एसटी महामंडळात ८००० जागांची भरती
महाराष्ट्रात १७५ ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानक उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागातील युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळात भरती प्रक्रिया सुरू केली असून आठ हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी परभणी येथे दिली.
रावते म्हणाले, राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून १६२ मुलींना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. वयाच्या ५५ वर्षांंनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या सर्व लाभासह दहा लाख रुपये देण्यात येतील. महामंडळाच्या ३३ हजार कर्मचाऱ्यांच्या मुलांना ७५० रुपये पॉकिटमनी देण्यात येत आहे. तर उच्च शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटील कर्ज योजनेद्वारे बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येत आहे.
Website Kuthe Ahe form Bharayla
Nice
Pradeep sonawane
From mumbai
am Rakesh koli from jalgoan
Uas