MSCE पुणे शिष्यवृत्ती परीक्षेत बदलाच्या हालचाली सुरु, नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे!
MSCE Pune New Schlorship Scheme
MSCE Pune New Scholarship Scheme – पूर्वी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची ही परीक्षा घेण्यात येऊ लागली. आता पुन्हा त्यामध्ये बदल करुन चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या हालचाली शासन पातळीवर सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. शालेय स्तरे ावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा, यासाठी वर्षांनुवर्षे पाचवी आणि आठवीच्या वर्गामध्ये घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे अनुक्रमे चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर हा बदल होणार आहे. राज्यभरातून दोन्ही परीक्षांचे मिळून तब्बल १५ लाख विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात. त्यापैकी नऊ ते १० हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्तीस पात्र होतात. त्यातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते.
जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी होणार बदल
राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी व पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. या शाळेमध्ये शिक्षण घेणारी मुले ही गोरगरीबांची असतात. त्यांना गलेलठ्ठ डोनेशन भरुन मोठ्या शाळेत प्रवेश घेणे शक्य नसते. त्यामुळे या गोरगरीबांच्या मुलांसाठी या परीक्षेमध्ये बदलाच्या हालचाली सुरु आहेत. माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी हायस्कूलमध्ये गेल्यावर या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसविण्याकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या किती मिळते शिष्यवृत्तीची रक्कम
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेंतर्गत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक शाळा (पाचवी) सर्व संचाकरीता ५०० रुपये प्रतिमाह, माध्यमिक शाळा (आठवी) सर्व संचाकरीता ७५० रुपये प्रतिमाह इतकी शिष्यवृत्ती मिळते.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
बदलाची माहिती लवकर मिळणार
सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर किमान वर्षभर अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा बदलाची माहिती मिळावी, यासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती परीक्षेत बदल लवकरच करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या बदलाची लवकर माहिती मिळणार आहे