शिक्षक पदभरतीची जबाबदारी आता राज्य परीक्षा परिषदेकडे, नवीन GR जाहीर! – MSCE Pune Shikshak Bharti

MSCE Pune Shikshak Bharti Updates 2026 – A Steering Committee has been established under this new system to implement policy decisions related to teacher recruitment and to make recommendations to the government as needed. The Commissioner (Education), Maharashtra State, Pune, will chair this committee. The committee will include the Chairman and Commissioner of the Maharashtra State Examination Council, the Director of the State Council of Educational Research and Training, and the Directors of Primary and Secondary Education. The Maharashtra State Examination Council will conduct all state-level teacher recruitment processes, including the Teacher Aptitude and Intelligence Test 2025, through the Pavitra portal. This entire process will be implemented under the guidance of the Steering Committee. The committee has also been given the authority to allocate office-wise tasks and responsibilities in the recruitment process. This decision is expected to make the teacher recruitment process more efficient, transparent, and administratively simpler. With a single institution responsible for both the examination and recruitment, candidates will also have access to a clearer and more reliable system.

 

शिक्षक पदभरती प्रक्रिया अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीसंबंधित सर्व कामकाज आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी याबाबतचा जीआर काढला. २०१७ पासून शिक्षक पदभरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त (शिक्षण) कार्यालयाकडून राबवली जात होती. मात्र, या प्रक्रियेत स्व-प्रमाणीकरण, जाहिरात, आरक्षणनिहाय कटऑफ निश्चिती, उमेदवारांची शिफारस आदी अनेक टप्पे असल्याने ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत होती. परिणामी कार्यालयावर मोठा प्रशासकीय ताण येत असून, इतर निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

MSCE Pune Shikshak Bharti 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याने स्थापन झालेली स्वायत्त संस्था असून, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसारख्या महत्त्वाच्या परीक्षा याच संस्थेमार्फत घेतल्या जातात. यापूर्वीही शिक्षक पदभरतीशी संबंधित काही कामकाज परिषदेकडून हाताळण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षा आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे अधिक योग्य ठरेल, या भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. सुकाणू समितीची स्थापना या नव्या व्यवस्थेंतर्गत शिक्षक पदभरतीसंबंधित धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी आणि आवश्यकतेनुसार शासनाला शिफारसी करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे असतील. समितीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक यांचा समावेश असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ नुसार तसेच यानंतर होणाऱ्या सर्व राज्यस्तरीय शिक्षक पदभरतीचे कामकाज पवित्र पोर्टलमार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पार पाडणार आहे. हे संपूर्ण कामकाज सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली राबवले जाणार आहे. तसेच पदभरती प्रक्रियेतील कार्यालयनिहाय कामकाजाचे वाटप व जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे अधिकारही या समितीला देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षक पदभरती प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रशासकीयदृष्ट्या सुलभहोण्याची अपेक्षा आहे. एकाच संस्थेकडे परीक्षा आणि भरतीची जबाबदारी आल्याने उमेदवारांनाही अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड