चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती एप्रिल २०२६ परीक्षेची अंतीम उत्तरतालिका जाहीर | MSCE Pune Scholarship Answer Key 2026

MSCE Pune Scholarship Final Answer Key 2025-2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेने यापूर्वी अंतरिम उत्तरसूची जाहीर करून ७ ते १४ मेदरम्यान ऑनलाइन आक्षेप मागवले होते. त्यानुसार आता सुधारित अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर इयत्ता चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर अंतरीम उत्तरसूची जाहीर केली. या उत्तरसूची संदर्भात मुदतीत प्राप्त आक्षेपांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. परीक्षा परिषदेच्या www. mscepune. in व https:/// puppssmsce. in या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची उपलब्ध आहे.

चौथी-सातवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची


MSCE Pune Scholarship Answer Key 2025-2026

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांची अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उत्तरसूचीवरील आक्षेप, हरकती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यासाठी १४ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती परिपत्रकाद्वारे दिली. चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिलेले विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन स्वरूपात करता येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ऑनलाइन निवेदन पालकांसाठी केतस्थळावर आणि शाळांसाठी ऑनलाइन प्रणालीतील शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. १४ मेनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे त्रुटी, आक्षेपांचे निवेदन दिल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. परीक्षेची उत्तरसूची www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाइनरीत्या  नोंदविता येणार

MSCE Pune Scholarship Answer Key 2026

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

MSCE Scholarship Answer Key 2026

  • या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबत निवेदन परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in’ या संकेतस्थळावरुन ऑनलाइन स्वरूपात करता येणार आहे.
  • ऑनलाइन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर आणि शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये ‘ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड आन्सर की’ या पर्यायात उपलब्ध करून दिली आहे.
  • त्यानंतर त्रुटी तसेच आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.
  • ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी तसेच आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.
  • मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.
  • तसेच मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे परिषदेने सांगितले आहे.

MSCE Pune Scholarship for 4th & 7th Standard Exam Details 

Department NameMaharashtra State Council of Examination, Pune
Scholarship NameMSCE Pune Pre-Secondary Scholarship Exam class of 5th & & 8th
Level of ExamState Level
Type of ScholarshipPre Upper Primary Scholarship Examination – 5th Class


Pre Secondary Scholarship Examination – 8th Class

Online Objection Dates
Date of Examination
Answer Key Release Date
Article CategoryAnswer Key
Official Websitewww.mscepune.in

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड