JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

पाचवी-आठवी शिष्यवृत्तीच्या बक्षिसाची विद्यार्थ्यांना अद्याप प्रतीक्षा!!

MSCE Pune New Scholarship Scheme

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. पहिल्या शैक्षणिक सत्रात नियमितपणे जमा होणारी ही रक्कम नोव्हेंबर महिना उजाडला तरी न मिळाल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या विलंबाने विद्यार्थ्यांच्या यशाच्या उत्साहावर पाणी फिरवले आहे.

यशाचे बक्षीस रखडल्याने विद्यार्थी निराश आहेत. राज्यातील लाखो गुणवंत विद्यार्थी मोठ्या जिद्दीने अभ्यास करून या परीक्षेत यश मिळवतात. अगदी लहान वयात मिळालेल्या या यशाचे बक्षीस वेळेत मिळणे अपेक्षित असते. या परीक्षेतील पात्र विद्यार्थी आणि त्यांच्या बँक खात्याचा आवश्यक तपशील सर्व शाळांमधून शासकीय पातळीवर योग्य वेळेत सादर करण्यात येतो. मात्र, प्रशासनाकडून शिष्यवृत्ती वितरणाबाबत कोणतीही तातडीची कार्यवाही झालेली नाही. वेळेत प्रोत्साहन न मिळाल्यास पुढील पिढीचा या परीक्षेतील सहभाग आणि उत्साह कमी होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

मागीलवर्षीच्या पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती त्यांच्या शालेय गरजांसाठी वेळेत मिळणे आवश्यक होते. परंतु, प्रशासकीय दिरंगाईमुळे ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अनेक महिने उलटूनही रक्कम न मिळाल्याने, गरजू विद्यार्थी शालेय साहित्य खरेदीसाठी या निधीचा उपयोग करू शकलेले नाहीत. शिक्षण विभागाने तसेच संबंधित प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तत्काळ लक्ष देऊन, मागील वर्षाच्या शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरित शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

किती मिळते शिष्यवृत्ती..
इयत्ता पाचवीसाठी पात्र : पुढील ३ वर्षांसाठी वार्षिक पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते
इयत्ता आठवीसाठी पात्र : पुढील दोन वर्षांसाठी वार्षिक साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


MSCE Pune New Scholarship Scheme – पूर्वी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येऊ लागली. आता पुन्हा त्यामध्ये बदल करुन चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. शालेय स्तरे ावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा, यासाठी वर्षांनुवर्षे पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे अनुक्रमे चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर हा बदल होणार आहे. राज्यभरातून दोन्ही परीक्षांचे मिळून तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. त्यापैकी नऊ ते १० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीस पात्र होतात. त्यातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.

 

जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी होणार बदल
राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी व पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. या शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गोरगरीबांची असतात. त्यांना गलेलठ्ठ डोनेशन भरुन मोठ्या शाळेत प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे या गोरगरीबांच्या मुलांसाठी या परीक्षेमध्ये बदलाच्या हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी हायस्कूलमध्ये गेल्यावर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

जाणून घ्या किती मिळते शिष्यवृत्तीची रक्कम
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेंतर्गत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक शाळा (पाचवी) सर्व संचाकरीता ५०० रुपये प्रतिमाह, माध्यमिक शाळा (आठवी) सर्व संचाकरीता ७५० रुपये प्रतिमाह इतकी शिष्यवृत्ती मिळते.

बदलाची माहिती लवकर मिळणार
सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर किमान वर्षभर अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा बदलाची माहिती मिळावी, यासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल लवकरच करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या बदलाची लवकर माहिती मिळणार आहे

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड