जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष; नाव नोंदणी करून व्हा या स्पर्धेत सहभागी MSSDS World Skills Competition- 2024 Registration

MSSDS World Skills Competition- 2024 Registration

MSSDS World Skills Competition- 2024 Registration

MSSDS World Skills Competition- 2024 Registration: Skill Competition- To be held in France (Lyon) in 2024. Against this backdrop, competition will be held at the district, division, state and country levels. Names of selected candidates will be sent for global nomination. The Assistant Commissioner of Mumbai Suburban District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Ravindra Suravase, has appealed to the interested eligible candidates to register their names by visiting the link https://kaushalya.mahaswayam.gov.in/ .

जागतिक कौशल्य स्पर्धा- २०२४ मध्ये फ्रान्स (लिऑन) येथे आयोजित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर स्पर्धा होणार आहे. निवड केलेल्या उमेदवारांची नावे जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/  या लिंकवर भेट देऊन त्यांची नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे, यांनी केले आहे.

या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे. यापूर्वी ४६ जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागामधून ५० देशांतील १० हजार उमेदवार समाविष्ट असून ही स्पर्धा १५ देशांत १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही थ्री डी डिजिटल गेम आर्ट (3d Digital Game Art), ऑटोबॉडी रिपेअर (Autobody Repair), ऑटोमोबाइल टेक्नॉलॉजी (Automobile Technology), बेकरी (Bakery), ब्युटी थेरपी (Beauty Therapy), ब्रिक्लींग (Bricklaying), कॅबिनेट मेकिंग (Cabinetmaking), कार पेंटिग (Car Painting), कारपेन्ट्री (Carpentry), सीएनसी मिलिंग (CNC Milling), सीएनसी टर्निंग (CNC Turning), काँक्रिट कन्स्ट्रक्शन वर्क (Concrete Construction Work), कुकिंग (Cooking), इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशन (Electrical Installations), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), मेकॅनिक्ल इंजिनिअरिंग कॅड (Mechanical Engineering CAD), मोबाईल ॲप्ल‍िकेशन डेव्हल्पमेंट (Mobile Applications Development), मोबाईल रोबोटीक्स (Mobile Robotics), पेंटिग आणि डेकोरेटिंग (Painting and Decorating), पॅटसरी अँण्ड कॉन्फेक्शनरी (Patisserie and Confectionery), प्लॅस्टरींग अँण्ड ड्रायवॉल सिस्ट‍िमस् (Plastering and Drywall Systems), प्लंबिंग अँण्ड हिटींग (Plumbing and Heating), प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी (Print Media Technology), प्रोटोटाईप मॉडलिंग (Prototype Modelling), रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग (Refrigeration and Air Conditioning), रिन्युएबल एनर्जी (Renewable Energy) अभ्यासक्रम/क्षेत्राकरीता आयोजित केली जाणार आहे.

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकरीता पात्रता निकष : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच, एडीटिव्ह मॅन्युफॅक्चुरिंग क्लाऊड कंप्युटिंग (Additive Manufacturing Cloud Computing), सायबर सिक्युरिटी (Cyber Security), डिजिटल कन्स्ट्रक्शन (Digital Construction), इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी (Industrial Design Technology), इंडस्ट्री ४.० (Industry ४.०), इन्फर्मेशन नेटवर्क केबलिंग  (Information Network Cabling), मेकस्ट्रॉनिक्स (Mechatronics), रोबोट सिस्ट‍िम इंटिग्रेशन अँण्ड वॉटर टेक्नॉलॉजी (Robot System Integration & Water Technology) या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

फ्रान्स (लिऑन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करिता जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने वेळापत्रक नोंदणीकृत उमेदवारांना यथावकाश कळविण्यात येईल, तसेच काही अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर, १७५, श्रेयस चेंबर, १ ला मजला, डॉ.डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी ०२२-२२६२६४४० यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड