Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MSCE Pune राज्य शिष्यवृत्ती परीक्षा होणार १८ फेब्रुवारीला! | MSCE Pune Scholarship Admit Card Link

MSCE Pune Scholarship Hall Ticket 2023

MSCE Pune Scholarship Admit Card Link @ www.mscepuppss.in

 

पूर्व उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे येत्या रविवारी १८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील ६ हजार १८३ परीक्षा केंद्रांवर राज्यातील सुमारे १ लाख शाळांमधील पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व उच्च माध्यमिक या दोन्ही शिष्यवृत्तीसाठी एकूण ८ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गुणवान विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने १९५४-५५ पासून सुरू केली आहे. उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे १६ हजार ६८३ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६ हजार २५८ संच मंजूर आहेत. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांकरिता आणि माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

सद्य:स्थितीत ए ते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता संचनिहाय किमान: २५० ते कमाल एक हजार रुपये प्रतिवर्ष तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीकरिता संचनिहाय किमान ३०० ते दीड हजार प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येत होती. त्यामध्ये २०२४ परीक्षेपासून पूर्व उच्च प्राथमिकसाठी प्रतिवर्ष ५ हजार तर पूर्व माध्यमिकसाठी साडेसात हजार एवढी वाढ करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.

 

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा येत्या १८ फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत घेतली जाणार आहे. मंडळाने या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले असून, विद्यार्थ्यांनी ते शाळेतून प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र मंडळाने संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्रांच्या प्रती काढून तत्काळ सर्व विद्यार्थ्यांना वितरित कराव्यात. सर्व परीक्षार्थी व पालकांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेतील दोन्ही गटांसाठी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक पेपरसाठी ए, बी, सी, डी संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.


 

MSCE Pune Scholarship Admit Card Link – The Pre-Higher Primary Scholarship Examination (Class V) and Pre-Secondary Scholarship Examination (Class VIII) will be conducted on the same day on February 12 in all the districts of the state. The necessary admit cards for this examination have been made available by the examination board. The State Examination Council has instructed that all the school principals should immediately distribute these admit cards to all the students through the school login. Students can check their MSCE Pune Scholarship Admit Card Link, MSCE Scholarship Exam Hall Ticket 2023  at below :

 

पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. १२) जिल्ह्यातील २०९ केंद्रांवर होणार आहे. जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांमधील ३७ हजार १३५ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेपूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन पेपर असणार आहेत. त्यात पहिला पेपर प्रथम भाषा व गणित आणि दुसरा पेपर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी ७५ प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतील. दोन्ही पेपरसाठी दीड-दीड तासांचा वेळ दिला जाणार आहे. वस्तुनिष्ठ स्वरुपातील प्रश्नांचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांना वर्तुळातील अचूक उत्तरावर बॉलपेनने रंगवावे लागेल.

 

परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार होणार नाहीत, यादृष्टीने भरारी पथके नेमली जाणार आहेत. प्रत्येक केंद्रांना ते पथक भेटी देईल. यंदा शिष्यवृत्ती परीक्षेतील जिल्ह्याचा टक्का वाढावा, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी शिक्षकांना ज्यादा तास घ्यायला लावले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये येणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्याला शासनाकडून दरवर्षी एक हजार रुपयांची तर आठवीतील विद्यार्थ्यास दीड हजारांची शिष्यवृत्ती दिली जाते. पण, अनेक वर्षांपासून त्यात वाढ झाली नाही. आता शिष्यवृत्तीच्या रकमेत पाचशे ते एक हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असून नवीन शैक्षणिक वर्षात त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) उपलब्ध करून दिली आहेत. ही प्रवेशपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे. त्यामुळे लवकरच शाळांमार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

MSCE Scholarship 5th & 8th Class Admit Card Download Print Online

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) येत्या १२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक प्रवेशपत्रे परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहेत. सर्व शाळा मुख्याध्यापकांनी शाळेच्या लॉगिनमधून ही प्रवेशपत्रे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तत्काळ पोचवावीत, अशी सूचना राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ५२ हजार ५२८ शाळांमधील पाचवीच्या पाच लाख ३२ हजार ५०८ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या तीन लाख ६७ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२२पर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर शाळांना शाळा माहिती प्रपत्र आणि ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता शिष्यवृत्ती परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    MSCE Pune Scholarship Hall Ticket 2023 Download Print

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड