टायपिंग परीक्षा हॉल तिकीट जारी | MSCE Typing Admit Card 2023
MSCE Typing Admit Card 2023 - mscepune.in
MSCE Typing Admit Card 2023
MSCE Typing Admit Card 2023 – Maharashtra State Examination Council, Pune will conduct the exam from February 07, 2023, to February 11, 2023. The Government Commerce Certificate Examination February 2023 (Typewriting and Shorthand) will be conducted at 130 centers in the state of Maharashtra and Goa. Admit cards for the said examination are available on the council’s website www.mscepune.in through institution login. MSCE Typing Admit Card 2023 are being published on 25/01/2023.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०१ यांचे मार्फत दि.०७ फेब्रुवारी २०२३ ते दि. ११ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०२३ (टंकलेखन व लघुलेखन) महाराष्ट्र व गोवा राज्यातून १३० केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनव्दारे दि. २५/०१/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहेत. तसेच टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा सुधारित अभ्यासक्रम परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा बघाच…
MSCE Pune Typing Hall Ticket 2023
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
संबंधित टंकलेखन व लघुलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सर्व परिक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावरून डाऊनलोड करून शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थ्यांना त्वरीत वितरीत करण्याची व्यवस्था करावी. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे सदर परीक्षांसाठी प्रवेशपत्र वितरित केल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल, बॅच बदल इ. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करुन दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. सदर परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावरील फक्त स्पेलिंग दुरुस्ती असेल व विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव / पतीचे नाव, आईचे नाव, आडनाव यात बदल होत नसेल तरच परीक्षेपूर्वी तीन (०३) दिवस अगोदर म्हणजेच दि. ०४/०२/२०२३ पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात (विद्यार्थ्याचा फोटो व ओळखपत्रासह) समक्ष येऊन दंड रु. २००/- आकारुन प्रवेशपत्रावर दुरुस्ती करून घ्यावी.
सर्व परीक्षार्थ्यांनी त्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे आपल्या टंकलेखन/लघुलेखन संस्थेतून परीक्षेपूर्वी हस्तगत करावे. परीक्षा सुरू झालेनंतर कोणतीही दुरूस्ती करून दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.