 (दि.17), पेपर-3 (दि.19) आणि पेपर-4 (दि.22) जून रोजी सकाळी 11 ते दु. 2 या वेळेत निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. तसेच सत्र-2 च्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज विना विलंब शुल्कासहीत सादर करणेसाठी दि. 5 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह दि. 8 मे आणि अति विलंब शुल्कासहीत दि. 12 मेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

परिपत्रक अधिसूचना


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड